25 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला मिळेल नवीन नोकरी

25 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला मिळेल नवीन नोकरी

मेष - जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहार आणि नियमित जीवनशैलीत सावध राहा. कामात समस्या येतील काम पूर्ण करणं कठीण जाईल.उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. 


कुंभ - धनलाभ आणि धनसंपत्तीत वाढ

आज तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होईल. वाहन अथवा सोने खरेदीचा योग आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. घरातील वृद्धांची काळजी घ्या. देणी घेणी सांभाळून करा. 


मीन - महत्त्वाचे निर्णय त्वरीत घ्या

आज व्यवसायात एखादी छोटीशी चुक महागात पडू शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा निर्णय त्वरीत घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 


वृषभ - नवीन मित्र तयार कराल

आज तुमचे मन खुश होणार आहे. जे लोक तुमचा विरोध करत होते तेच लोक तुम्हाला सहकार्य करतील. नवीन मित्र निर्माण होतील. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 


मिथुन - नोकरी मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामात गती येईल. क्रीड क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. 


कर्क - लोन अथवा कर्ज घेऊ नका

आज कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला अधिक खर्च पडण्याची शक्यता आहे. कोणतेही लोन अथवा कर्ज घेऊ नका. कारण ते फेडणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. 


सिंह - आरोग्य उत्तम राहील

आज घरगुती उपचारांमुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे. घरातील वातावरण आनंदाचे आणि समाधानाचे असेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. कोर्ट कचेरीतील समस्या वाढण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


कन्या - ताणतणाव वाढेल

आज जोडीदारासोबत तुमचा तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे निर्णय घेणं कठीण जाईल.मित्रांसोबत सहकार्याने वागा. 


तूळ - शारीरिक थकवा जाणवेल

आज तुम्हाला शारीरिक थकवा आणि दगदग जाणवेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एखाद्या संस्थेकडून मानसन्मान मिळेल. ओळखींचा फायदा होईल. 


वृश्चिक - अचानक धनलाभाचा योग आहे

आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील सजावट कराल. प्रियकरासोबत शॉपिंगला जाल. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. व्यावसायिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. 


धनु - जोडीदाराची व्यवसायात मदत होईल

आज तुमच्या जोडीदारामुळे व्यवसायात वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत असलेले मतभेद दूर होतील. बिघडलेली कामे सहज पूर्ण होतील. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 


मकर - दुर्लक्षपणा केल्यामुळे व्यवसायात नुकसान होईल

आज कामाबाबत केलेल्या दुर्लक्षपणामुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची वागणूक त्रासदायक ठरू शकते. वादविवाद दूर होतील. मित्रांसोबत मौजमस्ती कराल.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी