कॉमेडी किंग कपिल शर्माच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. कपिल शर्माची बायको गिन्नी शर्मा हिने आनंदाची बातमी दिल्यापासून गिन्नीवर पापाराझी अगदी लक्ष ठेवून आहेत. नुकताच गिन्नीचा बेबी शॉवरसोहळा पार पडला. मोठ्या उत्साहात हा बेबी शॉवर सोहळा पार पडला. या बेबी शॉवरचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गिन्नीच्या चेहऱ्यावर खुललेलं तेज मन प्रसन्न करणारे आहे.
सैराट आणि धडकफेम ‘आर्ची-पार्थवी’च्या भेटी मागचं कारण काय
सेलिब्रिटींनी लावली हजेरी
गिन्नी शर्माच्या या बेबी शॉवरला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लाफ्टरक्वीन भारती सिंह, अभिनेत्री माही वीज या बेबी शॉवरमध्ये दिसल्या. या बेबी शॉवरचे फारच कमी फोटो सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.कपिलने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी या कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकूणच काय या ग्रँड सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे अगदी उत्साहात हा सोहळा पार पडला.
गिन्नी दिसली एकदम फ्रेश
मातृत्व महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येतं ते अगदी खरं आहे. गिन्नीचे बेबी शॉवर फोटो पाहून तुम्हाला त्याचा नक्कीच अंदाज येईल. या फोटोमध्ये गिन्नी एकदम फ्रेश दिसत असून तिने लाल रंगाचा एक सुंदर गाऊन परिधान केला आहे. बोटनेक असलेल्या या गाऊनमध्ये गिन्नी सुंदर दिसत असून तिच्या डोक्यावरील टियारा तिला शोभून दिसत आहे. कपिलने या सोहळ्यासाठी काही खास लोकांना बोलावले होते. अनेकांनी त्यांच्या स्टेटसमध्ये त्यांनी या सोहळ्यातील काही फोटोज ठेवले आहेत.
जॅक स्पॅरोसोबत तुलना केल्यामुळे सैफ अली खान झाला चाहत्यांवर नाराज
भारतीचा विनोदी अंदाज
लाफ्टर क्वीन भारती जिथे जाते तिथे लोकांना हसायला भाग पाडते. कपिल शर्मा आणि भारती यांचे बाँडींग खूप चांगले असून कपिलच्या सगळ्या सुखदु:खात ती त्याच्यासोबत असते. त्यामुळे या कार्यक्रमाला भारती येणार हे अगदी ठाम होते. भारतीने येताच या कार्यक्रमात मजा आणलेली दिसते. कारण भारतीचा या सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. यामध्ये भारती पोटावरुन हात फिरवताना दिसत आहे.
गिन्नीने दिली साथ
एक काळ होता ज्यावेळी कपिल शर्माशिवाय दुसरा कोणीही कॉमेडियन लोकांना रुचत नव्हता. त्याचा शो सुपर डुपर हिट चालत होता. पण अचानक त्याचे आणि सुनील ग्राेवरचे झालेले भांडण त्याचे शो सोडून जाणे कपिल शर्माला महागात पडले कारण कपिलचे वागणे चुकल्याचे यातून समोर आले होते. या सगळ्या प्रकरणानंतर अनेक प्रकरणांमध्ये कपिल शर्मा नाहक गुंतत गेला आणि त्याने त्याची प्रतिमा खराब करुन घेतली. डिप्रेशनमध्ये गेलेला कपिल शर्मा पुन्हा येईल असे वाटत नव्हते. पण त्याने त्यावर मात करत पुन्हा जोरदार कमबॅक केले आणि शो हिट केला. त्याच्या या सगळ्या काळात त्याला गिन्नीची साथ लाभली.
गिन्नीशी केले लग्न
कपिल शर्माचे गिन्नीशी 2018 साली लग्नं केलं. त्याच्या या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.