2 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या उत्पन्नात वाढ

2 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, धनु राशीच्या उत्पन्नात वाढ

मेष - विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकेल

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. एखादी नवी योजना आखणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोध जाणवणार आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी निराश होतील. राजकारणातील रस वाढणार आहे. 


कुंभ -  विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होणार आहे. कस्टमर सर्व्हिसशी निगडीत काम करणाऱ्या लोकांना समस्या येतील. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांची साथ मिळेल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. 


मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाला सुरूवात कराल. जोडीदाराच्या व्यवहाराचा त्रास होईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन कामे मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 


वृषभ - तणाव वाढण्याची शक्यता आहे

आज तुमच्या कामातील समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत करा. उत्पन्नांचे साधन वाढणार आहे. रचनात्मक कार्यातून मानसन्मान आणि धन मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढेल.


मिथुन - कौटुंबिक संबंध मजबूत होतील

आज तुमचे कौटुंबिक संबध अधिक मजबूत होणार आहेत. कोणतीही समस्या असली तरी कुटुंबासोबत उभे राहा. जेण्या घेण्याचे व्यवहार सुटणार आहेत. तरूणांना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सामाजिक मानसन्मान वाढणार आहे. 


कर्क -  रचनात्मक प्रयत्न यशस्वी होतील

व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणार आहे. राजकारणातील महत्त्वकांक्षा वाढेल. रचनात्मक प्रयत्न सफळ होतील. आर्थिक बाजू मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


सिंह - देणी घेणी करताना सावध राहा

आज तुम्हाला व्यवहारात धोका होण्याची शक्यता  आहे. व्यावसायिक कामे रद्द झाल्यास नुकसान होऊ शकते. वाद विवाद करणे टाळा. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल. 


कन्या - आरोग्य सुधारेल

आज तुम्हाला दीर्घ आजारातून सुटका मिळेल. घरातील लोकांसोबत वेळ घालवा. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. घाईघाईत कोणतेच काम करू नका. 


तूळ-  नातेवाईक अथवा शेजाऱ्यांकडून त्रास जाणवेल

आज तुम्हाला नातेवाईक अथवा शेजाऱ्यांकडून तणाव मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास सुखाचा होईल. धुर्त लोकांपासून सावध राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्नात समतोव राखा. 


वृश्चिक - आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज तुमची दगदग होणार आहे. नकारात्मक विचारसरणीचा परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल.

धनु - उत्पन्नाचे साधन वाढेल

आज तुमच्या वाहनसुखात वाढ होईल. उत्पन्नाचे साधन वाढेल. व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. 


मकर -  नातेसंबंध सुधारतील

आज तुमच्या नातेसंबंधांंमध्ये सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी साथ देतील. राजकारणातील महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. मित्रांसोबत प्रवासाला जाल.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी