6 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला वारसाहक्काने संपत्ती मिळेल

6 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला वारसाहक्काने संपत्ती मिळेल

मेष - प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता

आज तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. नोकरीशिवाय इतर उत्पन्नाचे साधन मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याबाबत सावध राहा. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची योजना आखाल. 


कुंभ - प्रेमसंबंधात धोका मिळण्याची शक्यता

प्रेमसंबंधात धोका मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. 


मीन - शारीरिक थकवा जाणवेल

आज तुमची दगदग होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा जाणवेल. उत्पन्नांचे वाढेल. जोडीदाराशी नाते दृढ होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. 


वृषभ - कुटुंबाची साथ मिळेल

 कठीण काळात कुटुंबाची साथ मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रवासात तुम्हाला तुमच्या लहानपणीचे मित्रमैत्रिण भेटण्याची शक्यता आहे. 

 

मिथुन - कामे रद्द होण्याची शक्यता

आज कामात दुर्लक्षपणा करणे महागात पडेल. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा विरोध जाणवेल. मुलांबाबत करिअरची चिंता सतावेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


कर्क - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या दिलेले पैसे पुन्हा परत मिळतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होण्याची शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. 


सिंह - प्रॉपर्टीबाबत समस्या जाणवतील

आज तुम्हाला प्रॉपर्टीबाबत समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक जोखिम घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. एखादी आनंदवार्ता मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


कन्या - पायाला दुखापत होण्याची शक्यता

आज तुम्हाला पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याचे व्यवहार व्यवस्थित होतील. आत्मविश्वास वाढेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. 


तूळ - भावनात्मक सहकार्य मिळेल

आज तुम्हाला तुमच्या आईवडीलांची साथ मिळेल. एखाद्याशी अचानक झालेली भेट फायदेशीर ठरेल. विरोधकांचा विरोध कमी होईल. कामच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश होतील. वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - यश मिळेल

आज विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. भागिदारी करण्याचा विचार कराल. रचनात्मक कार्यात प्रगती होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.  


धनु - प्रॉपर्टीशी निगडीत कामे करणे टाळा

आज प्रॉपर्टीशी निगडीत कामे करणे टाळावे लागेल. धनसंपत्तीत फसवणूक होण्याची  शक्यता आहे. घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. धार्मिक आवड वाढण्याची शक्यता आहे. मित्रांना दिलेल वचन पूर्ण करणे कठीण जाईल. जोडीदाराची साथ मिळेल. 


मकर - आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. ज्या कामात तुम्हाला समस्या येत आहेत ते काम सर्वात आधी पूर्ण करा. धुर्त लोकांपासून दूर राहा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 


अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी