24 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

24 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळेल यश

मेष -  नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुम्ही नव्याने प्रेमात पडाल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रचनात्मक कार्यातून धन आणि मान दोन्ही मिळेल. 


कुंभ - नोकरीत समस्या  येण्याची शक्यता 

आज कामाच्या ठिकाणी तुमच्या दुर्लक्षपणामुळे अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे. जोखिमेच्या कामांपासून दूर राहा. धार्मिक प्रवासयात्रेला जाण्याची शक्यता आहे. विनाकारण  समस्येमध्ये अडकू नका. 


मीन - वातावरणाच्या बदलांचा त्रास होईल

आज वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. सर्दी- खोकला होऊ शकतो. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत झालेली भेट  आनंददायी असेल. 


वृषभ - ध्येय प्राप्त होण्यात मिळेल यश

आज विद्यार्थ्यांना नियोजित लक्ष्य साध्य करण्यात मिळेल यश. नवीन कामासाठी  प्रवास करावा लागेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत केलेला प्रवास सुखकर असेल. 


मिथुन - आर्थिक स्थिती मजबूत असेल

आज उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे करणे टाळा. आज तुमच्या नात्यातील लोकांसोबत आर्थिक व्यवहार करू नका. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. एखादी आनंदवार्ता कानावर पडेल.


कर्क - शारिरीक स्वास्थ चांगले राहील

आज तुम्हाला शारीरिक स्वास्थ मिळेल. दिवसभर फ्रेश वाटेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेमसंबंध सुधारतील. कौटुंबिक मंगल कार्याची योजना आखाल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


सिंह - भावंडासोबत वाद होण्याची शक्यता 

आज तुम्हाला व्यवसायात धोका मिळू शकतो. प्रॉपर्टीवरून भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमवा. खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे. 


कन्या - आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज तुम्हाला डोळ्यांच्या अथवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रीय होण्याचा योग आहे. वादविवादांपासून दूर राहा. जोडीदारासोबत नाते संबंध मजबूत होतील. 


तूळ - घर खरेदीचे स्वप्न पूर्ण 

आज तुमचे घर खरेदीचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. घरातील सुखसमृद्धीत वाढ होईल.  जोडीदारासोबत शॉपिंग करण्याचा योग आहे. मनाविरूद्ध प्रवास करावा लागू शकतो. 


वृश्चिक - मुलांचे विवाह जुळतील

प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल आहे. मुलांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.रचनात्मक कार्यात रस वाढेल. बिघडलेली कामे सुधारतील. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. 


धनु - व्यावसायिक प्रगतीचा वेग कमी होईल

आज व्यावसायिक प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भरकटणार आहे. कामाच्या ठिकाणी भावनिक ताणतणाव वाढेल. धुर्त लोकांपासून सावध राहा. 


मकर - उत्पन्नाचे साधन वाढेल

आज तुम्हाला जोडीदाराच्या सहकार्यांमुळे धनलाभ होण्याची  शक्यता आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अभ्यासात यश मिळेल. मित्रांसोबत झालेली भेट सुखकारक असेल. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी