दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणून केले जाते अभ्यंगस्नान

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणून केले जाते अभ्यंगस्नान

दिवाळीचा सण असतो पाचच दिवसांचा. पण त्याची तयारी अगदी महिनाभर सुरु असते. दिवाळीच्या काळात येणाऱ्या वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी,दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवसांना अगदी पूर्वीच्या काळापासून महत्व आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून  अभ्यंगस्नान केले जाते. नंतर कारेटे फोडून मस्त फराळावर ताव मारला जातो. पण या काळात अभ्यंगस्नान का करतात ते तुम्हाला माहीत आहे का ? अभ्यंगस्न हे आरोग्याच्या दृष्टिने फारच फायद्याचे आहे. जाणून घेऊया त्याचे महत्व.

दिवाळीत फराळाऐवजी पाहुण्यांना द्या हे खाद्यपदार्थ

अभ्यंगस्नान म्हणजे काय?

Instagram

हिंदू पद्धतीनुसार आणि आर्युवेदाप्रमाणे तेल शरीरात जिरवणे आणि उटणं लावून अंगाची स्वच्छता करणे, गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.अभ्यंगस्नानाची पद्धत ही दर मैलावर बदलत असली तरी देखील त्याचा उद्देश हा शरीराचे शुद्धीकरण करणे असा होतो. आता तेलाचा विचार कराल तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींच्या तेलाचा वापर केला जातो. काही ठिकाणी तिळाचे तेल, काही ठिकाणी खोबऱ्याचे तेल अशा तेलांचा वापर शरीरासाठी केला जातो. वेववेगळ्या भागानुसार अभ्यंगस्नानाच्या पद्धती बदलत असल्या त्याचे घटक बदलत असले तरीदेखील त्याचे फायदे तितकेच वाढत राहतात. त्यामुळ तुम्ही या बाबती अगदीच निश्चिंत राहू शकता. तुम्हाला त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

असे केले जाते अभ्यंगस्नान

साधारणपणे सगळीकडे अभ्यंगस्नान करण्याची एकच पद्धत आहे. लहान मुलांना तर अगदी हमखास साग्रसंगीत अभ्यंगस्नान घालते जाते. सगळ्यात आधी शरीराला तेलाने मालिश केले जाते.  तेल शरीरात छान मुरल्यानंतर मग त्यावर छान सुंगधी उटणं लावलं जातं.आता या सुगंधी उटण्याबाबत सांगायचे झाले तर हल्ली बाजारात अनेक प्रकारची उटणं मिळतात. पण तुम्हाला घरच्या घरी तुमच्या आवडीप्रमाणे घरच्या घरी उटणं तयार देखील करता येऊ शकते.  उटणं चोळून झाल्यानंतर छान गरम गरम पाणी घेऊन आंघोळ केली जाते. 

DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे 'आयुर्वेदिक उटणे'

म्हणून अभ्यंगस्नान आहे महत्वाचे

डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत अभ्यंगस्नान फायद्याचे आहे. 

  • तेलाची मालिश केल्यामुळे तुमच्या शरीराला काम करुन आलेला थकवा दूर होतो. त्यातच गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होतात. 
  • जर तुम्हाला निद्रानाश असेल तर तुम्हाला चांगली झोपही लागते. 
  • त्वचा आणि कांती उजळवते.
  • त्वचेसंदर्भातील तक्रारी कमी करते. 
  • शरीरातील छिद्र मोकळी होतात. शरीरातून मळ निघून जातो.
  • शरीर सुदृढ आणि पिळदार बनवते. 
  • शरीरात वाढलेला वात नियंत्रणात येतो. 
  • दृष्टी स्वच्छ होते. डोळ्यांची कार्यक्षमत वाढते.
  • वार्धक्याला ठेवते दूर 
  • शरीरावरील मळ काढून टाकते. 

आता अभ्यंगस्नानाचे फायदे तुम्हाला कळलेच असतील. दिवाळी वगळता तुम्ही इतर दिवशीही छान अभ्यंगस्नान करु शकता. दिवाळी सणाची माहिती घेऊन तुम्ही दिवाळी हा सगळ्यात मोठा सण साजरा करु शकता 

Instagram

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.