27 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मेष राशीला पैशांबाबत मिळेल खुशखबर

27 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मेष राशीला पैशांबाबत मिळेल खुशखबर

मेष - पैशांबाबत चांगली बातमी मिळेल

आज पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. वाहनसुखात वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.रचनात्मक कार्यात प्रगती होईल. व्यावसायिक कामे मिळण्याची शक्यता आहे.


कुंभ -  अचानक झालेली भेट नात्यात बदलण्याची शक्यता

आज अचानक झालेली भेट नातेसंबंधांमध्ये बदलू शकते. कौटुंबिक नियोजनामुळे नात्यातील दूरावा कमी होईल. आधूनिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.

 

मीन -  दुर्लक्षपणा करू नका

आज कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. कामातील ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. जोखीमेच्या कामांपासून दूर राहा. रखडलेली कामे मित्रांमुळे पूर्ण होतील. जोडीदाराशी नाते मजबूत होणार आहे. 


वृषभ - कामाचा शोध घ्यावा लागेल

आज तुम्हाला नवीन कामाचा शोध घ्यावा लागेल. व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यका आहे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे कामात सुधारणा होईल. आळसाचा त्याग करावा लागेल. महत्त्वाची कामे पूर्ण करा. 


मिथुन - मन उदास आणि निराश असेल

आज तुमचे मन उदास  आणि निराश असेल. कामाच्या ठिकाणी नवीन समस्या येऊ शकते. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. देणी घेणी सांभाळून करा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


कर्क - विवाह योजना आखाल

आज तुमचा विवाह ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात राजकीय साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


सिंह - राजकीय क्षेत्रात प्रगती होईल

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. नवीन जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. रखडलेली कामे सहज पद्धतीने पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. 


कन्या - खर्च वाढण्याची शक्यता आहे

आज दिखावा करण्याच्या प्रयत्नात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण खर्च करणे टाळा. आर्थिक स्थिती बिघडू शकते.सामाजिक कार्यात व्यस्त राहणार आहात. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


तूळ - वडीलांच्या तब्येतीत सुधारणा होईल

आज तुमच्या वडीलांची तब्येत सुधारणार आहे. जुन्या आजारापासून सुटका होईल. मानसिक स्वास्थ लाभणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ओळखींचा फायदा होईल. सक्रीय राजकारणात सहभाग घ्याल. 


वृश्चिक - प्रेमात निराशा पदरी पडेल

आज तुमची प्रेमात निराशा होणार आहे. विरोधकांचा त्रास वाढू  शकतो. सावधपणे काम करा. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता  आहे. विनाकारण दगदग करणे टाळा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्यांचा त्रास होईल. 


धनु - शारीरिक थकवा जाणवेल

आज तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार आहे. जोडीदाराची चिंता सतावेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मानामध्ये वाढ होईल. 


मकर - शेअर मार्केटमध्ये लाभ होईल

आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने व्यवसायात लाभ होईल. रखडलेले पैसे परत मिळतील. चल अचल संपत्ती खरेदी कराल. परदेशी प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर