सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

दिवाळी म्हटलं की सर्वात पहिले डोक्यात येतं ते घरातल्या सगळ्यांसाठी कपडयांची खरेदी करणं. स्वतःसाठीदेखील आवड असल्याप्रमाणे वेगवेगळे फॅशनचे कपडे घेणं. सण म्हटला की, साडी नेसणं तर आलंच. साडी ही असं आऊटफिट आहे हे कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही. त्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी मात्र नक्कीच येते. पण हल्ली फक्त पारंपरिक स्वरूपात साडी नेसण्याबरोबरच ब्लाऊजचे विविध डिझाईन्स घालण्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे या दिवाळीमध्येसुद्धी तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्रींप्रमाणे विविध ब्लाऊजचे हॉट डिझाईन्स घेऊ शकता. साडीची खरी शोभा वाढते ती म्हणजे ब्लाऊजच्या डिझाईन्समुळे. ब्लाऊज स्टायलिश असेल तर कोणाचंही पटकन लक्ष वेधून घेता येतं. साडीचा लुक हा खरं तर ब्लाऊजवर अवलंबून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावर्षीच्या या दिवाळी सणासाठी काही खास वेगळ्या प्रकारचे ब्लाऊज फॅशनमध्ये आले आहेत. तुम्हीही ही फॅशन ट्राय करा आणि तुमची दिवाळी खास करा. तुम्हाला जर नक्की कोणत्या डिझाईन्स निवडयाच्या असा प्रश्न पडला असेल तर त्यात आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या स्टाईल्स दाखवून मदत करू शकतो. बघा तुम्हाला यातील कोणती स्टाईल आवडते. 

1. हॉल्टर नेक स्ट्रेप ब्लाऊज

Instagram

कोणतीही साडी नेसताना त्याचा ब्लाऊज कसा शिवायचा याची कल्पना आपण आधीपासूनच केलेली असते. त्याच स्वरूपाचे ब्लाऊज घालून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही या दिवाळीच्या सणाला क्रिती सनॉनच्या ब्लाऊजचे डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता. क्रितीसारखा ब्लाऊज शिवून तुम्ही स्वतःला एक ग्लॅमरस लुक देऊ शकता. क्रितीचा ब्लाऊज हा हॉल्टर नेक असून त्याच्या मागची बाजू ही स्ट्रेप डिटेलिंग केलेली आहे. संपूर्ण पाठ उघडी असून दोन्ही बाजूंनी स्ट्रेप्स आणि मध्ये घुंगरू असा हॉट लुक तिच्या ब्लाऊजला देण्यात आला आहे. तुम्हालादेखील दिवाळीला अशी स्टायलिश साडी नेसायची असेल तर तुम्ही हा लुक नक्की ट्राय करू शकता. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

2. कॉलर फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज

Instagram

तुम्हाला जर तुमची पाठ दाखवायला आवडत नसेल, पण तुम्हाला ट्रेंडी स्टाईल करायची असेल तर सोनम कपूरची ही स्टाईल तुम्हाला नक्कीच आवडेल. सोनम कपूरला फॅशनिस्टा म्हटलं जातं आणि ते खरंदेखील आहे. सोनम जी स्टाईल कॅरी करते ती तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच हवी असते. सोनमने घातलेला हा ब्लाऊज फुल स्लीव्हज् असून याला पुढून चैन आहे. तुम्ही जर अशा तऱ्हेच्या ट्रेंडी ब्लाऊजची फॅशन करण्यास उत्सुक असाल तर ही सध्याची वेगळी फॅशन आहे. तुम्ही जर बारीक असाल आणि तुम्हाला फॅशनेबल राहण्यास आवडत असेल तर तुम्ही या दिवाळीसाठी अशा प्रकारचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. 

3. ऑफ शोल्डर ब्लाऊज

Instagram

आपल्याला अनेक ऑफ शोल्डर टॉप्स आवडतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर प्लेन साडी नेसणार असाल तर रंगबेरंगी लुकचा ऑफ शोल्डर ब्लाऊज अथवा प्लेन ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि त्यावर फेदर साडी असं कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच शोभून दिसेल. दिवाळीमध्ये तुम्ही काहीतरी वेगळी फॅशन करून तुमच्या लुकसाठी इतरांकडून वाहवा मिळवू शकता. असे ब्लाऊज तुमच्या लुकमध्ये अधिक हॉटनेस आणि ग्लॅमर आणतील यात नक्कीच शंका नाही. शिवाय हा ऑफ शोल्डर ब्लाऊज तुम्हाला एक वेगळाच लुक मिळवून देईल. 

पहा.. साडी किंवा पार्टी ड्रेससाठी टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन्स

4. फ्लेअर्ड स्लीव्ह्ज ब्लाऊज

Instagram

आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला बाजारामध्ये अगदी रेडीमेड मिळतात. सणाच्या वेळी तुम्हाला शिवून तो कधी मिळणार याचा विचार करत बसण्याची अजिबात गरज नाही. सध्या ट्रेंडमध्ये असणारा फ्लॅअर्ड स्लीव्ह्ज ब्लाऊज तुम्ही ट्राय करून पाहू शकता. तुमचा हात अगदी जाड असेल तर अशा महिलांसाठीदेखील हा ब्लाऊज अप्रतिम आहे. यामध्ये तुम्ही बारीक दिसू शकता. शिवाय हा फ्लेअर्ड असल्याने यामुळे तुमच्या लुकमध्ये फरक पडतो आणि तुम्ही अधिक सुुंदर दिसता. तसंच यामुळे तुमचे स्लीव्ह्ज टाईट दिसणार नाहीत आणि तुम्हाला अधिक एलिगंट लुक मिळेल.  

5. स्ट्रेपी ब्लाऊज

Instagram

स्ट्रेप्स हा सध्याचा ट्रेंड आहे. तुम्ही नेहमीच्या ब्लाऊजच्या डिझाईन्सने कंंटाळला असाल तर तुम्ही हा थोडा वेगळा लुक नक्की ट्राय करू शकता. तुमच्या कोणत्याही नव्या साडीवर विशेषतः डिझाईनर साडीवर तुम्ही अशा प्रकारचा स्ट्रेपी ब्लाऊज शिवलात तर तो तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर घालेल. यातही तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स करू शकता. पुढच्या बाजूने यामध्ये स्ट्रेप्स दिसत आहेत. पण तुम्ही मागच्या बाजूनेदेखील तुम्हाला हवे तितके स्ट्रेप्स लावून घेऊ शकता. फक्त तुमच्या व्यक्तीमत्वाला कशा प्रकारचे स्ट्रेप्स सूट होत आहेत याचा एकदा अंदाज घेऊन मगच असा ब्लाऊज शिवा. 

खास तुमच्यासाठी टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे '61' सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.