सणासुदीला आवर्जून अनेक जण पंजाबी ड्रेस घालतात. दिवाळी जवळ आली आहे. यंदा नेमका कोणता लुक दिवाळीसाठी करायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?... किंवा तुम्ही पंजाबी ड्रेसची आधीच निवड केली असेल तर मग त्या पंजाबी ड्रेसला थोडा वेगळा लुक देण्यासाठी यंदा स्ट्रेट फिट पँट नक्की ट्राय करुन पाहा. जर तुम्ही स्ट्रेट फिट पँट वापरत असाल तर मग तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आपण आज पाहुयात.
पूर्वी स्ट्रेट फिट पँटची फॅशन आली तेव्हा या पँटस बाजारात रेडिमेड उपलब्ध नव्हत्या. त्या शिवून घ्याव्या लागायच्या पण आता मात्र या पँट सहज उपलब्ध होतात.वेगवेगळ्या ब्रँडच्या पँटस हल्ली मिळतात. जर तुम्ही रेडिमेड पँट निवडणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आता रेडिमेड पँट आणि तुमचा कुडता याला तंतोतंत मॅचिंग पँट मिळेलच असे अजिबात सांगता येत नाही. (तुम्हाला मिळत असेल तर चांगलीच गोष्ट… कारण मला मॅचिंग असं कधीच काही मिळत नाही) अशावेळी तुम्हाला तुमच्या कुडत्याला सूट होईल अशी पँट निवडता आली पाहिजे. जर तुमचा कुडता नी लेंथ इतका असेल तर तुम्ही त्या साठी सिगरेट पँट निवडू शकता. त्यामध्ये मिळणारे वेगवेगळे पॅटर्न तुमच्या फॅशनसेन्सनुसार निवडा. शक्यतो खूप डिझाईन असलेल्या अशा पँटस निवडू नका.
तुमचा ड्रेस ग्लॉसी मटेरिअलमध्ये असेल आणि तुम्ही त्यासाठी कॉटन पँट शोधत असाल तर तुमचा लुक कधीच चांगला वाटू शकणार नाही. सणासुदीचे कपडे छान चमकण्यासाठी असतात. जर तुमचा कुडता छान चमकणारा असेल तर तुम्ही पँटची निवड करताना तशाप्रकारचे कापड निवडा. हल्ली तुम्हाला वेगवेगळ्या मटेरिअलमध्येही या पँट मिळतात. आता तुमचा कुडता अगदीच प्लेन असेल तर तुम्ही डिझाइन असलेल्या पँटस निवडू शकता. पण डिझाईन बॉटमला असेल तर ती अधिक खुलून दिसते. त्यामुळे निवड करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या.
स्ट्रेट फिटची फॅशन अनेकांना आवडते कार ज्यांना चुडीदार घालून कंटाळा आला आहे.अशांना या प्रकारच्या पँट अगदीच रिलॅक्स वाटतात. चुडीदारसारख्या या पायाला घट्ट बसत नाहीत. पण काहींना स्ट्रेट फिट पँट कायम पायांमध्ये अडकल्यासारखी वाटते. याचे कारण असे की, तुम्ही निवडत असलेली पँट तुमच्या फिटींगची नाही. ज्यांच्या मांड्या स्थुल असतात अशाच महिलांना हा त्रास सतत जाणवत राहतो. जर तुम्हालाही या पँट घातल्यानंतर असा त्रास होत असेल तर मग तुम्ही योग्य साईजची निवड करा. तुमच्यासाठी नितंबाकडे मोठ्या असलेल्या पँटस निवडा. तुम्ही टेलरकडे शिवून घेतानाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या.
आता तुम्ही ज्यावेळी ही पँट घालायला जाल त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे याची इस्त्री याचे कारण असे की, या पँट खुलून दिसण्यासाठी त्यांची इस्त्रीही तुम्ही नीट करायला हवी. पुरुषांच्या पँटला जशी इस्त्री केली जाते. तशीच ती करायला हवी. म्हणजे पुढच्या बाजूने या पँट चपट्या नाही तरी त्याची इस्त्रीची रेघ समोर दिसायला हवी. तरच ती पँट खुलून दिसते.
आता तुम्हाला स्ट्रेट फिट पँट किंवा सिगरेट पँट वापरताना काय काळजी घ्यावी हे नक्कीच कळले असेल अशी अपेक्षा करते. मग या दिवाळीला नक्की ट्राय करा या स्ट्रेट फिट पँट्स आणि दिसा ट्रेंडी
You Might Like This:
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.