सध्याचा काळ हा इंटरनेट आणि मोबाईलचा आहे. लोकं खऱ्या आयुष्यात कोणाशी जोडलेले असो वा नसोत पण सोशल मीडियावर मात्र त्यांचं मोठं फ्रेंड सर्कल नक्कीच असतं. त्यामुळे बरेचदा लोकं त्यांच्या आयुष्यातील छोटे-मोठे समारंभ किंवा क्षण फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करत असतात.
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा दिवस हा खूप मोठा असतो आणि त्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर करणं कसं टाळता येईल. पण हे समजून घेतलं पाहिजे की, लग्नाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आपण पब्लिकली शेअर करता कामा नये. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही लग्नाशी निगडीत गोष्टीबाबत सांगणार आहोत. ज्या तुम्ही सोशल मीडियावर शेअर करणं टाळलं पाहिजे.
सर्वोत्तम लग्नातील कपडे देखील वाचा
लग्नात झालेले कौटुंबिक वाद
असं कोणतंही लग्न नसेल ज्यात फॅमिली ड्रामा झाला नसेल. लग्नाच्या वेळी तर काही लोकं मुद्दामच रूसवे-फुगवे काढतात. त्याऐवजी साध्या लग्नाची योजना करा पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्या गोष्टी तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर शेअर कराव्या. असं केल्याने तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.
लग्नाचा वेन्यू आणि पाहुण्यांची लिस्ट
तुमच्या लग्नाशी निगडीत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट सोशल मीडियावर पब्लिक करणं चांगलं नाही. तुमच्या लग्नात कोण येणार आहे आणि लग्न कोणत्या ठिकाणी आहे हे फक्त तुमच्या क्लोज सर्कलमध्ये राहिलेलंच चांगलं.
मराठी मध्ये वेडिंग गिफ्ट बॅगही वाचा
लोकांना वारंवार लग्नाच्या तारखेची आठवण करणं
लग्नाला आता फक्त 10 दिवस उरले आहेत. लग्नाला आता फक्त एक आठवडा राहिला आहे. अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकून लोकांना लग्नाची तारीख आठवून देण्याचा प्रयत्न करू नये. लग्नाची तारीख आणि लग्नाशी निगडीत विधींची माहितीही तुमच्या कुटुंबिय आणि जवळच्या लोकांना असतेच. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो सोशल मीडियावर शेअर करणं टाळाव.
तुमच्या नातेवाईकांबद्दल पोस्ट करणे
ही चांगली गोष्ट आहे की, लग्नाआधी तुम्ही तुमच्या सासरच्यांसोबत चांगला बाँड शेअर करत आहात. पण याचा दिखावा सोशल मीडियावर मात्र करू नये. तुम्ही त्यांच्यासोबत शॉपिंग किंवा डिनरवर गेलात तरी या गोष्टी सीमितच ठेवा. पब्लिकली शेअर करू नका.
तसेच ब्राइडल एंट्री व्हिडिओंबद्दल वाचा
हनिमून प्लॅन सांगणं
तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हनिमूनला कुठे जाणार आहात, याबाबत तुमच्या सोशल मीडिया फ्रेंड्सना काहीच घेणं देणं नाही. त्यामुळे त्याबाबतची सर्व माहिती फेसबुकवर शेअर करणं चुकीचं आहे. तुमची हनिमूनबाबतची उत्सुकता फक्त जवळचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांपर्यंतच ठेवा. पब्लिकली जाहीर करू नका.
Also Read Importance Of Wedding Vows In Marathi
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxoShop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी
लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप