कोणताही आजार हा प्रत्येक माणासासाठी वाईटच ठरत असतो. पण त्यातही तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याने अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. इतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळ्यामध्ये याचा त्रास जास्त जाणवतो. त्याचं कारणही तसंच आहे. हिवाळ्यात रक्त आणि श्वसनमार्गाची नळी ही लहान होते. त्यावेळी रक्तदाब आणि श्वासावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन जातं. मग अशावेळी नक्की काय करायचं तर अशावेळी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांना सैंधव अर्थात रॉक मीठ द्यायला हवं. रक्तदाबमध्ये योग्य आहार आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचवू शकतो. रक्तदाबाच्या त्रासाने हैराण असल्यास, तुम्ही सैंधवचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होऊन रक्तदाबाचा त्रास कमी होऊन व्यवस्थित श्वास घेता येतो. खरं तर तुम्हाला घरच्या घरीदेखील ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय करता येतात. पाहूया नक्की काय करता येतं -
रक्तदाब अथवा हृदयविकार असलेल्या रूग्णांनी शक्यतो धुळीपासून दूर राहावे. घरातील अथवा कोणत्याही इतर ठिकाणची धूळ साफ करण्यासाठी पुढाकार घेऊ नये. धुळीतील जंतू तुमच्या शरीरात गेल्यास, तुम्हाला श्वासाचा त्रास होऊन रक्तदाब अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे रक्तदाब कमी करण्याचे उपाय करायला पाहिजे .
सुंठ, काळी मिरी आणि तुळशीचं मिश्रण यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. याचा वापर तुम्ही केल्यास, तुम्हाला थंडीमध्ये कधीही श्वासाचा अथवा रक्तदाबाचा त्रास नक्कीच होणार नाही. त्यासाठी तुम्ही साधारण तीन ते चार लीटर पाणी उकळवून घ्या. ते पाणी उकळत असताना सुंठ, काळी मिरी आणि तुळशीची पानं त्यामध्ये मिक्स करा आणि हे साधारण काही वेळ उकळू द्या. थंड झाल्यावर हे पाणी फिल्टर करून प्यावं. ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय मधील हा उपाय केल्यास तुमची समस्या बरी होण्यास मदत होते.
रक्तदाब अथवा श्वासाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना दिवाळीच्या प्रदूषणात फिरणं शक्यतो टाळावं. सकाळी आणि संध्याकाळी सहसा फटाक्यांच्या धुरात फिरू नये. त्यापेक्षा दुपारच्या उन्हात थोडंफार फिरणं योग्य ठरेल. या धुरामुळे श्वास घ्यायला अत्यंत त्रास होत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम रक्तदाबावरही होत असतो.
फास्ट फूडमध्ये अनेक प्रकारचे शरीराला हानिकारक ठरणारे मसाले असतात. त्यामुळे फास्ट फूड खाणं टाळावं. कारण अनेकदा आपण चायनीज खातो. त्यामध्ये असणाऱ्या अजिनोमोटोचा शरीरावर दुष्परिणाम होत असतो. विशेषतः तुमच्या रक्तदाबावर. तुम्हाला रक्तदाबाचा त्रास झाला की त्याचा मुख्य परिणाम श्वासावर होतो. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ खाणं टाळा. तसंच आईस्क्रिमदेखील तुमच्या अशा आजारावर योग्य नाही. आईस्क्रिमने सतत सर्दी होऊन तुमच्या श्वासावर त्याचा परिणाम होत असतो.
सिगरेटचा धूर हे तर अशा रूग्णांसाठी अधिक धोकादायक ठरतो. सिगारेट पिणंदेखील अशा रूग्णांसाठी चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही सिगारेटपासून चार हात लांब राहणंच योग्य आहे. तसंच तुमच्या फुफुस्सांना मजबूत करण्यासाठी योगाचा आधार घेत श्वासाचे व्यायाम करणंही आवश्यक आहे. यामुळे तुमच्या तब्बेतीत सुधारणा होते आणि रक्तदाबाची समस्यादेखील कमी होते.
रक्तदाब आणि श्वासाच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी हे अत्यंत सोपे आणि साधे उपाय आहेत. तुम्ही याचा नियमित वापर करून तुमच्या तब्बेतीची काळजी घेऊ शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.