20 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला भेटवस्तू मिळतील

20 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला भेटवस्तू मिळतील

मेष - तणाव वाढण्याची शक्यता 

आज सासरच्या लोकांकडून ताणतणाव वाढणार आहे. महत्त्वांचा निर्णय घेण्याची थोडा वेळ घ्या. प्रेमसंबंधांत कोणतेही वचन देऊ नका. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सहकार्यांचा तणाव वाढणार आहे. 


कुंभ - एखादी नवीन गोष्ट आज सुरू करू नका

आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. तुमच्या आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता  आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रेमात त्रिकोण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 


मीन - मानसिक स्थिती सुधारेल

आज तुमची मानसिक स्थिती सुधारणार आहे. काहीतरी नवीन करण्याचा उत्साब जाणवेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अचानक धनलाभाचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


वृषभ - एखादी अज्ञात भिती सतावेल

एखादी अज्ञात भिती जाणवणार आहे. दुखापत होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. 


मिथुन - मौल्यवान भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला व्यवसायात नवीन कामे मिळतील. जोडीदाराकडून मौल्यवान भेटवस्तू मिळणार आहेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. कौटुंबिक सुखसुविधा वाढणार आहेत. 


कर्क - एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमाची जाणिव होईल

आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार आहात. जुने वाद घरातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने मिटणार आहेत. विचारपूर्वक गुंतवणूक करा. बिघडलेली कामे पूर्ण होतील. अधिकारी कौतूक करतील. सामाजिक मानसन्मान वाढणार आहे. 


सिंह - कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. तणावाच्या अधीन जाऊ नका. कामे करण्यात अडचणी येतील. एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. 


कन्या - संपत्ती मिळण्याची शक्यता


आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील ओळखी वाढतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मित्रांसोबत मौजमस्तीचा प्लॅन आखाल. 


तूळ - कामे रद्द होण्याची शक्यता 

मुलांच्या भविष्याची चिंता सतावणार आहे. व्यवसायात खोटं बोलण्यामुळे तुमचे एखादे काम रद्द होऊ शकते. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध एखादी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - आईला शारीरिक त्रास होईल

आज तुमच्या आईला शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. दिनक्रमात बदल होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. महत्त्वाची कामे करण्यात दुर्लक्षपणा करू नका. 


धनु - जोडीदाराशी नाते मजबूत होईल

आज विवाहाबाबत तुम्हाला एखादी आनंदवार्ता समजेल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याचा योग आहे. घरातील लोकांच्या शारीरिक अथवा मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट कचेरीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढणार आहे. 


मकर - विद्यार्थ्यांना यश मिळेल

आज सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. तरूणांना नवीन टेकनिकमध्ये रस वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 

अधिक वाचा -

कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी