30 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला धनलाभ

30 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला धनलाभ

मेष - मौल्यवान भेटवस्तू मिळतील

आज सासरच्या मंडळींकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतील. देणी घेणी सांभाळून करा. नवीन व्यावसायिक संबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती अथवा पगारवाढ होईल. 

वृषभ - जोडीदारासोबत भेट होईल

आज तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट होईल. खास व्यक्तीसोबत लॉंग ड्राईव्हला जाल. विरोधक त्रास देतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणात व्यस्त राहाण्याची शक्यता आहे. 


मिथुन - जास्त मेहनत घ्यावी लागेल

आज विद्यार्थ्यांना करिअरसाठी मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. चुका होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. 


कर्क - रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुम्हाला धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील लोकांना विशेष सन्मान आणि भेटवस्तू मिळतील. नवीन कामांना सुरूवात होण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. 


सिंह - विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकेल

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकेल. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मित्रांची साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडे लक्ष द्या.

कन्या - अज्ञात भिती जाणवेल

आज तुमचे मन एखाद्या अज्ञात भितीने त्रस्त होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आहाराबाबत सावध राहा. रचनात्मक कार्यात मन उत्साहित राहील. व्यावसायिक योजना सफळ होतील. 

तूळ - कौटुंबिक वाद मिटतील

आज तुमचे आईवडीलांच्या कौटुंबिक संपत्तीबाबतचे वाद मिटणार आहेत. जोडीदारासोबत नातेसंबंध मजबूत होतील. सामाजिक प्रतिष्ठा  आणि धनसंपत्ती वाढेल. रचनात्मक कार्यात वाढ होईल. 


वृश्चिक - करिअरची नवी संधी मिळेल

आज तुम्हाला करिअरची नवी संधी मिळेल. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. व्यवसायात चढ-उतार येतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान वाढेल. 


धनु - खर्च वाढण्याची शक्यता
आज एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यामुळे निराश व्हाल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ - उतार येतील. रचनात्मक कार्यात रस वाढवा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


मकर - मन उत्साहित असेल

आज तुम्हाला दिवसभर उत्साहित वाटेल. नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक सन्मान वाढेल. धार्मिक श्रद्धा वाढेल. वाहन चालवताना सावध राहा. 


कुंभ - कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता 

आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांचा त्रास वाटेल. वादविवाद करणे टाळा. कामाच्या ठिकाणी विरोध जाणवेल. धार्मिक कार्यातील आस्था वाढेल. वाहन चालवताना सावध राहा. 


मीन - प्रदूषणाचा त्रास होईल

प्रदूषणाचा  त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती असेल. प्रतिष्ठित लोकांची भेट फायदेशीर ठरेल. एकटेपण दूर होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी