कोजागिरीला ‘मसाला दूध’ पिण्याचे आरोग्यदायी फायदे

कोजागिरीला ‘मसाला दूध’ पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मराठी कालनिर्णयानुसार अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. कोजागिरीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो. ज्यामुळे रात्रीच्या वेळी चंद्राचे संपूर्ण रूप पाहाता येतं. या दिवशी पडणारा चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी उत्तम असतो असं म्हणतात. यासाठीच रात्रीच्यावेळी चंद्राचे दर्शन घेत रात्र जागवण्याची पद्धत आहे. शिवाय कोजागिरीला लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमंती करण्यासाठी येते अशी मान्यता आहे. म्हणूनच रांगोळीची सजावट आणि दिव्यांची आरास करून लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. या  निमित्ताने घाईगडबडीच्या काळातही आजूबाजूचे लोक एकत्र येतात. मित्रमंडळी अथवा शेजारी एकत्र येऊन कोजागिरी साजरी करतात. लक्ष्मी मातेला मसाले दूधाचा नैवेद्य दाखवला जातो. या दूधात चंद्राचे दर्शन घेतले जाते. वास्तविक या काळात शेतातील पिक पिकून वर आलेलं असतं. पावसाची उघडीप थांबल्यामुळे अंगण अथवा टेसेसवर एकत्र येऊन गप्पा मारल्या जातात. शिवाय निसर्गाने दिलेल्या अन्नधान्य आणि समृद्धीबाबत त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी कोजागिरीला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र या दिवशी मसालेदूध पिण्यालाही तितकंच आरोग्यदायी महत्त्व आहे. यासाठीच जाणून घेऊया  मसालेदूध पिण्याचे फायदे आणि ते कसं तयार करावं. 

Instagram

मसाला दूध पिण्याचे फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढते

कोजागिरीला चंद्रप्रकाशातील दूध पिणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. कोजागिरीला आटीव मसाले दूध पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या काळात पावसाळा संपून थंडीला सुरूवात होत असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच आजारपणांपासून  दूर राहण्यासाठी मसाले दूध पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.  

चांगली झोप लागते

कोजागिरीची रात्र जागवण्यासाठी उशीरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री उशीरा झोपण्याचा प्रयत्न केल्यास अनेकांना झोप लागत नाही. कारण त्यांची नेहमीची वेळ बदललेली असते. मात्र जर तुम्ही कोजागिरीला रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध प्यायला तर तुम्हाला शांत झोप लागू शकते.  शिवाय रोज रात्री झोपताना हळदीचे अथवा मसाला दूध पिण्याने नक्कीच चांगली झोप लागते. 

वजनावर नियंत्रण राहते

रात्री झोपताना हळदीचे दूध अथवा मसाले दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे आहे. कारण रात्री झोपताना दूध पिण्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर भुक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही चुकीचे पदार्थ कमी प्रमाणात खाता. 

कॅल्शियमची कमतरता कमी होते

दूधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. कॅल्शियम तुमच्या दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. जर तुम्हाला हाडांच्या अथवा दातांच्या समस्या वारंवार होत असतील तर आहारात दूधाचा वापर जरूर करा. कोजागिरीच्या रात्री मसालेदूध यासाठीच पिणे फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते. 

मानसिक स्वास्थ मिळते

कोजागिरीच्या रात्री आजूबाजूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते. अशावेळी चंद्रप्रकाशातील मसाले दूधाचा नैवेद्य घेतलेल्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागिरीला मसालेदूध जरूर प्या. 

Instagram

मसाला दूध कसे तयार करावे ?

साहित्य - एक लीटर दूध, साखर, बदाम, पिस्ता, केशर, वेलची पूड

मसाला दूध तयार करण्याची कृती -

दूध मंद आचेवर गरम करा. त्यात आवडीप्रमाणे साखर टाका. दूधाला उकळी येऊ द्या. दूध आटल्यावर त्यात सुकामेव्याचे काप आणि केशर घाला. दूधाखालील गॅस बंद करून त्यात आवडीनूसार वेलचीपूड टाका तयार मसालेदूध देवासमोर अथवा चंद्राची प्रतिकृती पडेल अशा पद्धतीने ठेवून मग सर्वांना वाटा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात हळद आणि आल्याचादेखील वापरदेखील करू शकता. 

फोटोसौजन्य - इन्साग्राम 

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

रंगपंचमीसाठी तयार करा 'होममेड थंडाई'

उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे '10' प्रकार

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज