मेष - जोडीदाराचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल
आज तुमच्या जोडीदाराचा हेल्थ रिपोर्ट चांगला असेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. जोखिमेची कामे करू नका. इतरांची मदत केल्यामुळे आनंद मिळेल.
कुंभ - आज पदोन्नतीचा योग आहे
आज तुम्हाला मनासारखे यश मिळणार आहे. काम करताना आळस टाकून मेहनत घ्या. तुम्हाला आज चांगले यश मिळू शकते. पदोन्नतीची संधी मिळेल. राजकारणातील लोकांना दिवस यशाचा असेल.
मीन - आर्थिक संकट येण्याची शक्यता
आज तुमचे एखादे मौल्यवान सामान तुटण्याची शक्यता आहे. अचानक एखादे काम रद्द होऊ शकते. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ - प्रेमसंबंधात वाद निर्माण होण्याची शक्यता
आज प्रेमसंबंधात वाद होऊ शकतात. जबाबदाऱ्या पूर्ण न करता आल्यामुळे दुःखी राहील. वादविवाद करू नका. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. एखादे काम अर्धवट राहील.
मिथुन - आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे
आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थितीत समतोल राखा. विद्यार्थ्यांना करियरमध्ये यश मिळेल.
कर्क - घर खरेदी करण्याची योजना आखाल
आज तुम्ही नवीन घर खरेदी करण्याची योजना आखाल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह - प्रेमयुगूलांसाठी दिवस आनंदाचा असेल
आज तुमच्यासाठी दिवस चांगला असेल. राजकारणात यश मिळेल. नवीन व्यावसायिक भागिदारांची भेट होईल. व्यवहारात यश मिळेल. सामाजिक लोकप्रियता मिळेल.
कन्या - नोकरीसाठी दगदग करावी लागेल
आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी दगदग करावी लागेल. व्यावसायिक कामे पूर्ण करण्यासाठी दुर्लक्ष करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची साथ मिळेल.
तूळ - व्यवसायात लाभ मिळेल
आज तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत दिवस आनंदाचा असेल. बजेटमध्ये घर मिळेल. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील.
वृश्चिक - विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील
आज विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनासारख्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या वाढणार आहेत. मित्रांसोबत व्यावसायिक प्रवासाला जाण्याचा योग आहे.
धनु - आरोग्य स्थितीत चढ-उतार येण्याची शक्यता
आज तुमच्या आरोग्य स्थितीत चढ-उतार येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यवसायाबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. कोर्ट कचेरीमधुन आराम मिळेल.
मकर - वाद संपणार आहेत
आज तुमचे कौटुंबिक वाद संपणार आहेत. विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कौशल्यामुळे प्रभावित होतील. नियोजित कामे पूर्ण होतील.
अधिक वाचा -
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी