गरोदरपणा म्हटलं की सकाळी उठल्यानंतर होणारी मळमळ हा अत्यंत सामाईक विषय आहे. पण हे असं नक्की का होतं? याची कारणं तुम्हाला माहीत आहेत का? मॉर्निंग सिकनेस हा गरोदरपणाशिवायदेखील काही व्यक्तींंना हा त्रास आपल्या रोजच्या आयुष्यात जाणवतो. पण त्याचं प्रमाण कमी असतं. विशेषतः गरोदरपणामध्ये हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. प्रसूतीच्या वेळी मानसिक आणि शारीरिक त्रास जास्त प्रमाणात असतो. सर्वच गरोदर महिलांना या त्रासाला नऊ महिन्यात सामोरं जावं लागतं. Morning Sickness हा प्रत्येक गरोदर महिलेच्या आयुष्यात येणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोणताही विशिष्ट वास सहन न होणं हे गरोदरपणातील मॉर्निंग सिकनेसचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. काही महिलांना तर दिवसात काहीही खाल्लं तरी मळमळतं आणि उलटी होते. त्यालाच मॉर्निंग सिकनेस (Morning Sickness) असं म्हटलं जातं. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये हा त्रास जाणवणं अगदी कॉमन आहे. काही महिलांच्या बाबतीत पहिले तीन महिने झाल्यानंतर हा त्रास आपोआप कमी होतो. पण काही जणींना नऊ महिने हा त्रास तसाच राहातो. जाणून घेऊया नक्की हा त्रास महिलांना गरोदरपणात का जाणवतो.
मॉर्निंग सिकनेस हा तुम्हाला जनरलीदेखील जाणवतो. पण गरोदरपणाच्या काळात हा त्रास जास्त जाणवतो. पण असं नक्की का होतं याची कारणं तुम्हाला माहीत आहेत का? नसतील तर आम्ही तुम्हाला याची कारणं इथे सांगणार आहोत. HCG चं रक्तातील प्रमाण वाढल्यामुळे मॉर्निंग सिकनेससह कोणताही गंध सहन न होण्याचा त्रासदेखील जाणवायला लागतो. तसंच प्रोजस्टोरॉन या हार्मोन्सच्या पातळीची वाढ झाल्यामुळे मळमळ होणे आणि उलटी होण्याचा त्रास जाणवतो. मॉर्निंग सिकनेसचा तुमच्या बाळावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. कारण यामुळे तुमच्या शरीराला एका प्रकाराने टॉक्झिन्सपासून संरक्षण मिळत असतं. कितीही मॉर्निंग सिकनेस असला तरीही तुमच्या बाळाचं नैसर्गिक पोषण होईल अशी व्यवस्था असते. तसंच मॉर्निंग सिकनेसमुळे प्रचंड थकवा जाणवतो. याशिवाय सतत होणारी मळमळ आणि उलटी यामुळे शरीरातील पाण्याची आणि पोटॅशियमचीदेखील पातळी कमी होते. वजन कमी होतं. याचं एक प्रमाण असतं. पण जर एखाद्या महिलेला प्रमाणापेक्षा जास्त मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवू लागला तर अशावेळी तिला डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
मॉर्निंग सिकनेसची काही कारणं आहेत. तुम्हाला फक्त मळमळ आणि उलटी होणारच हे पहिल्यापासून माहीत असतं. पण त्याची नक्की कारणं काय असतात हे जाणून घेण्याची गरज आहे.
गरोदरपणामध्ये हार्मोन्समध्ये प्रचंड बदल होत असतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. मॉर्निंग सिकनेसचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे. हार्मोन्समधील बदल हे तुमच्या मळमळ आणि उलटीला कारणीभूत ठरतात. गरोदरपणामध्ये महिलांचा रक्तातील HCG कमी होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हार्मोन्सवर होऊन मळमळ वाढण्याकडे कल जास्त होतो. तसंच या काळात हार्मोन्स बदलामुळेच महिलांमधील चिडचिडदेखील वाढते.
गरोदरपणाच्या आधी आणि नंतर यकृतामध्ये बराच फरक जाणवतो. गरोदरपणाच्या काळात तुमचं यकृत हे कमकुवत होत असतं. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवतो. वास्तविक हार्मोन्समधील झालेले बदल हे जास्त प्रमाणात यकृतावर दबाव टाकत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो.
गरोदरपणाच्या काळात मानसिक आणि शारीरिक ताण येतोच. हार्मोन्स बदल, अनेक विचार, बाळाचे विचार या सगळ्यामुळे महिलांना ताण येत असतो. नऊ महिन्यात बाळाला पोटात सांभाळणं, वाढतं वजन तसंच बाळासंबंधीचे आणि इतरही अनेक विचार या कालावधीमध्ये महिलांच्या मनात येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनावर तर ताण येतोच. पण बाळाचं वजन जसंजसं वाढू लागतं तसतसं पाय सुजणं, शरीरावर ताणम येणं या सगळ्या गोष्टी होऊ लागतात. इतकंच नाही या ताणामध्ये गरोदर महिला दिवसभर खात राहातात. त्यांना सतत भूक लागली असल्यासारखं वाटत राहातं. हेदेखील मॉर्निंग सिकनेसचं एक कारण आहे. ताणामुळे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पिता उलटी होण्याचं फिलिंग येत राहातं.
बऱ्याच जणांच्या मते गरोदरपणाच्या काळात प्लेसेंटामधून कॅलरी अधिक प्रमाणात बाळाकडे पोहचतात. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळेदेखील मॉर्निंग सिकनेस उद्भवतो. पण हे अभ्यासातून सिद्ध झालेलं नाही. बऱ्याच महिलांच्या बाबतीत गरोदरपणात साखरेची पातळी शरीरातून कमी होत असलेली दिसून येते. त्यामुळे तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवतो. साखरेची पातळी कमी झाल्यानंतर साहजिकच मळमळ होणं अथवा उलटी होण्यासारखे आजार उद्भवतात.
बऱ्याचदा आपण व्यवस्थित आहार घेत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण नीट मिळत नाही आणि त्याचा परिणाम मॉर्निंग सिकनेसवर होतो. तुम्ही गरोदर असल्यानंतर व्यवस्थित आहार घेणं आवश्यक आहे. पण गरोदर नसतानाही तुम्हाला असा त्रास सहन करावा लागू शकतो. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आपलं जेवण वेळेवर होत नाही. त्यात सतत करावी लागणारी धावपळ. या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि त्यामुळे जनरलीदेखील तुम्हाला मॉर्निंग सिकनेसला सामोरं जावं लागतं.
काही जणांना शरीरामध्ये उत्साहाची कमतरता जाणवल्यानंतर मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवतो. यामध्ये तथ्य आहे. बऱ्याचदा आपण सकाळी उठल्यानंतर उत्साह राहिलेला नसतो. अंगात कामामुळे बराच थकवा असतो. त्यामुळे मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवतो. गरोदरपणात तर तुम्हाला हा थकवा सतत जाणवत राहातो. म्हणून पहिले तीन महिने तुमच्या शरीरात अनेक बदल होत असल्याने थकव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये मॉर्निंग सिकनेसचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.
गर्भात मुलगी असल्यास, असा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो असं म्हटलं जातं. हे कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालं नसलं तरीही अनेक जणींचा हा अनुभव आहे. गर्भात मुलगी असल्यास, मॉर्निंग सिकनेस हा जास्त प्रमाणात जाणवतो. तसंच तुम्ही अधिक थकता आणि तुम्हाला सतत मळमळ जाणवत राहाते. कधीतरी हा त्रास मुलांच्या बाबतीतही होतो. काही महिलांना गर्भात मूल असलं तरी नऊ महिने हा त्रास जाणवत राहतो.
पहिल्या तीन महिन्याच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे शरीरातील अनेक टॉक्झिन्स बाहेर फेकले जातात. बाळ आपल्या आजूबाजूची सर्व जागा स्वच्छ करून घेत असतं. त्यामुळे तुमच्या पोटातील जितके खराब पदार्थ आहेत ते असे मॉर्निंग सिकनेसद्वारे बाहेर येतात. त्यामुळेच या काळात तुम्हाला अनेक पदार्थांचा गंधही सहन होत नाही. तसंच काही पदार्थांच्या गंधामुळे तुम्हाला उलटी होते.
तसं तर तुम्ही कितीही उपाय केलेत तरीही नऊ महिन्यात कधीही मॉर्निंग सिकनेस जाणवू शकतो. त्यावर तुम्ही अगदी ठोस उपाय करू शकत नाही. पण त्रास कमी होण्यासाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता. काय आहेत हे उपाय पाहूया -
मॉर्निंग सिकनेसच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपायदेखील करता येतील. त्याची माहिती पुढीलप्रमाणे -
तुम्हाला मॉर्निंग सिकनेस घालवायचा असेल तर काही सोपे उपाय आहेत. त्यापैकी हा सोपा उपाय तुम्ही करून पाहू शकता. यासाठी तुम्ही साधारण 1 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये 1 चमचा कच्चं अॅप्पल साईड व्हिनेगर, 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा मध हे घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. संपूर्ण दिवसभर हे तुम्ही थोडं थोडं पित राहा. यामुळे मॉर्निंग सिकनेस कमी होतं.
गरोदरपणात मॅग्नेशियमची शरीराला अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे अशावेळी तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक गोष्टीचा पुरवठा करणं गरेजचं असतं. तुमच्या शरीराला मॅग्नेशियम मिळावं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅग्नेशियमच्या गोळ्या घ्या किंवा तुम्ही मॅग्नेशियम ऑईलने तुमच्या शरीरावर मसाज करून तुमच्या शरीरामध्ये ते तेल व्यवस्थित मुरवू शकता. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही मीठाच्या पाण्याने आंघोळ करूनदेखील थकवा घालवून मॉर्निंग सिकनेस कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.
मळमळ घालवण्यासाठी तुम्ही तुमची पचनशक्तीची प्रक्रिया योग्य करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही मळमळ होणं अथवा उलटी होणं हे प्रकार थांबवू शकता. मसालेदार पदार्थ खाणं शक्यतो टाळा. तसंच जास्तीत जास्त भाज्यांचा आणि फळांचा तुमच्या खाण्यात उपयोग करून घ्या. जेणेकरून तुमची पचनक्रिया सुरळीत होईल. गरोदरपणात तुम्हाला तुमच्या पोटावर जास्त ताण देता येत नाही. तसंच तुम्हाला पोटात सतत गॅस होईल अशा प्रकारचे पदार्थ खाणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः जितकी जास्त काळजी घेता येईल तितकी घ्या, म्हणजे मॉर्निंग सिकनेसचा त्रास आपोआप कमी होईल.
नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश
कोणतीही मळमळ थांबवण्यासाठी पेपरमिंट हा चांगला नैसर्गिक उपाय आहे. तुम्ही चहामधून अथवा कोणत्याही नैसर्गिक कँडीमधून मिळणारं पेपरमिंट खाल्ल्यास, तुम्हाला मॉर्निंग सिकनेसच्या त्रासातून सुटका मिळू शकते. शिवाय हे कोणतंही कडू औषध नाही त्यामुळे तुम्हीदेखील ते मजेत खाऊ शकता.
आलं हे मॉर्निंग सिकनेसवरील रामबाण उपाय आहे. अगदी गरोदरपणाव्यतिरिक्तदेखील आपल्याला मळमळू लागलं अथवा उलट्यांचा त्रास होऊ लागला की, सर्वात पहिलं घरगुती औषध सुचतं ते म्हणजे आलं. पण हे पदार्थांमध्ये मिक्स करून खाणंच योग्य आहे. तुम्ही आल्याची स्मूदी अथवा आलेपाक खाऊन तुमचा मॉर्निंग सिकनेस घालवू शकता. यामुळे तुमच्या तोंडाला एक वेगळी चव येते आणि आल्यातील अँटिबायोटिक गुणांमुळे तुमची मळमळ थांबते.
बटाटा हे नाव वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. पोटातील अधिक वाढलेलं अॅसिड शोषून घेण्यास बटाट्याची मदत होते. त्यामुळे तुम्हाला जर मॉर्निंग सिकनेस जाणवत असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा अथवा बटाट्याचा कोणताही खाण्याचा पदार्थ खावा. पण त्यामध्ये मसाला जास्त असू नये. बटाट्याने तुमच्या पोटातील अॅसिड निघून जाण्यास मदत मिळते.
मॉर्निंग सिकनेसचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी हा अतिशय सोपा उपाय आहे. तुमचे प्रेशर पॉईंट्स जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दर दोन तासांनी तुम्ही तुमच्या प्रेशर पाईंंट्सवर प्रेशर देऊन दोन मिनिट्स तसंच राहा. यामुळे तुमचा मॉर्निंग सिकनेस कमी होण्यास मदत होईल. नक्की कोणता प्रेशर पॉईंट निवडायचा असाही आता तुम्हाला प्रश्न येईल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पायाचा अंगठा, तुमचे कॉलरबोन, तुमच्या मनगटावरील हाड या तीन पॉईंंटवर प्रेशर दिल्यास, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
गरोदरपणामध्ये काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. काही महिलांना औषधांची अलर्जी असते. अशावेळी होमिओपथी गोळ्या अथवा औषधांनी तुम्ही तुमचा मॉर्निंग सिकनेस कमी करू शकता.
गरोदरपणाच्या काळात विटामिन्स हार्मोन बदलामुळे कमी होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही विटामिन बी6 गोळी खाऊ शकता. पण याचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करा. तसंच ही गोळी काही कालावधीसाठीच तुम्ही सेवन करू शकता. सतत ही गोळी तुम्ही खाणं योग्य नाही.
मॉर्निंग सिकनेस हे कमकुवत यकृतामुळे अधिक प्रमाणात वाढतं. त्यामुळे तुम्ही यकृताला सपोर्ट करणाऱ्या अन्नपदार्थांचं सेवन करा. तसंच तुम्ही घेत असणारी औषधं तुमच्या यकृताला व्यवस्थित सपोर्ट देत आहेत की नाही ते बघा.
मॉर्निंग सिकनेस ही गरोदरपणातील कॉमन बाब आहे. तुमच्या शरीरातील हार्मोन्स बदल होत असल्यामुळे पहिले तीन महिने तरी किमान हा त्रास होतोच. त्याबद्दल प्रत्येक महिलेची मानसिक तयारी असते. पण तरीही त्याचा त्रास हा होतोच.
पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मॉर्निंग सिकनेस हा नियमित असतो. पण काही गरोदर महिलांच्या बाबतीत मात्र हा त्रास नऊ महिने टिकून राहातो.
असा कोणताही उपाय नाही. तुम्हाला याचा सामना करावाच लागतो. पण त्याचा त्रास कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते करून तुम्ही त्याचा स्वतःला होणारा त्रास कमी करून घेऊ शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
देखील वाचा -
गर्भधारणा कशी टाळावी, उपाय आणि माहिती (How To Avoid Pregnancy In Marathi)