31 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ

31 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ

मेष - मन निराश होईल

आज तुमचे व्यर्थ कारणामुळे मन निराश होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. एखादी आनंदाची बातमी मिळेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


कुंभ - शारीरिक दुखण्यातून आराम मिळेल

आज तुम्हाला शारीरिक दुखण्यातून आराम मिळेल. सकारात्मक विचारांचा फायदा होईल. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात राजकीय लाभ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.

 

मीन - मित्रांवर संशय घेऊ नका

आज मित्रांवर विनाकारण संशय घेऊ नका. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कोणतेही काम करू नका. मुलांना प्रेमाचा शोध घ्यावा लागेल. व्यावसायिक भागिदारीत वाद होतील. 

 

वृषभ - धनलाभ होण्याची शक्यता  

आज जोडीदारामुळे बिझनेसमध्ये धनलाभ होऊ शकतो. नवीन कामे मिळतील. वाहनसुखात वाढ होईल. प्रेमात त्रिकोण परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगल कार्याची योजना आखाल. 


मिथुन - भावंडांची साथ मिळेल

आज भावंडांची चांगली साथ मिळेल. नातेसंबंधांमध्ये जवळीक येईल. जोडीदाराच्यासोबत घालवलेला काळ अविस्मरणीय ठरेल. उत्पन्नाचे साधन वाढेल. प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात.सामाजिक मानसन्मान मिळेल. 


कर्क - नोकरीसाठी दगदग करावी लागेल

आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी इच्छेविरूद्ध जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. 


सिंह - कर्ज कमी होईल

आज तुमची जुनी देणी संपणार आहेत. व्यावसायिक कामे फायदेशीर ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. बेबी प्लॅनिंग करण्याची शक्यता आहे. वाहनसुखात वाढ होण्याची शक्यता आहे. 


कन्या - कामाच्या  ठिकाणी तणाव जाणवेल

आज रोजच्या भांडणामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार कराल. देणी घेणी करताना सावध राहा. जोखिमेची कामे करू नका. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.


तूळ - मन अशांत राहील

आईच्या आरोग्यामुळे तुमचे मन निराश होऊ शकते. मनात निराशा आणि असमाधानाची भावना निर्माण होईल. जोखिमेची कामे करू नका. व्यवसायात नवीन ओळखींचा फायदा होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक - नवीन मित्र मिळतील

नवीन ओळखींमधून चांगले मित्र तयार होतील. कौटुंबिक वादात सर्वांचा सल्ला घ्या. रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. तरूणांना यश मिळेल. प्रवासाचा योग आहे.


धनु - विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील

आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी कमी होतील. बिघडलेली कामे सावरण्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. हरवलेला आत्मविश्वास लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे. 


मकर - वेळ आणि पैसे खर्च होऊ शकतात 

आज तुमचा वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. कामाच्या ठिकाणी ताणतणावाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर