ADVERTISEMENT
home / भविष्य
Brave Zodiac Signs In Marathi

या राशीच्या व्यक्ती असतात धडाकेबाज (Brave & Courageous Zodiac Signs In Marathi)

आयुष्यात भीती तर सगळ्यांनाच वाटत असते. पण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे ना की, भीती ही तुमच्या मनातून आलेली असते. ते सर्व काही डोक्यात असतं. तुमची रासदेखील तुम्ही किती धडाकेबाज आहात हे ठरवत असते. प्रत्येक राशीमध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतं. जे प्रत्येक माणसाचा वेगळेपणा दाखवून देत असतं. काही जणांचं नशीब चांगलं असतं. काही जणांना मेहनतीबरोबरच नशिबाचीही साथ मिळते. आपण कोणत्या राशीच्या व्यक्ती निडर आणि बेधडक असतात ते जाणून घेणार आहोत. 

या 5 राशीच्या व्यक्ती असतात बेधडक (Brave Zodiac Signs In Marathi)

ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत, पण त्यापैकी काही राशीच अशा आहेत ज्या स्वभावाने अतिशय बेधडक असतात. शौर्याच्या बाबतीत तर या व्यक्ती पुढे असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची भीती अथवा कोणत्याही गोष्टीमध्ये लाज वाटत नाही. कोणतंही संकट आलं तरी न घाबरता या राशीच्या व्यक्ती करतात सामना. जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत निडर – 

मेष (Aries)

मेष (Aries)

Shutterstock

ADVERTISEMENT

या राशीच्या व्यक्तीची चांगली बाब ही आहे की, कोणत्याही खऱ्या गोष्टींना या व्यक्ती घाबरत नाहीत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा सामना करायलादेखील या व्यक्तींना त्रास होत नाही. तसंच मेष राशीच्या व्यक्ती नेहमी अशा संधीच्या शोधात असतात, जिथे त्यांना आपल्या निडरतेचं प्रदर्शन करता येईल. कारण या व्यक्तींना कोणाहीकडून आपलं कौतुक ऐकून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो. कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणाने जर त्यांच्या वाईटात गेली तर त्यांना शिकवण दिल्याशिवाय या व्यक्तींंना शांतता मिळत नाही. 

वृषभ (Taurus)

वृषभ (Taurus)

Shutterstock

या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच असतात. या व्यक्ती असताना त्यांच्या कुटुंबावर कोणीही वाईट नजरेने पाहूही शकत नाही. या व्यक्तींचे निडरतेचे किस्से हे अगदी बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध असतात. बरेच लोक या व्यक्तींना आपला आदर्श मानतात. या व्यक्ती अतिशय जिद्दी असतात आणि या व्यक्तींकडे अतिशय जास्त प्रमाणात संयम असतो. या दोन्ही विरोधाभास असलेल्या गोष्टी या व्यक्तींना खास बनवतात. कारण असं समीकरण फारच कमी लोकांमध्ये दिसून येतं. या राशीच्या व्यक्ती चांगल्या खेळाडू होऊ शकतात. समोर कितीही शक्तीशाली व्यक्ती असला तरीही या व्यक्तींना त्याचं भय वाटत नाही. आपल्या भीतीबद्दल राशि चक्र जाणून घ्या.

ADVERTISEMENT

सिंह (Leo)

सिंह (Leo)

Shutterstock

या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास अत्यंत जास्त प्रमाणात असतो.  त्यामुळे खासगी, व्यावसायिक कोणत्याही आयुष्यात या व्यक्ती स्टार बनतात. सिंह राशीच्या व्यक्ती या कोणत्याही गोष्टीसाठी पुढे येतात तेव्हा त्या अगदी सिंहासारख्याच असतात. त्यांचा दबदबा इतका असतो की, त्यांच्यासमोर येण्यासही लोक घाबरतात. या व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा पंगा घेण्यास लोक घाबरतात. या व्यक्ती नेहमीच खोटेपणाविरोधात आवाज उठवतात आणि तेदेखील कोणाचाही आधार न घेता. काही जणांना त्यामुळे या व्यक्ती गर्विष्ठ वाटतात. पण हे यांचं एक वैशिष्ट्य आहे. इतर कोणाहीपेक्षा या व्यक्ती स्वतःला कमी लेखत नाहीत. 

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक (Scorpio)

ADVERTISEMENT

Shutterstock

या राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास सिंह राशीप्रमाणेच भरपूर असतो. या व्यक्ती स्वभावाने अतिशय फटकळ आणि तितक्याच प्रेमळ असतात. पण त्यांच्या या फटकळ स्वभावामुळे इतर व्यक्ती मात्र यांना घाबरतात. भीती ही गोष्ट या व्यक्तींना माहीतच नसते. कोणत्याही संकटाच्या काळात स्वतःला आणि इतरांनाही या व्यक्ती पटकन आणि व्यवस्थित बाहेर काढू शकतात. कोणत्याही वेळी योग्य विचार करून त्यातून मार्ग काढण्याचं वैशिष्ट्य या व्यक्तींमध्ये असतो. या व्यक्तींच्या नादाला लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. शाब्दिक असो वा शारीरिक कोणत्याही बाचाबाचीमध्ये या व्यक्ती पुरून उरतात. या व्यक्तींची लीडरशिप ही त्यांच्या नीडर स्वभावामुळे अप्रतिम ठरते. या राशीच्या व्यक्ती एक उत्तम लीडर ठरतात. राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव.

धनु (Sagittarius)

धनु (Sagittarius)

Shutterstock

ADVERTISEMENT

या राशीच्या व्यक्तींना विचित्र स्वभावाचे म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कारण जे काम यांनी एकदा हातात घेतलं तर ते काम झाल्याशिवाय यांना शांतता लाभत नाही. या व्यक्तींची जिद्द आणि निडरपणा प्रसिद्ध आहे. या व्यक्ती कोणत्याही व्यक्तींसमोर लवकर झुकत नाहीत आणि हरून मागे हटत नाहीत. समोरची व्यक्ती हरत नाही तोपर्यंत या व्यक्ती परिस्थितीशी लढा देत राहतात. या व्यक्ती अशाच तऱ्हेने आपलंं आयुष्य जगतात. कोणाचीही लुडबूड आपल्या आयुष्यात या व्यक्तींंना आवडत नाही. तसंच स्वभावानेही या व्यक्ती आक्रमक असतात. त्यामुळेच या व्यक्तींना बरेच लोक घाबरतात.  

09 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT