प्रत्येकाची शरीराचा बांधा वेगळा असते. काहींची चण लहान असते तर काहींची मोठी… अशावेळी तुम्ही तुमच्या शरीराची माहिती करुन घेत कपडे घालणे गरजेचे असते. काही जण काही नवा ट्रेंड आला की, तो लगेच फॉलो करायला जातात. पण नवीन काही ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीरयष्टीनुसार कपड्यांची निवड करणे आवश्यक असते. आता आम्ही तुमची फॅशन करण्यापासून अडवणूक करत नाही. जर तुम्ही तुमच्या बांध्यानुसार.. शरीरयष्टीनुसार कपड्याची निवड केली तर तुम्ही नेहमीच सुंदर आणि परफेक्ट दिसाल. म्हणूनच आज आपण शरीराचा बांधा कसा ओळखायचा आणि कोणत्या कपड्यांची निवड तुम्ही करायची या विषयी जाणून घेणार आहोत. करुया सुरुवात...
शरीरयष्टीचे प्रमुख प्रकार (Types of Body)
1. पिअर शेप (Pear Shape)
shutterstock
पेर या फळाच्या आकारावरुन या बांध्याला नाव ‘पिअर शेप’ असे ठेवण्यात आले आहे. तुम्ही पेर हे फळ डोळ्यासमोर ठेवा. पेर या फळाचा आकार वरुन लहान आणि खालून मोठा असतो. काही जणांच्या शरीराचा आकारही अगदी तसाच असतो. खांदा,कंबर हा भाग बारीक असून कंबरेपासून खालील आकार हा मोठा असतो. मांड्या जाड आणि नितंब हे मोठे असतात. अशा आकाराला ‘पिअर’ शेप असे म्हणतात. आता या प्रकारामध्येही वेगवेगळी चण असलेले लोक असू शकतात.
सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स
2. हवरग्लास शेप (Hourglass Shape)
shutterstock
36-24-26 शरीराची अशी मापं आदर्श असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. छाती आणि नितंबाचा आकार मोठा आणि कंबर लहान असा हा शरीराचा आकार असतो. अनेकदा सेक्सी बॉडीशेपमध्ये हा आकार जातो. स्तन आणि नितंबाचे योग्य प्रमाण असल्यामुळे ही शरीरयष्टी अनेकांना परफेक्ट वाटते. काहींना हा आकार जन्मत:च मिळतो. तर काही जण जीमला जाऊन हा आकार मिळतात. शरीराचा हा आकार अनेकदा प्रमाण मानला जातो.
3. अपर हवरग्लास शेप (Upper Hourglass)
shutterstock
ज्या प्रमाणे हवरग्लास हा शरीराच्या बांध्यामध्ये छाती आणि नितंबाकडील भाग मोठा असतो. तर या प्रकारामध्ये तुमचा वरील बांधा मोठा असतो. खांदे, हात हे जास्त जाड असतात. तर नितंबाकडील भाग हा त्या तुलनेत अगदीच निमुळता असतो. असा प्रकाराला आपण अपर हवरग्लास आकार म्हणतो.
4. बॉटम हवरग्लास शेप (Bottom Hourglass)
shutterstock
जर तुमचा फक्त नितंबाकडील भाग मोठा असेल. तर तुमचा शरीराचा बांधा हा बॉटम हवरग्लास प्रकारातील आहे. यामध्ये नितंब आणि मांड्याकडील भाग हा मोठा असतो. जर तुमच्या शरीराचा आकार असा असेल तर तुम्ही या प्रकारात मोडता.
5. राऊंड किंवा गोलाकार (Round or Oval Shape)
shutterstock
काहींच्या शरीराचा आकार गोल असतो. म्हणजे खांद्यापासून ते अगदी नितंबापर्यंत त्याचा आकार गोलाकार दिसतो. यामध्ये पोट.. नितंब...खांदा सगळेच अगदी गोलाकारात असते. अनेक जण अशाप्रकाराच्या शरीरयष्टीचेही असतात. अशा शरीरयष्टीची लोक फारच क्युट दिसतात.
घराचं रिनोव्हेशन करण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी
6. आयताकृती शेप (Rectangular Shape)
shutterstock
आता तुम्हाला वाटेल असा शरीराचा आकार कसा असू शकेल. पण शरीराचा असाही बांधा असतो. यामध्ये शरीर अगदी एकसारखे असते. जर तुम्ही आयत पाहाल तर तो लांब असतो. अगदी त्याचप्रमाणे असा आकार असलेल्या व्यक्तीचे शरीर वरपासून खालपर्यंत एकसंध असा आकार असतो. खांदा-कंबर- नितंब एकाच आकाराचे असतात. एखाद्या साच्याप्रमाणे हे शरीर असते.
तुमचा शरीराचा बांधा कोणता ते कसे ओळखाल? (How to Determine your Body Type)
shutterstock
वर सांगितलेल्या प्रकारापैकी तुमचा शरीराचा बांधा कोणता हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला संपूर्ण कपडे काढून आरशासमोर उभे राहायचे आहे. ( यामध्ये लाजण्यासारखे काही नाही.) आरशासमोर उभे राहिल्यानंतर तुम्हाला तुमचा आकार ओळखणे सोपे जाईल. वर सांगितलेल्या प्रकारापैकी तुमच्या शरीराचा बांधा कसा ते ओळखा.
उदा. जर तुमचा पोटावरील भाग हा तुलनेने लहान असेल आणि तुमच्या नितंबाकडील भाग मोठा असेल तर तुमचा शरीराचा बांधा पेअर शेप आहे.
आता तुम्ही वरील प्रकार नीट वाचून तुमचा बांधा कोणता याचा शोध लावू शकता.
तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्ही असे घालायला हवेत कपडे (How to Dress for Your Body Type)
आता तुमच्या शरीराच्या बांध्यानुसार तुम्ही नेमके कसे कपडे घालायला हवे ते पाहुया
1. पिअर शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Pear Shaped Body)
Instagram
पिअर शेप म्हणजे काय ते आपण आता जाणून घेतले. आता अशांनी नेमके काय कपडे घालायला हवे ते देखील आपल्याला माहीत हवेत.
- शरीराचा बॉटम पार्ट मोठा असल्यामुळे अशांनी कपडे घालताना विशेष काळजी घ्यायला हवी.
- जास्तीत जास्त फ्लेअर्ड ड्रेस तुम्ही वापरले तर तुमचा बांधा उठून दिसेल.
- तुमचा वरील भाग निमुळता असल्यामुळे तुम्ही ऑफ शोल्डर किंवा ट्युब ड्रेसेस घालण्यास काहीच हरकत नाही.
- तुम्हाला वरुन जितकी स्टाईल करणे शक्य असेल तितकी तुम्ही करु शकता.
- पँटची निवड करताना तुम्हाला गडद रंगाच्या पँट निवडायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही थोडे बारीक दिसाल. त्यामुळे तुम्ही गडद रंगाच्या पँटची नेहमी निवड करा.
- जर तुमचा बांधा असा असेल पण तुमची उंची कमी असेल तरी देखील तुम्ही लांब कपडे निवडू शकता.
- गाऊन हा प्रकार निवडताना तुम्हाला तो फार पायघोळ निवडायचा नाही. त्यामुळे तुमची उंची कमी दिसू शकते.
- ज्वेलरीची निवड करताना तुम्ही गळ्यालगत असलेल्या ज्वेलरीची निवड करा.
Instagram
Latest Trends: Indian
Women Yellow & Navy Blue Ombre Dyed Maxi Dress
INR 719 AT SASSAFRAS2. हवरग्लास शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing tips for Hourglass Shaped Body)
Instagram
आदर्श असा हा आकार असल्यामुळे असा शरीराचा बांधा असलेल्यांना अनेक फॅन्सी कपडे चांगले दिसतात. पण काही गोष्टींची काळजी घेणे तुम्ही आवश्यक असते.
- बॉडीकॉन ड्रेसेस अशांना चांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही सेक्सी शॉर्ट आणि टाईट ड्रेस नक्कीच घालू शकता.
- अशा फिगर असणाऱ्यांनी बेल्ट असारे ड्रेस घातले तर ते त्यांना अधिक खुलून दिसतात. कंबर बारीक असल्यामुळे त्यांचा तो भाग छान उठून दिसतो.
- क्रॉप टॉप्स, वीनेक स्वेटर असे कपडे तुम्हाला अधिक उठून दिसतात.
- तुमचा नितंबाचा भाग मोठा असला तरी तो आकर्षक दिसतो. त्यामुळे तुम्ही बॉटम पँटस किंवा टाईट पँटस घालू शकतात. त्यामुळे ते तुम्हाला अधिक खुलून दिसतात.
- स्वेटर ड्रेस किंवा स्वेटर तुम्हाला खुलून दिसू शकतात.
- ज्वेलरीचा विचार कराल तर तुम्हाला टाईट ड्रेसवर गळ्यालगत असलेल्या ज्वेलरी घालता येतील. जर तुम्ही जीन्स किंवा असे काही घालणार असाल तर तुम्हाला लांबही गोष्टी घालता येतील.
- इंडियन वेअरचा विचार करत असाल तर तुम्हाला पंजाबी ड्रेसही चांगले दिसू शकतात. अधिक घोळदार पँट घालण्यापेक्षा तुम्ही स्ट्रेट फिट पँट किंवा चुडीदारही घालू शकता.
तुम्ही जर नवीन काही ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही बॉडीकॉन ड्रेस घालून पाहा.
Instagtram
Latest Trends: Western
Women Multicolour Printed Sheath Dress
INR 659 AT Miss Chase3.अपरहवरग्लास शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing tips for Upper Hourglass Shaped Body)
Instagram
शरीराचा वरील भाग मोठा असल्यामुळे अशांना नेमकं काय घालावं कळत नाही. बरेचदा चुकीचे कपडे घातल्यामुळे अशा महिलांचे दंड फार मोठे दिसतात. तुमचा शरीराचा आकार असा असेल तर मग तुम्ही कपडे घालताना करा या गोष्टींचा विचार
- तुमचे दंड मोठे असतील तर तुम्ही वरुन फार उघडे ड्रेस घालू नका. अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये तुम्ही जाड दिसू शकता.
- तुम्ही थ्री फोर्थ हँड किंवा फुल स्लीव्हज असलेले कपडे घालण्यास काहीच हरकत नाही.
- तुम्हाला कपडे निवडताना तुमचा वरील भाग जास्त एक्सपोझ होणार नाही इतकीच काळजी घ्यायची आहे.
- पँटचा विचार करता तुम्ही फ्लेअर्ड / बॉटम किंवा स्ट्रेट फिट पँट घालू शकता.
- ज्वेलरीचा विचार करता तुम्ही बंद गळ्यांचे किंवा लांब हातांचे कपडे घातल्यामुळे तुम्ही ज्वेलरी म्हणून कानातले घाला.
- जाड कपडा निवडणे शक्यतो टाळा कारण असे केल्यामुळेही तुम्ही जाड आणि तुमचा शरीराचा आकार एकसंध दिसणार नाही.
Instagram
Latest Trends: Indian
Aurelia Women's Palazzo
INR 519 AT Aurelia 4. बॉटम हवरग्लास असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Bottom Hourglass Shaped Body)
Instagram
बॉटम हवरग्लास हा आकार फॅशनसाठी त्रासदायक ठरतो. ज्यावेळी अशा लोकांना बॉटमवेअर निवडता येत नाही. कारण तुमच्या कपड्यांमधील बॉटमवेअर हे फार महत्वाचे असतात. नितंब मोठे असल्यामुळे तुम्ही कपडे निवडताना हे लक्षात ठेवा.
- नितंब मोठे दिसू नये असे वाटत असेल तर टाईट पँट घालू नका.
- टिशर्ट टाईट असेल तर त्यावर लाँग जॅकेट घाला.
- नेहमी सैलसर टॉप घाला.
- जर तुम्हाला शॉर्ट टॉप घालायचे असतील तर तुम्ही बॉटम वेअर निवडताना स्कर्ट किंवा असा काहीतरी निवडा.
- पंजाबी ड्रेसचा विचार करता तुम्ही घट्ट चुडीदार किंवा शॉर्ट कुडता घालणे टाळा.
- पलाझो पँटस किंवा लुझ स्ट्रेट फिट पँटस तुम्ही घातल्या तर त्या तुम्हाला अधिक चांगल्या दिसतील.
- अनेकदा नितंब मोठे असल्यामुळे तुमची उंची लहान दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही थोडे सैलसर कपडे निवडले तर चालू शकते.
- कुडता निवडताना तुम्हाला तो फिटींगपेक्षा लुझ फिटींगचा निवडता आला तर उत्तम
Instagram
Latest Trends: Western
Women Blue Pinafore Dress
INR 759 AT Tokyo Talkies5. गोलाकार असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Round or Oval Shaped Body)
Instagram
गोलाकार म्हणजेच याला अॅपल शेप फिगर म्हणतात. तुमचाही आकार असा असेल तर मग तुम्ही काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे असते.तुम्ही जर परफेक्ट कपडे निवडले तर तुम्ही चांगले दिसू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कपडे निवडता येऊ शकतात.
- जर तुम्ही रोज पंजाबी ड्रेस घालणारे असाल तर थोडा लुझ टॉप निवडा. तुम्ही जर लुझ टॉप घालणार असाल तर तुम्हाला चुडीदार घालायला काहीच हरकत नाही.
- बॉ़डीकॉन ड्रेसेस शक्यतो टाळा.
- जर तुम्हाला वनपीस किंवा असे काही घालायचे असेल तर ते शक्यतो स्लीव्हलेस टाळा कारण त्यामध्ये तुम्ही जास्त जाड दिसू शकता.
- स्ट्रेट फिट पँट तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
- खूप मोठ्या प्रिंटचे कपडे तुम्ही घालू नका.
- अनारकली किंवा फ्लेअर्ड टॉप तुम्हाला उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही फ्लेअर्ड टॉपची निवड करु शकता.
- ज्वेलरीचा विचार करता गळ्यालगत असलेली ज्वेलरी निवडू नका. थोड्या लुझ ज्वेलरी असू द्या.
Instagram
Latest Trends: Western
V Neck Floral A-Line Plus Dress
INR 1,316 AT Limeroad6. आयताकृती शेप असणाऱ्यांसाठी ड्रेसिंग टीप्स (Dressing Tips for Rectangular Shaped Body )
Instagram
काही जणांचा आकार अगदी ठोकळ्यासारखा असतो. त्यांचे प्रत्येक अवयक अगदी मोजून मापून असतात. असा आकार असलेल्या सगळे कपडे चांगलेच दिसतात. पण तरीही काहीही घालण्यापेक्षा तुम्हाला कपडे निवडताना काही काळजी घ्यायला हवी.
- खांदे सरळ असल्यामुळे तुम्हाला शॉर्ट जॅकेट किंवा असे प्रकार चांगले दिसू शकतात.
- स्कीनी जीन्स तुम्हाला चांगल्या दिसू शकतात.
- जर तुम्ही उंच असाल तर तुम्हाला गाऊन चांगले दिसू शकतात.
- काहीवेळा असा आकार असलेले उठून दिसत नाहीत. जर तुम्ही खूप तंग कपडे निवडले असतील तर त्यामुळे तुमचे अवयव उठून दिसतील असे कपडेच तुमच्यासाठी उत्तम आहेत.
- पंजाबी ड्रेसचा कोणताही प्रकार तुम्हाला चांगला दिसू शकेल.
- स्ट्रेट पँट, बेलबॉटम पँट तुम्हाला चांगल्या दिसतील. अॅथलीट फिगर असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय करु शकता.
Instagram
Latest Trends: Western
Abstract Full Leg Jumpsuit
INR 712 AT Rain treeतुम्हालाही पडतात का हे प्रश्न (FAQs)
तुमच्या शरीरयष्टीनुसार तुम्हाला कपडे घालणे गरजेचे आहे का?
जर तुम्ही तुमच्या शरीरयष्टीनुसार काही कपडे घातले तर ते तुमचा लुक अधिक खुलवण्यास मदत करु शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या शरीराचा आकार पाहून कपड्यांची निवड करा. अशाप्रकारे कपडे घातल्यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच. पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
कोणता बॉडी शेप अधिक आकर्षक दिसतो?
हवरग्लास प्रकारातील फिगर ही सगळ्यत जास्त आकर्षक असते. कोणतेही कपडे अशा प्रकारच्या बॉडी शेपला उठून दिसतात. 36-24-36 हा आकार जो म्हटला जातो तो याच प्रकारातील फिगरसाठी. म्हणूनच पुरुषांना अशा प्रकारचा आकार असलेल्या महिला अधिक आवडतात.
झीरो फिगर म्हणजे काय?
मध्यंतरी झीरो फिगरचे खुळ आले होते. त्यावेळी लोकांना झीरो फिगर हवी होती. त्याचे मेजरमेंटही वेगळे आहे. 30-22-32 असे याचे माप होते. आता ते तुमच्या उंचीनुसार हे माप बदलणारे होते. म्हणजे झीरो फिगर फिगरचे हे माप जास्तीत जास्त 36-28-36 इतके आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.