घरातील कुबट वास दूर करण्यासाठी सोपे उपाय

घरातील कुबट वास दूर करण्यासाठी सोपे उपाय

पावसाळा संपून आता लवकरच हिवाळ्याला सुरूवात होईल. यंदाचा पावसाळा जरा जास्तच लांबला. पाव सामुळे झालेला ओलसरपणा आणि हवामानातील आर्द्रतेमुळे घरात एक प्रकारचा कोंदट आणि कुबट वास येऊ लागतो. ज्यामुळे घरातील प्रसन्न वातावरणाला नक्कीच गालबोट लागतं. घर बराच काळ अथवा अनेक दिवस बंद असेल घरात कोंदट वास येण्याची शक्यता अधिक असते. शिवाय अशा वातावरणामुळे घरात आजारपण लवकर येण्याची शक्यता असते. गालिचे, कार्पेटला येणारा दुर्गंध, फ्रीजला येणारा कुबट वास, बाथरूममध्ये येणारा घाणेरडा वास आणि किचनमध्ये जळालेली फोडणी अथवा कांदा-लसणासारखे उग्र वास घरात कोंडले जातात. ज्यामुळे पाहुणेमंडळी घरी आल्यावर तुम्हाला संकोच वाटू शकतो. घरातील हा कुबट वास काढून टाकण्यासाठी काही सोप्या टीप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील वस्तू वापरून या टीप्स फॉलो करता येतील.

घरातील दुर्गंध दूर करण्यासाठी घरगुती टीप्स

घरात येणारा कुबट वास काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील वस्तू वापरून या अगदी साध्या आणि सोप्या युक्त्या करू शकता

  • एक लिंबू घ्या ते अर्धे कापून त्याच्या दोन फोड करा. लिंबाच्या फोडी तुम्ही घरातील कोपऱ्यांमध्ये ठेऊ शकता.
  • फ्रीजमध्ये येणारा घाणेरडा वास काढून टाकण्यासाठी फ्रीजमध्ये एका वाटीत कोळशाचे तुकडे ठेवा. ज्यामुळे कोळसा फ्रीजमधील घाणेरडा वास शोषून घेईल आणि फ्रीजमध्ये चांगला वास नक्कीच येईल.
  • दिवसभरातील काही तास घरातील खिडक्या उघड्या ठेवा. ज्यामुळे घरातील हवा खेळती राहील आणि कुबट वास येणार नाही. 
  • एकाद्या भांड्यामध्ये जाडे अथवा खडे मीठ घ्या हे भांडे बाल्कनी, घराचे कोपरे अथवा बाथरूमच्या खिडकीवर ठेवा. ज्यामुळे घरातील घाणेरडा वास कमी होण्यास मदत होईल. 
  • रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये एका बशीत ब्रेड व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा. ज्यामुळे सकाळी तुमच्या किचनमधील कुबट वास कमी होण्यास मदत होईल. 
  • मायक्रोवेव्हमध्ये जर घाणेरडा वास येत असेल तर एका भांड्यात पाणी घ्या त्यांच्या अर्ध्या प्रमाणात व्हिनेगर घ्या आणि काही सेंकद पाणी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. या उपायामुळे तुमच्या मायक्रोवेव्हमधील घाणेरडा वास नक्कीच कमी होईल.
  • घरातील स्वयंपाकघरात फोडणी अथवा अन्नपदार्थ जळाले तर किचनमध्ये एकप्रकारचा घाणेरडा वास येऊ लागतो. हा वास किचमधून काढून टाकण्यासाठी तुम्ही गॅसवर पाण्यात व्हिनेगर टाकून काही मिनीट ते गरम करू शकता. ज्यामुळे तुमच्या घरातील हा जळका वास नक्कीच कमी होईल. 
  • घरातील कार्पेट, रग्स अथवा सोफा कव्हर्संना घाणेरडा वास येत असेल तर ते वेळेवर स्वच्छ करणं गरजेचं असतं. मात्र व्हॉक्युम क्लिनरने ते स्वच्छ करण्यापूर्वी या गोष्टीवर बेकींग सोडा शिंपडा ज्यामुळे ते स्वच्छ तर होईलच शिवाय त्यावरील कुबट वासही नक्कीच कमी होईल. 
  • घरात दिवसभरातून एकदा धूप अथवा कापूर जाळा. ज्यामुळे घरात नैसर्गिक आणि सुंदर वास दरवळेल
  • कडूलिंबाची पाने अथवा सोनचाफ्याची फुले एका जाळीदार कापडात गुंडाळून खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. ज्यामुळे घर निर्जंतूक होईल आणि घरात सुंगधी वास येऊ लागेल. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा - 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा - 

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स

पूजाविधीत वापरला जाणारा 'कापूर' आरोग्यासाठी आहे असा फायदेशीर