#Mystory: त्यानंतर मला पुन्हा कधीही प्रेम झालं नाही

#Mystory: त्यानंतर मला पुन्हा कधीही प्रेम झालं नाही

प्रेम ही अशी भावना आहे. जी कधीही कोणावरही जडू शकते. पण ज्या व्यक्तिवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तिच व्यक्ती जेव्हा आपल्याला दुखवते तेव्हा मात्र त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन जातं. असंच काहीसं झालं आहे अमोलसोबत… आयुष्यात सगळं काही मिळवण्यात तो यशस्वी झाला मात्र प्रेम मिळवणे त्याला काही जमले नाही. आयुष्यातील सगळी गणित बदलली पण त्याला तिच्यासारखं कधीच कोणावर प्रेम झालं नाही. आज आहे त्या नात्यात खूश असूनही त्याला मनापासून तिची आठवण येते. जाणून घेऊया अमोलची ही Mystory

#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…

shutterstock

शाळेत असेपर्यंत कितीही मुलींच्या नावाने चिडवले तरी ती गोष्ट फार मनावर घ्यावी असे मला कधीच वाटले नाही. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर मला पहिल्याच दिवशी एक मुलगी आवडली. नाजूक पण तितकीच बोल्ड… अगदी पहिल्याच दिवशी तिने सगळ्यांची ओळख करायला सुरुवात केली होती. वर्गात शेवट्च्या बाकावर मी बसलो होतो. ती माझ्याकडे कधी येईल याची मी वाट पाहात होतो. तिच्या त्या सौंदर्यावर कोणीही भाळू नये असे मला वाटत होते. म्हणूनच माझे मन अगदी चलबिचल झाले होते. ती माझ्या बाकाकडे येईपर्यंत वर्गात शिक्षक आले मग काय माझी ओळख राहूनच गेली. कॉलेजमध्ये असताना तिच्यासारखं पटकन बोलण्याचं धाडस माझ्यात अजिबात नव्हतं. तिची आणि माझी ओळखच झाली नाही हे तिच्या लक्षात होतं. म्हणूनच दुसऱ्या दिवशी ती अगदी आल्या आल्या मला भेटायला आली. 

माझ्यासमोर उभी राहत म्हणाली, मी शुभदा आणि तू… 

‘ अमोल’  मी उत्तर दिलं. 

त्या क्षणापासून आमची अगदी घट्ट मैत्री झाली. तिच्यासोबत एक एक दिवस घालवत असताना ती किती हुशार पण तितकीच समजुतदार असल्याचे कळत होते. आम्ही कॉलेजमध्ये आणि कॉलेजनंतर तासनतास बोलत बसायचो. त्या क्षणी हे प्रेम असेल किंवा नसेल याबद्दल काहीच खात्री मला नव्हती. पण मला तिच्यासोबत प्रत्येक वेळ घालवायला आवडत होता. ती कुठेच जाऊ नये असं वाटतं होतं. नियतीच्या मनातही तेच होतं म्हणा म्हणूनच कॉलेजमध्ये असेपर्यंत आमच्यात कधीच दुरावा आला नाही. आम्ही दिवसेंदिवस एकमेकांजवळ येत होतो. माझ्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळेची मी वाट पाहात होतो. पण मला घाई नको होती. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मी तिला विचारण्याचे ठरवले. 

बॉयफ्रेंडला काय द्यावे कधीच कळत नाही.. मग या गिफ्ट आयडियाज तुमच्यासाठी

तो क्षणही आला तिला मी काहीतरी विचारणार तोच ती म्हणाली, ‘हे सांगायला तू खूप वेळ घेतलास किती वाट पाहिली मी या क्षणाची’ 

मग काय तिचा होकार होता हे मला कळले आणि आमची प्रेमकहाणी पुढे सरकली. आता मला जोडीदार म्हणून फक्त ती हवी होती आणि तिला मी…. 

चांगला अभ्यास केल्यामुळे चांगली नोकरी आम्हाला मिळाली. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घरी सांगितला. घरांनीही आमच्या नात्याला पंसती देत लगेचच शुभमंगल करण्याचे ठरवले. आमचे लग्न होणार आहे यावर मला विश्वासत बसत नव्हता. घरात लग्नाची धामधूम सुरु होती. सगळे आनंदी होते. पण…. 

आमचे लग्न होऊच शकले नाही. ती माझ्या आयुष्यात नाही याचे दु:ख मला सहन झाले नाही. त्यानंतर कित्येक वर्षे मी लग्न केले नाही. शेवटी घरातल्यांचे ऐकून मी दुसरे लग्न केले. पण केवळ औपचारिकता. माझे हे वागणे मला चुकीचे आहे हे माहीत होते. पण मला पुन्हा कोणावर प्रेम करणे शक्य नव्हते. तिच्या वाट्याचे प्रेम मी कोणासोबतच वाटणार नाही असे सांगितले होते. पण तरीदेखील मला लग्न करुन जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या. माझ्या बायकोमध्ये कायम मला माझी शुभदा दिसायची. पण ही माझी शुभदा नाही हे माहीत होते. त्यामुळेच तिच्यापासून मी दूर होत चाललो होतो. सुदैवाने माझी बायको समजूतदार असल्यामुळे तिने कधीच याविषयी एक शब्द काढला नाही. उलट तिने मला समजून घेतले. कारण  समजून घेणे भागच होते. 


त्या दिवशी काय झाले हे मी कोणालाच सांगितले नव्हते. पण आज खूप दिवसांनी ती घटना मला आठवतेय. हातात हिरव्या कंच बांगड्या भरलेली शुभदा काही कामानिमित्त बाहेर स्कुटीवरुन गेली होती. नेहमी जपून वाहन चालवणाऱ्या शुभदाचे नशीब त्या दिवशी चांगले नव्हते. अचानक तिच्या बाजूने एक मोठी गाडी भरधाव गेली. घाबरलेल्या शुभदाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिचा तोल गेला. ती खाली पडली. दुर्दैव असं की, मागून येणाऱ्या गाडीने तिला जोरदार टक्कर दिली आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला. तिला रक्ताच्या थारोळ्यात मला पाहायचे नव्हते म्हणूनच तिला मी शेवटपर्यंत पाहिले नाही. मी तिला त्या दिवशी शेवटचे भेटायला हवे होते. पण मी चुकलो आणि म्हणूनच आजपर्यंत मी तिच्यानंतर माझं कोणावरही प्रेम झालं नाही.


खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.