13 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीचा मानसिक त्रास कमी होईल

13 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीचा मानसिक त्रास कमी होईल

मेष -  मुलांमुळे चिंता वाढणार आहे

मुलांमुळे चिंता वाढणार आहे. आज व्यावसायिक अथवा कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 


कुंभ -  लाभाची नवीन संधी मिळेल

आज तुम्हाला लाभाची एखादी नवीन संधी मिळेल. वादन अथवा जमीन खरेदीची योजना आखाल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळेल. 


मीन - विद्यार्थी निराश होतील

आज विद्यार्थ्यांना निराशा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अथवा व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणूकीचा निर्णय सध्या काही काळापूरता टाळा. देणी  घेणी सुधारणार आहेत. 


वृषभ - जोडीदारासोबत सामाजिक समारंभात सहभाग घ्याल

जोडीदारासोबत सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. व्यावसायिक वाढ होणार आहे. नवीन संबंधांंमुळे भविष्यात लाभ मिळेल. घर बदलण्याचा सुखद योग तुम्हाला मिळणार आहे. 


मिथुन - व्यावसायिक प्रवासाचा योग आहे

आज तुम्हाला व्यावसायिक प्रवासाला जाण्याचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिक कार्यकुशलेने काम करा. राजकारणातील नवीन जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नवीन योजनांकडे पुरेसे लक्ष द्या. प्रेमसंबंध चांगले होतील. 


कर्क - एखादी मौल्यवान वस्तू खराब होईल

आज तुमच्याकडून एखादी मौल्यवान वस्तू खराब होण्याची शक्यता आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीसोबत देणी घेणी करू नका. महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत नातेसंबंध मजबूत होतील. 


सिंह - मानसिक ताणतणाव कमी होतील

आज तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळेल. मुलांना खेळात प्राविण्य मिळेल. एखादा नवा प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 


कन्या - कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे

आज तुमचा वारसाहक्काच्या संपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कटू बोलण्यामुळे लोक नाराज होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. सहज वाटणारी कामे पूर्ण करण्यात अपयश येईल. 


तूळ - आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज वातावरणातील बदलांमुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन रमवा. कामाच्या ठिकाणी एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. घर खरेदी करण्यात यश मिळेल. 


वृश्चिक - उत्पन्नाचे नवे साधन मिळेल

तुमचे भाग्य आज तुम्हाला साथ देण्याची शक्यता आहे. उत्पन्नचा नवा स्त्रोत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न होऊ शकते. एखादा पार्ट टाईम व्यवसाय सुरू कराल. प्रिय व्यक्तीशी भेट होईल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. 


धनु - नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुमच्या नात्यातील कटूपणा संपणार आहे. नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात मन रमवा. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. 


मकर - मेहनत अधिक आणि लाभ कमी मिळेल

आज तुमचे कामात असलेले दुर्लक्ष तुम्हाला महागात पडणार आहे. एखादे काम अचानक रद्द होऊ  शकते. व्यवसायासाठी मेहनत घ्यावी लागेल. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. सामाजिक समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. 

अधिक वाचा -

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का