17 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी दिवस प्रेमाचा

17 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी दिवस प्रेमाचा

मेष - प्रेमाबाबत सुखद अनुभव मिळेल

आज तुमच्या प्रेमसबंधाबाबत तुम्हाला एखादा सुखद अनुभव मिळणार आहे. समजून घेण्याची वृत्ती ठेवा. मनातील गोष्टी मोकळेपणाने बोला. प्रतिष्ठित लोकांसोबत ओळख होईल. कोर्ट कचेरीत यश मिळेल. 


वृषभ - नवीन कामे सुरू करणे टाळा

आज कोणतेही नवे  काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा केल्यामुळे कामे बिघडू शकतात. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. 

मिथुन - जोडीदाराकडून सरप्राईझ मिळेल

आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सरप्राईझ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. इतरांची मदत करावी लागेल. देणी-घेणी सांभाळून करा. 


कर्क - व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता

आज तुमच्या व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाजू मजबूत होईल. सामाजिक कार्यात रस वाढणार आहे. कोैटुंबिक संबंध चांगले होतील. 


सिंह - पायदुखी अथवा गुडघ्यांचा त्रास होण्याची शक्यता

आज तुम्हाला पायदुखी अथवा गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. स्वभावात चिडचिडेपणा येईल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा अथवा परिक्षेत यश मिळेल. 


कन्या - प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला एखादा प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. 


तुला - व्यवसायातील अडचणी दूर होतील

नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नवीन योजना यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. भाषा अथवा अभिनयक्षेत्रात यश मिळेल. 


वृश्चिक - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कमी वेळात जास्त कमावण्याचा प्रयत्न करू नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. प्रेमात यश मिळेल. बिघडलेली कामे सुधारणार आहेत. 


धनु - मानसिक तणाव दूर होईल

आज तुमचा मानसिक तणाव कमी होईल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्थिती अनुकूल असेल. व विरोधक नमतील. 


मकर - मित्र त्रास देतील

आज तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. विवाहात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या येऊ शकतात. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात दुर्लक्ष करून चालणार नाही. 


कुंभ - आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज ब्लड प्रेशर अथवा शुगरचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. जोडीदारासोबत आनंदाचा काळ आहे. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना सावध राहा. 


मीन - कौटुंबिक संपत्ती मिळेल

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि पैसे मिळतील नातेसंबंध मजबूत होतील.  

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव