15 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीला नोकरीची नवी संधी मिळेल

15 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीला नोकरीची नवी संधी मिळेल

मेष - रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता 

आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. खर्चात कपात करावी लागेल. मुलांसोबत वेळ घालवा. विरोधकांना मात देण्यात यश येईल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 


कुंभ - प्रेम प्रस्ताव मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला एखादा प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी भेट सुखकारक असेल. कामाच्या ठिकाणी उन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होईल. विनाकारण वाद घालू नका. 

 

मीन - चांगली संधी मिळेल

आज तरूणांना एखादी चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. धुर्त लोकांपासून सावध राहा, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

वृषभ - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. प्रोफेशनल कामात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. वादविवादापासून दूर राहा. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 


मिथुन - पोट दुखीचा त्रास जाणवेल

आज बाहेरच्या खाण्यामुळे तुमचे पोट बिघडणार आहे. पोटाच्या समस्या जाणवू शकतात. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे निराश व्हाल. प्रेमसंबंध मजबूत होतील. 


कर्क - प्रेमाची जाणिव होईल

आज तुम्हाला प्रेमाची जाणिव होणार आहे. मुलांकडून आनंदवार्ता समजेल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता आहे.

 

सिंह - नोकरीची नवी संधी मिळेल

आज तुम्हाला एखाद्या नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. राजकारणातील प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात आलेल्या समस्या दूर करण्यात यश मिळेल. देणी-घेणी सावधपणे करा. 


कन्या - धनसंबधीत समस्या येण्याची शक्यता 

आज तुम्हाला एखादी आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे. पैशांबाबत जोखिम घेऊ नका. कर्ज घेणे टाळा. ताणतणावामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी  कार्यकुशलतेने काम केल्याने फायदा होईल. 


तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

दीर्घ आजारपणातून तुम्ही लवकर बरे व्हाल. जीवनशैलीत बदल करावे लागतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. आत्मविश्वास वाढणार आहे. विरोधकांपासून सावध राहा. विद्यार्थ्यांना शिक्षकांची साथ मिळेल. 


वृश्चिक - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज तुमचे शेजारी अथवा एखाद्या मित्रासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा अनादर करू नका. वादविवादापासून दूर राहा. व्यवसायात नवीन कामे मिळतील. 


धनु - गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त व्हाल

आज तुम्हाला पाय अथवा गुडघ्याचा त्रास जाणवणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात यश मिळेल. विवादास्पद गोष्टींपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. 


मकर - रखडलेले धन मिळण्याची शक्यता

आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन कामाला सुरूवात कराल. वाहन चालवताना सावध राहा. देणी घेणी सांभाळून करा. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर