10 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा

10 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा

मेष - उधार देऊ नका

आज कोणालाही उधार देऊ नका. कमी वेळात जास्त कमावण्याचा प्रयत्न महागातत पडेल. तुमच्या खिषातील पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीत मन रमेल. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. 


कुंभ - मुलांकडून आनंदवार्ता मिळेल

आज तुम्हाला मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. एखाद्या गरजूला मदत केल्यामुळे आत्मसमाधान मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यतीसोबत भेट होण्याची शक्यता आहे. 


मीन - नवीन नोकरी मिळेल

आज तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील लोकांना यश आणि मानसन्मान मिळेल. सामाजिक कल्याणकारी योजनांमध्ये भाग घ्याल. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळेल. 


वृषभ - आरोग्य चांगले असेल

आज जीवनशैलीत केलेले बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कामच्या ठिकाणी तुमच्या कार्यकुशलेचे कौतुक होईल. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. जोडीदाराशी नातेसंबंध मधूर होतील. 


मिथुन - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज तुमच्या कौटुंबिक ताणाचा परिणाम घरातील लोकांवर जाणवेल. भागिदारीची कामे करण्यापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणीसहकाऱ्यांच्या व्यवहारामुळे तणाव जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न आणि खर्चावर समतोल राखा. 


कर्क - पोटाच्या समस्या जाणवतील

पोटदुखीमुळे त्रास होईल. अज्ञात भिती जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक पक्ष मजबूत राहील. राजकारणातील रस वाढणार आहे. प्रवासाला जाणे टाळा. विरोधकांचा विरोध जाणवणार आहे. 


सिंह - अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायिक नव्या योजना सफळ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल.


कन्या - जोडीदाराशी भेट होईल

मनासारखा जोडीदार भेटेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. विरोधक नमतील. इतरांच्या सहकार्यांने यश मिळेल. 


तूळ - महत्त्वाची कामे रखडणार आहेत

आज तुमच्या आळसामुळे महत्त्वाची कामे रखडणार आहेत. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागतील. जुन्या मित्रांची भेट होईल. प्रवासाला जाणे टाळा. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. 


वृश्चिक - जोडीदाराकडून महागडे गिफ्ट मिळेल

आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादे महागडे गिफ्ट मिळेल. वाहनसुखात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक कामातील गती वाढेल. कुटुंबात एखादा कठोर निर्णय घ्यावा लागेल. प्रयत्नांना यश मिळेल. 

 

धनु - लोकांशी बोलण्यात अडचणी येतील

आज तुम्हाला लोकांशी बोलताना अडचणी येतील. व्यवसायातील मंद गतीचा त्रास होण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त आणि फायदा कमी होईल. महत्त्वाचे रखडलेली कामं पूर्ण होतील. मित्रांची मदत मिळणार आहे. 


मकर - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला आरोग्याबाबत छोट्या मोठ्या समस्या जाणवतील. वाहन चालवताना सावध राहा. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. जोडीदाराशी नाते दृढ होईल. विवाहाचा योग आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर