23 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीसाठी दिवस आनंदाचा

23 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीसाठी दिवस आनंदाचा

मेष - पदोन्नतीचा योग आहे

आज तुमचे भाग्य तुमच्यासोबत आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. योग्यता आणि कामातील कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.


कुंभ - जोडीदाराची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग करावी लागेल. नकारात्मक विचारापासून दूर राहा. विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. 


मीन - जोडीदारासोबत नाते रोमॅंटिक असेल

आज तुमचे जोडीदारासोबत नाते रोमॅंटिक असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कार्यक्षमतेत वाढ होईल. सामाजिक कार्यातील रस वाढेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. देणी घेणी सांभाळून करा. 


वृषभ - मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता

आज तुमच्या दुर्लक्षपणामुळे एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करू नका. आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


मिथुन - आरोग्य चांगले राहील

आज तुमचे आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. विरोधकांचा त्रास कमी होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक आणि सहकारी प्रशंसा करतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. 


कर्क - प्रेमात निराशा येण्याची शक्यता

आज तुम्हाला प्रेमात निराशा येण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्रांच्या चांगुवपणावप शंका येण्याची शक्यता आहे. भावंडासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. देणी घेणी सांभाळून करा. 


सिंह - कफाचा त्रास होऊ शकतो

आज तुम्हाला सर्दी, खोकला होण्याची शक्यता आहे. सावधपणे कामे करा. कामाच्या ठिकाणी नवीन  जबाबदारी मिळेल. धार्मिक कार्यात मन रमणार नाही. प्रिय व्यक्तीला विवाहाबाबत मागणी घालण्याची शक्यता आहे. 


कन्या - उत्पन्नाचे साधन मिळेल

आज तुमचे भाग्य तुमच्यासोबत आहे. रखडलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे साधन मिळेल. नवीन कामात यश येईल. मैत्रीणीवर पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. मित्रांशी भेट होईल. 


तूळ - सुखद काळ येणार आहे

आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत सुखाचे क्षण घालवाल. एखाद्याचे लक्ष स्वतःकडे खेचण्यात यश मिळेल. समस्या सुटतील. अनावश्यक खर्च करू नका. राजकारणात लाभ मिळण्याची शक्यता आहे.


वृश्चिक - विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकण्याची शक्यता

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भरकटणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक बाबतीत मन कन्फुज होऊ शकते. मित्रांच्यासोबत सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. 


धनु - धनसंपत्तीचे नवीन साधन मिळेल

आज तुम्हाला धनसंपत्तीचे नवीन साधन मिळण्याची शक्यता आहे. व्यवहार आणि रचनात्मक कार्यात फायदा होईल. जोडीदाराशी नाते मजबूत असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. 


मकर - व्यवसायात चढ-उतार येतील

आज मुलांना करिअरमध्ये समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वागणूकीमुळे समस्या येतील. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. धनलाभाचा आणि पर्यटनाचा योग आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी