अनेकांसाठी गाणं म्हणजे जीव की प्राण असतो. कारण प्रवासात इतर कोणाचीही कटकट ऐकण्यापेक्षा निवांतपणे कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकायला अनेकांना आवडते. इंग्रजी आणि हिंदी गाणी सोडून कधी कधी मराठी गाणी ऐकायलाही आवडतात. मातृभाषेतील गाणी असतातच दमदार म्हणा. तुम्ही गाण्यांचे चाहते असाल. प्रवासात छान गाणी लावून तुम्ही तुमचे मन शांत करत असाल तर मग मराठीतील ही नवीन गाणी तुम्हाला ऐकायलाच हवीत.
प्रेमगीत ऐकायला अनेकांना आवडते. म्हणजे तुमचा मूड एकदम रोमँटीक करण्यासाठी ही प्रेमगीत तुम्ही नक्कीच ऐकायला हवीत.
रिंकु राजगुरु आणि शुभंकर तावडे स्टारर ‘कागर’ हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटातील हे गाणं फारच रोमँटीक आहे. रिंकु राजगुरुचा हा दुसरा चित्रपट असून या चित्रपटात तिने एका नेत्याची भूमिका बजावली आहे. राजकारणाशी निगडीत असलेल्या घरात जन्म झालेल्याअभिनेत्रीला सत्ता आणि प्रेम यामध्ये एक काहीतरी निवडावे लागते.
चित्रपटाचे नाव: कागर
गायक: कविता राम, विवेक एन, राहुल सी, संतोष बी
अभिजीत आमकर आणि सोनल पवार यांची केमिस्ट्री असलेला हा नवा म्युझिक व्हिडिओ आहे. पहिल्यांदाच ही जोडी ऑनस्क्रिन पाहायला मिळत आहे. विकी अडसुळे आणि रोहित ननावरे यांनी हे गाणं गायलं असून तुम्ही ही कोणाच्या प्रेमात पडले असाल तर तुम्हाला हे गाणं ऐकायला हवे.
अल्बम: पाहिलं तुला
गायक: विकी अडसुळे, रोहित ननावरे
तुम्ही अंकुश चौधरीचे फॅन असाल तर तुम्हाला हे गाणं ऐकायला हवे. लव्ह अॅट फर्स्ट साईटवर तुम्ही विश्वास ठेवत असाल किंवा तुम्हालाही तसेच प्रेम झाले असेल तर मग तुम्हाला हे गाणं नक्कीच आपलसं वाटल्यावाचून राहणार नाही.
चित्रपटाचे नाव: ट्रिपल सीट
गायक: बेला शेंडे
नवीन रुपात येणार रंगीला… पोस्टरने आताच घातला सोशल मीडियावर धुमाकूळ
लागिर झालं जी फेम शितली आणि अजिंक्य ही जोडी अनेकांच्या आवडीची आहे. ही मालिका जरी आता संपली असली तरी त्यांच्या प्रेमाची एक नवी कहाणी नव्या गाण्यातून मांडण्यात आली आहे. कॉलेजमधील प्रेम कसं असतं. या फिलींग्ज व्यक्त करणारं हे गाणं आहे.
अल्बम: खुळाचं झालो गं
प्रेम ही अशी भावना आहे जी ठरवून कधीच होत नाही. पण एकदा कोणावर प्रेम झाले तर ते सतत तुम्हाला तुमच्या अवतीभवती असल्याचे वाटत राहते. गर्लफ्रेंड या चित्रपटात सई ताम्हणकरला अमेय वाघसोबत असेच प्रेम होते. मग तिच्या या भावना ती या गाण्यातून व्यक्त होते.
चित्रपटाचे नाव: गर्लफ्रेंड
गायक: ऋषिकेश, सौरभ आणि जसराज
मराठीमध्ये असं रोमँटीक गाणं तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. प्रेमाबद्दल अनेकांना फँटसी असते. लग्नानंतर मधुचंद्राची रात्र खास असावी असे सगळ्यांना वाटते. तुमच्यातील रोमान्स जागवणारे असे हे गाणे आहे.
लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत रोमँटीक क्षण घालवावे असे प्रत्येकाला वाटते. लग्नाच्या त्या क्षणापासून ते एकत्र राहण्याची सुरुवात ही मनाला आनंदीत करणारी असते. तुमचेही नुकतेच लग्न झाले असेल तर मग तुम्हाला या गाण्याची मजा काय हे नक्की कळेल.
अल्बम: रात चांदणं
मराठीमध्ये असं रोमँटीक गाणं तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. प्रेमाबद्दल अनेकांना फँटसी असते. लग्नानंतर मधुचंद्राची रात्र खास असावी असे सगळ्यांना वाटते. तुमच्यातील रोमान्स जागवणारे असे हे गाणे आहे.
चित्रपटाचे नाव: टकाटक
गायिका: श्रुती राणे
प्रेमात एकमेकांपासून दूर जायला कोणालाच आवडत नाही. कामानिमित्त का होईना जर एकमेकांपासून दूर होण्याची वेळ आलीच तर मात्र तो दुरावा सहन होत नाही. पण हाच दुरावा तुमच्यातील रोमान्स वाढवत असतो.
चित्रपट: मिस यू मिस्टर
गायक: आनंदी जोशी, आलाप देसाई
प्रेम झाल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा असे प्रत्येकाला वाटते. तिला प्रत्येक कामात आपली मदत व्हावी आणि जोडीदाराच्या मिठीत राहावे असे वाटते.त्याचीच साक्ष देणारे हे गाणं आहे.
चित्रपटाचे नाव: मुळशी पॅटर्न
गायक: अवधूत गुप्ते, वैशाली माडे
तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही आऊटडोअर रोमान्सचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हे गाणं नक्की पाहायला हवं.
चित्रपट: शिकारी
गायिका: जुईली जोगळेकर
वाचा - तुमच्या प्ले लिस्टमध्ये असालाच हवी ही लता मंगेशकर मराठी गाणी
पार्टीला इंग्रजी गाणी लावायला हवीतच असे नाही. मराठी गाण्यातही एक वेगळाच ठसका आहे बरं का! हल्ली मराठी गाणीही एकदम झक्कास झाली असून एखाद्या पार्टीला तुम्हीही ही गाणी लावायला हवीत.
अभिनेत्री मीरा जोशी हिच्यावर चित्रित झालेले हे गाणं असून मीराचा हॉट अंदाज यामध्ये पाहायला मिळाला आहे. पण याच्या बिट्स नक्कीच तुमचा ठेका धरु शकतील
चित्रपट: प्रेमवारी
गायिका: वैशाली सामंत
हिना पांचाळ सध्या न्यू सेन्सेशन आहे. मराठीतील हा हॉट चेहरा बिग बॉसमुळे समोर आला. आईटम गर्ल म्हणून तिची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख आहे. तुम्हालाही बेधुंद होऊन नाचायचे असेल तर हे गाणं खास तुमच्यासाठीच आहे बरं का!
चित्रपटाचे नाव: परफ्युम
गायिका: उर्मिला धांगर
मीरा जोशीवर चित्रित झालेलं हे आणखी एक गाणं म्हणजे एकदम झक्कास आहे. तुमचा मूड कोणताही असो तुम्हाला हे गाणं नक्कीच ताल धरायला लावणार
चित्रपट: माझ्या बायकोचा प्रियकर
गायिका: स्वाती आणि नक्श
मराठीतील मलायका अरोरा खान अशी हिना पांचाळची ओळख आहे. तिच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. तू तिथे असावे या चित्रपटातील हे गाणं असून हिनाच्या दिलखेचक अदांसोबतच हे गाणं सुद्धा तुमचा मूड बदलणारे आहे.
चित्रपट: तू तिथे असावे
गायक: गणेश पाटील
मराठीतील आयटम साँग म्हटले की, मानसी नाईक हिचे नाव आवर्जून घेतले जाते. रिक्षावाला या गाण्यानंतर तिला आणि तिच्या डान्सला फारच प्रसिद्धी मिळाली. तिचेच हे गुलाबी नोट हे गाणं
चित्रपट : प्रेमा
गायिका: शेखर आनंद
लग्न म्हटलं की, बेभान होऊन नाचणे आलेच. लग्नाला वाजवली जाणारी गाणी देखील आपल्याला चार्ज करत असतात. शिकारी या चित्रपटातील हे गाणं तुम्हालाही नक्कीच चार्ज करेल.
चित्रपट: शिकारी
गायिका: उर्मिला धनगर
लग्नासाठी आणखी एक बेस्ट गाणं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गाणं नक्की ऐकायला हवं. शंशाक केतकर, हिना पांचाळ,
चित्रपट:31 दिवस
गायिका: वैशाली माडे
मराठी चित्रपटांमधील ‘मुंबई-पुणे- मुंबई’ हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा आहे. नुकताच त्याचा तिसरा भाग येऊन गेला त्यातील दमदार गाणं म्हणजे ठुमकत नार. हे गाणं ऐकल्यानंतर तुमचा दिवसभरांचा कंटाळा अगदी 100 टक्के निघून जाईल.
चित्रपट: मुंबई-पुणे- मुंबई 3
गायक: आदर्श शिंदे
काही गाणी अशी असतात ती काही सणांच्या निमित्ताने येत असतात. पण त्यानंतरही ती अनेकांच्या लक्षात राहतात. असेच गाणे आहे ‘लय भारी’ नंतर आलेल्या माऊली या चित्रपटातील धुवून टाक या गाण्याचे. या चित्रपटातही रितेश देशमुखची बायको अभिनेत्री जेनिलिया देशमुखने गेस्ट अपिरिअंस दिला आहे.
चित्रपट: माऊली
गायक: अजय- अतुल
मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचाही मोठा हात आहे. जर तुम्ही कोळी गीतांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी हे नवं गाणं सध्या आलेलं आहे. थोडं वेगळं पण तुमचा मूड रिफ्रेशिंग करणारे असे हे गाणे असू शकते.
गायिका: सिद्धी तुरे
कोणी मन दुखावले असेल तर अशावेळी काहीच करावेसे वाटत नाही. कोणाशी फार बोलावेसे वाटत नाही. आपल्यातच राहावेसे वाटते अशावेळी तुम्ही हताश न होता ही गाणी ऐकायला हवी. तुम्हाला थोडे रडावेसे वाटेल. पण तुमच्या मनातील कटुता कमी होईल.
आयुष्यात नेहमीच आनंद असतो असे नाही कधी-कधी आयुष्यात अचानक संकटे येतात. पण त्या संकटांना घाबरुन न जाता तुम्ही थोड्या धीराने वागलात तर तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग नक्की सापडतील
चित्रपट: फाईट
गायक: अजय गोगावले, स्वप्निल गोडबोले
आयुष्यात कधी-कधी असे पेच निर्माण होतात की, तुम्हाला नेमकं काय करावे हे कळतं नाही. सगळीकडे दु:खाची वलय दिसतात. अशावेळी फक्त देवाचा धावा हाच एक पर्याय असतो. तुमच्याही आयुष्यात अशी परिस्थिती आली असेल तर मग तुम्ही हे गाणं ऐका.
चित्रपट: लग्न मुबारक
गायक: आदर्श शिंदे
कधी कधी अशी वेळ येते की, तुम्हाला कोणीच समजू शकत नाही. तुम्ही काहीतरी चांगले करत आहात हे कोणालाही पटत नाही. अशावेळी तुम्ही हे गाणं ऐकून शांत व्हायला शिका.
चित्रपट: भिकारी
गायक: अजय गोगावले
ब्रेकअप ही अशी गोष्ट आहे जी तुमचे आयुष्य फारच बदलून टाकते. आकंठ प्रेमात बुडाल्यानंतर वेगळी होण्याची वेळ खूप त्रास देते. यावेळी .तुम्हाला खूप रडावेसे वाटत असेल त्यावेळी तुम्ही हे गाणं नक्की ऐका. तुम्हाला पुन्हा एकत्र यावेसे नक्की वाटेल.
चित्रपट: व्हॉटसअॅप लग्न
गायक: ऋषिकेश रानडे
आयुष्यात आपण काही निर्णय इतक्या घाईत घेतो की, त्यानंतर सगळे काही चुकल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्ही अगदी आवर्जून हे गाणं ऐका. तुम्हाला तुमच्या चुका आपोआप लक्षात येतील.
चित्रपटः व्हॉसअॅप लग्न
गायिका: केतकी माटेगावकर
मराठीमध्ये देवाची इतकी सुंदर गाणी आहेत की, तुमच्यासमोर अगदी कोणताही कठीण पे असो तुम्ही गाणी ऐकाच. तुम्हाला ही गाणी कमालीची मन:शांती देतील.
पंढरीची वारी ही नशिबाचा भाग असते. पण त्या विठ्ठलाची आराधना तुम्ही अगदी घरबसल्या करु शकता.विठुरायावर अनेक गाणी आली आहेत. विठुरायाला आळवणारे हे गाणेही फार प्रसिद्ध आहे
चित्रपट: एक तारा
गायक: अवधुत गुप्ते
माझी माऊली
देवींचे अनन्यसाधारण महत्व आपल्या आयुष्यात आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती वास करते. अशा या आदिशक्तीला नेहमीच वंदावेसे वाटते. त्यामुळे तुम्ही माऊलीसाठी तुम्ही हे गाणं नक्की ऐका
अल्बम: माझी माऊली
गायक: प्रतिक सोनकर
पंढरपूरच्या विठुरायाची पालखी निघते. त्यावेळी वारकऱ्यांचा तो जोश पाहून त्या जोशात आपणही सामील व्हावेसे वाटते. अशावेळी तुम्ही हे गाणं नक्की ऐका आणि मनाने विठुरायाच्या भक्तीत सामील व्हा.
चित्रपट: माऊली
गायक: अजय- अतुल
महाराष्ट्राला लोकसंगीताची परंपरा आहे. या लोकसंगीतात जोगवा हा प्रकार मोडतो. शिवरायांच्या काळातील हा जोगवा नक्कीच तुमच्यामध्ये नव प्रेरणा जाणवेल.
चित्रपट: फत्तेशिकस्त
गायक: आदर्श शिंदे
तुम्हाला गोंधळ हा प्रकार माहीत असेल तर मराठी चित्रपटातील हे गाणं तुम्ही नक्की ऐकायला हवे.
चित्रपट: बिस्कीट
गायक: मिलिंद शिंदे
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.