आजच्या काळात फक्त बॉयफ्रेंडच गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्याच्या प्रयत्नात असतात असं नाही. तर बॉयफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी गर्लफ्रेंडसुद्धा बऱ्याच गोष्टी करताना दिसते. कारण आता ते दिवस गेले जेव्हा फक्त मुलं मुलींच्या मागे लागत असत आणि प्रपोज करत असत. आजकालच्या मुलीही बिनधास्तपणे मुलांना प्रपोज करतात आणि मनातली गोष्टही सांगतात. काहीवेळा मुलींचा हाच बिनधास्तपणा, त्यांचं हास्य, समजूतदारपणा आणि अशा बऱ्याच गोष्टींची मुलांना भुरळ पडते. यामुळेच ते इंप्रेसही होतात. खरं पाहता प्रेमात पडल्यावर इंप्रेस करायचीही गरज नाही. पण काहीवेळा आपल्या एकमेंकावर असणाऱ्या प्रेमाला अविस्मरणीय क्षणात कैद करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायला काय हरकत आहे. नाहीतर काळाबरोबर ते नातंही कमकुवत होऊ शकतं आणि मग त्यातील आनंद आणि प्रेम कमी होऊ लागतं.
कोणताही खर्च न करता फक्त खालील सांगितलेल्या गोष्टी करून तुम्ही त्याला इंप्रेस करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बॉयफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी हमखास उपयोगी पडतील अशा टिप्स -
समोरच्या व्यक्तीला भुरळ तर पाडायची आहे पण त्याआधी समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे. तुम्ही किती कमाल आहात हे त्यालाही कळलं पाहिजे. त्याआधी तुम्हाला स्वतःबाबत ते वाटणं आवश्यक आहे. जर तसं नसेल तर आत्मविश्वास वाढवा. याचा अर्थ असा नाही की, स्वतःबाबत वाढवून चढवून सांगणे तर समोरच्याशी बोलताना विनम्र आणि विश्वासाने आपल्या मनातली गोष्ट सांगणे. जी मुलं मनाने चांगली असतात त्यांना नेहमीच आत्मविश्वास असणाऱ्या मुली आवडतात.
तुम्ही ज्या मुलाला पसंत करता त्याच्यासमोर स्वतःला चांगलं प्रेझेंट करणंही महत्त्वाचं आहे. कारण मुलंही दृश्य जीव म्हणजे (visual creatures) आहेत ज्यांच्यासमोर तुम्ही छान दिसलात तर ते लगेच इंप्रेस होतील. पण फक्त चांगलं दिसून उपयोग नाही. तुम्हाला मनातूनही तसंच छान वाटणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मनातून छान फील केलंत की ते चेहऱ्यावर आणि तुमच्या एकंदर पर्सनॅलिटीमध्येही नक्कीच दिसेल.
जर तो तुमच्या लुक्स आणि कॉन्फिडन्सच्या प्रेमात असेल तर पुढचं पाऊल टाकायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत असाल तेव्हा त्यांच्या खांद्यावर हळूच डोकं ठेवा किंवा त्याच्या खांद्यावर हात ठेवा. जर तुम्ही दोघं डेटवर जाणार असाल तेव्हा हातात हात धरून चाला. मूव्ही पाहायला गेल्यास हातात हात घेऊन बसा. ज्यामुळे त्याला वाटेल की, तुम्ही या रिलेशनबाबत सीरियस आहात आणि तुमचं रिलेशन अजून स्ट्राँग होईल.
तुमच्याबाबतीत कोणतीही आनंदाची किंवा चांगली न्यूज असल्यास त्याच्यासोबत शेअर करा. त्याला स्पेशल फील करू द्या. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्याला सांगितली तर तोही तुमच्याशी महत्त्वाच्या गोष्टी शेअर करेल. मग आपोआपच ही गोष्ट तुम्हाला दोघांना जवळ आणेल.
जगात असा कोणी व्यक्ती नसेल ज्याला त्याचं केलेलं कौतुक आवडत नसेल. खरंच तुम्हीही त्याचं कौतुक केलं तर त्याला नक्कीच आवडेल. जर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच कौतुक केलं तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असू शकेल. मग जेव्हा योग्य संधी मिळेल तेव्हा त्याच्या चांगल्या वागण्याचं किंवा कामाचं कौतुक नक्की करा. पण हे कौतुक खऱ्या गोष्टींसाठी असावं हेही तितकचं महत्त्वाचं आहे.
जो संकटात आपल्यासोबत असतो तो आपल्या नेहमी मनात राहतो. हेच वाक्य बॉयफ्रेंडच्याबाबतीतही तितकंच खरं आहे. जरं तुम्हाला आवडणारा मुलगा किंवा बॉयफ्रेंड एखाद्या संकटात असेल तर त्याचावर वेळ न दिल्याबद्दल किंवा न बोलल्याबद्दल रागावू नका. त्याच्या प्रोब्लेमला समजून घ्या. कारण जर तसं केलं नाहीतर नात्यात दुरावा येऊ शकतो. जर दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतील तर त्यांना एकमेंकाना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांना संकटाच्या काळात मदत करा आणि स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला त्याला इंप्रेस करायचं असेल तर त्याला कधीही विश करायला विसरू नका. कारण एखाद्याला इंप्रेस करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पायरी आहे. सर्वात आधी सकाळी उठल्यावर त्याला तुमचा मेसेज दिसल्यास तुमचा विचार नक्कीच त्याच्या मनात दिवसभर राहील. त्यामुळे सकाळी उठल्यावर त्याला गुड मॉर्निंग विश करा. त्याला आनंदही होईल आणि तुमच्या गुड मॉर्निंगचीही सवय लागेल. जर तुम्ही कधी विश करायला विसरलात तर तो तुम्हाला आपोआपच मेसेज का नाही केला असं विचारेल. मग तुम्हालाही बरं वाटेल की, तुमचा मेसेज करणं त्याच्या लक्षात आहे. अशीच सुरूवात होते नाती विणायला.
प्रत्येक प्रेम करणाऱ्याला वाटतं की, आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला वेळ द्यावा. एकमेंकासोबत प्रेमाचे क्षण घालवावेत. त्यामुळे जर तुम्हाला त्याला इंप्रेस करायचं असेल तर त्याच्यासोबत जास्तीतजास्त वेळ घालवा. मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत असाल तेव्हा त्यालाच प्रायोरिटी द्या. मोबाईलमध्ये गुंतू नका. कॉफी प्यायच्या कारणाने असो वा शॉपिंगच्या कारणाने भेटत राहा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याला भेटा आणि चांगल्या मेमरीज बनवा. एकमेकांना वेळ देणं ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे हे लक्षात ठेवा.
एखाद्या मुलाला इंप्रेस करणं म्हणजे फक्त त्याच्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याच्या कुटुंबाबाबत त्याला बेसिक प्रश्न विचारा. त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या. त्याच्या कुटुंबातील वेगळ्या प्रथाचं किंवा चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. खासकरून मुलंही त्यांच्या आईशी क्लोज असतात. त्यामुळे त्याच्या आईशी बोला. त्याच्या लहान भावंडाबद्दल विचारा. त्यांच्याबाबतच्या गोष्टी शेअर करा. या गोष्टींमुळेही तुमच्यातील जवळीक वाढेल. त्याच्या घरातल्यांच्या आवडीनिवडीही जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना चांगलं समजता येईल.
प्रत्येकाची इच्छा असते की, त्याच्यावर प्रेम करण्याऱ्या व्यक्तीने विशेष लक्ष द्यावं. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाता तेव्हा त्याची चौकशी करा. कारण बरेचदा असं होतं की, आपण त्या व्यक्तीला वेळ देण्याऐवजी आपल्या ऑफिसमधील प्रोब्लेम, घरातील प्रोब्लेम आणि काय शॉपिंग करावं हे बोलत राहतं. मग तुमचं प्रेम त्या व्यक्तील कसं मिळणार. लक्षात घ्या तुमच्या बॉयफ्रेंडला तुमची गरज आहे. त्याला विचारा त्याचा दिवस कसा गेला. त्याच्या फिलींग्ज शेअर करा. जर तुम्ही कामात बिझी नसाल आणि त्याचा मेसेज आला तर नेहमी रिस्पोंड करा.
हे खरंय...ही म्हण जरी वेगळी असली तरी याबाबतीत ही ती सूट होते. काही गोष्टी आपल्याला खूप छोट्या आणि महत्त्वाचा वाटत नसल्या तरी त्यानेच प्रेमातील गोडवा वाढतो. रोज त्याला विचारणं की, तू वेळेवर खाल्लंस का, नसेल खाल्लं तर का नाही आणि प्रेमाने रागावणे. या छोट्या छोट्या गोष्टींनी प्रेम वाढतं आणि समोरच्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल भावना निर्माण होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही असं केल्यास त्याला तुमची आठवण रोज नक्कीच होईल.
जर तुम्ही त्याच्या प्रेमात असाल आणि त्याला मिस करत असाल तर त्याला आवर्जून सांगा. तो नक्कीच तुमच्या या मिस करण्यानेही इंप्रेस होईल. कारण मुलं नेहमीच मुलींना सांगतात की ते किती मिस करतात आणि मुली ते लाईटली घेतात. पण जर तुम्हाला त्याला इंप्रेस करायचं असेल तर त्याला याची जाणीव करून द्या की, तुमच्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय नाही राहू शकत. जेव्हा तुम्ही त्याच्यापासून लांब असता तेव्हा त्याला किती मिस करता
त्याला इंप्रेस करण्याची एकही संधी सोडू नका. असं काही जे त्याला अपेक्षित नसेल. जर तुम्ही नुकतंच रिलेशनशिपमध्ये पडला असलात तर सरप्राईजमुळे तुमची जवळीक नक्कीच वाढेल. जसं सरप्राईज मिठी किंवा सरप्राईज किस. मग पाहा त्याची कळी नक्कीच खुलेल आणि त्याला आनंदी पाहून तुम्हालाही चांगल वाटेल.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काही करा जे त्याला खूप आवडत असेल. जसं त्याच्या आवडीचा ड्रेस घालणे. त्याला आवडेल तसा लुक करणे. कारण का एखाद्याला इंप्रेस करायची ही खूप जुनी ट्रीक आहे. जी नक्कीच लागू पडेल. तसंही प्रत्येक नात्यात एकमेंकाच्या आवडीनिवडीची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. असं केल्याने त्यालाही वाटेल की, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी खास केलंत आणि तो तुमच्यासाठी किती स्पेशल आहे. परिणामी, तोही तुम्हाला आवडेल त्या गोष्टी लक्षात ठेवून नक्कीच करेल.
महत्त्वाची गोष्ट - जर एवढ्या गोष्टी करूनही जर तो इंप्रेस झाला नाही तर निराश होऊ नका. थोडा वेळ जाऊ द्या. कदाचित तुम्ही या स्पेशल गोष्टी करायच्या थांबवल्यावर त्याला तुमची आठवण होईल. तोही तुम्हाला मिस करेल किंवा असं न झाल्यास वाईट वाटू न घेता आयुष्यात मूव्ह ऑन करा. कारण शेवटी जे होतं ते चांगल्यासाठी होतं.