सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

कोणताही सण असो आपली इतकी त्रेधातिरपिट उडतेच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली तयारी सुरुच असते. अशावेळी आपण आपल्याकडे लक्ष द्यायचे अगदीच विसरुन जातो. पण तुम्ही कितीही चांगले कपडे खरेदी केले आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून दिवाळीच्या या खरेदीत, धामधुमीत तुमचे पॅम्परिंग राहून गेले असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही मस्त घरच्या घरी फेशियल करा. तुम्ही ऑरगॅनिक आणि ब्युटी प्रोडक्टस अशा दोघांचा वापर यासाठी करु शकता. त्यामुळे आज तुम्हाला आम्ही दोन्ही प्रकारे केले जाईल असे सोपे फेशियल दाखवणार आहोत. 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणून केले जाते अभ्यंगस्नान  

ऑरगॅनिक फेशियल

Instagram

आयत्यावेळी करण्यासाठी ऑरगॅनिक फेशियल अगदीच हे अगदीच बेस्ट असते. कारण त्याचे साईड इफेक्टस नसतात. त्यामुळे तुम्ही हे फेशियल अगदी बिनधास्त करु शकता. 

 • चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
 •  स्क्रब म्हणून तुम्हाला कॉफी पावडर, साखर- मध किंवा साध्या मसुर डाळ, बदाम याचा वापर करता येईल. 
 • तुमच्या आवडीचा स्क्रब निवडून तुम्ही तुमचा चेहरा साधारण 5  मिनिटे तरी स्क्रब करा. 
 • स्क्रबनंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फार बदल जाणवेल. तुमच्या त्वचेवरील घाण निघून जाईल. त्वचा कोमल, मुलायम जाणवून लागेल.
 • स्क्रबनंतर साधारण तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मसाज करायला असतो. आता मसाजमध्ये तुम्हाला क्रिम जिरवणे आवश्यक असते. 
 • अशावेळी तुम्ही टी ट्री ऑईल, जर तुम्हाला चेहऱ्याला दुध लावल्यामुळे त्रास होत नसेल तर दुध त्यात केशर मिसळल्यास आणखी उत्तम. किंवा व्हिटॅमिन E तेल घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. साधारण 5 ते 7 मिनिटं तरी तुम्ही हा मसाज करा. 
 • आता तुम्ही या स्टेपनंतर वाफसुद्धा घेऊ शकता. पाणी गरम करताना त्यात पुदिन्याची पाने थोडं केशर घातलं तरी चालू शकेल. चेहऱ्याला छान वाफ घेतल्यानंतर ब्लॅक हेड्स असल्यास काढा. शक्यतो दाबून किंवा हिंस्र पद्धतीने ते काढू नका. नाहीतर संपूर्ण  सणाच्या कालावधीत ते डाग तुमच्या चेहऱ्यावर राहतील.
 • वाफ घेतल्यानंतर ओपन होणारे पोअर्स बंद करण्यासाठी बर्फ लावायला विसरु नका.
 •  सगळ्यात शेवटी तुम्ही कोथिंबीर-ओट्स , मुलतानी माती, गुलाब पावडर, बेसनचा पॅक तुम्ही बनवू शकता. पॅक साधारण 20 मिनिटे ठेवा. 
 • चेहऱ्याला गुलाब पाणी लावून मस्त चेहऱ्यावर टोनर लावा. तुमचे फेशियल झाले. 

पार्लर स्टाईल फेशियल

Instagra

आता काही जणांना ऑरगॅनिक फेशियल शक्य असतं किंवा आवडतचं असं नाही. काहींना पार्लर स्टाईल फेशियल करायला आवडतं. म्हणजे क्लिनिंग, स्क्रबिंग, मसाज आणि पॅक या प्रकारातलं. आता तुम्ही त्या पद्धतीनेही फेशियल करु शकता. तुम्ही फेशियलचा किट आणू शकता किंवा घरी असलेल्या सामानातून देखील हे करु शकता. 

 • सगळ्यात आधी मेकअप क्लिनझर किंवा मेकअप रिमुव्हींग सोल्युशनने तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या. 
 • तुमच्या आवडीचे स्क्रब घेऊन तुमचा चेहरा स्क्रब करा. तुमच्या स्क्रबची निवड ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असायला हवी. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी यामध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक असते.त्यामुळे जितकं माईल्ड स्क्रब वापरता येईल तेवढे स्क्रब वापरा. 
 • स्क्रबनंतर तुम्हाला स्टीम घेता येईल. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर वाफ घ्या. 
 • एखादे चांगले कमीत कमी तैलीय पदार्थ असलेले मसाज क्रिम निवडा. स्वत: ला मसाज करण्यात आराम मिळत नाही. पण तुम्हाला थोडे रिलॅक्स नक्कीच वाटेल. 
 • हल्ली तर रेडीमेड फेस मास्क मिळतात. ते लावूनही तुम्हाला आराम मिळू शकेल.
 • चांगला फेस पॅक निवडून तो लावा. चेहरा धुवून टाका. तुमच्या चेहऱ्यावर गुलाब पाणी किंवा एखादे फेस मिस्ट असेल तर आवर्जून वापरा. 

आता आहात तुम्ही फेस्टिव्हलसाठी एकदम सुपर डुपर रेडी 

स्ट्रेटनिंगमुळे तुमचेही केस झाले आहेत खराब मग एकदा वाचाच

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.