हल्ली लोक आरोग्याच्या बाबतीत इतकी सजग झाली आहेत की, हल्ली सगळ्या चांगल्या सवयी अंगिकारण्याचा सगळे प्रयत्न करतात. चांगले दिसण्यासाठी योग्य वजन असणेही गरजेचे असते. जर वजन जास्त असेल तर अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी बरेच काही करतात. जिम, डाएटींग असे बरेच काही फिट राहण्यासाठी केले जाते. पण तुम्ही तुमचे वजन नवरात्रीच्या नऊ दिवसात अगदी सहज कमी करु शकता. हो हो आम्ही नवरात्रीबद्दलच बोलत आहोत. नवरात्रीत जर तुम्ही मस्त गरबा खेळत असाल तर तुमचे वजन अगदी हमखास कमी होणार आणि त्याहीपेक्षा जास्त तुम्ही मस्त फ्रेश व्हाल.
आता जर तुम्ही जीमला जाणारे असाल तर तुम्हाला कार्डिओ काय ते नक्कीच माहीत आहे. तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला अनेकदा कार्डिओ करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही तो मशीनवर करण्यापेक्षा मस्त म्युझिकच्या तालात जर गरबा खेळत असाल तर तुमचे हमखास फॅटलॉस होणारच. जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस गरबा खेळत असाल तर तुम्हाला तुमच्यात झालेला बदल हमखास दिसेल.
*काय घ्याल काळजी: तुम्हाला इतकी काळजी घ्यायची आहे की, तुम्ही गरबा खेळण्याआधी खूप काही खाऊ नका. जर गरब्याला जाण्याच्या तासभर आधी तुम्ही खाल्ले तर चांगले पण त्यानंतर काही खाणे टाळा. शिवाय गरबा खेळल्यानंतरही काही खाऊ नका.
या नवरात्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी ‘झेंडू’च्या फुलांचा असा करा वापर
आता गरबा म्हणजे नुसत्या टाळ्या वाजवणं नाही. तुम्ही जर खरा गरबा पाहिला असेल तर असा गरबा खेळताना अंगाची भरपूर हालचाल केली जाते. तुम्ही जर तुमच्या ग्रुपसोबत गरबा खेळत असाल तर त्यामध्ये भरपूर स्टेप्स करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितक्या जास्त स्टेप्स कराल तितका जास्त फायदा तुम्हाला यामुळे होऊ शकतो. हात उंचावणे, गोल फिरणे, पाय उंचावणे यामध्ये तुमच्या सबंध शरीराचा व्यायाम होतो.
*काय घ्याल काळजी: असे करताना तुम्ही जोशमध्ये होश घालवू नका. कारण तुम्हाला जर काही त्रास असेल तर तुम्ही काही स्टेप्स करताना काही काळजी घेत जा.
एरव्ही व्यायाम सांगितला तर तो करायला अनेकांना कंटाळा येतो. पण तेच देवीचा जागर आणि गरबा असेल तर कितीही आळशी असणारी व्यक्ती नाचतेच किंवा तिला नाचण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही या काळात जरा ही डान्स करणे सुरु केले तरी तुमचा लवचिकपणा वाढतो. हा लवचिकपणा तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे अगदी हमखास वळवता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास गरबा खेळा.
मग आता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर गरबा खेळायला नक्की जा. तुम्हाला तुमच्यात झालेला फरक जाणवेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
वाचा