डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं | POPxo

डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं

डोळ्याची पापणी नक्की का फडफडते, जाणून घ्या कारणं

बऱ्याचदा आपला डोळा फडफडतो. त्यावेळी आपण आपल्या आजूबाजूच्यांना विचारतो, डावा डोळा किंवा उजवा डोळा फडफडणं हे शुभ आहे की अशुभ? पण खरंच असं काही असतं का? डोळे फडफडण्याची काही विशिष्ट कारणं आहेत याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? डोळा फडफडणं हे अतिशय सामान्य लक्षण आहे. काही वेळा डोळ्याची वरची पापणी फडफडते तर काही वेळा खालची पापणी फडफडते. काही वेळ डोळे फडफडत राहतात आणि त्यानंतर हा त्रास थांबतो. पण कधी कधी  हा त्रास जास्त काळ टिकून राहतो. या आजाराला डॉक्टरांच्या भाषेत मायक्योमिया (myokymia) असं म्हटलं जातं. खरं तर हा त्रास तुमच्या डोळ्यांच्या पापण्यांमधील स्नायूंचं आकुंचन पावल्यामुळे होत असतो. हे त्याचं मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त डोळा लवण्याची नक्की काय कारणं आहेत ते जाणून घेऊया - 

1. थकवा

सध्याची लाईफस्टाईल इतकी धावपळीची झालेली आहे की, आपल्यापैकी बऱ्याच जणांची झोप पूर्णच होत नाही. अपुऱ्या झोपेमुळे शरीराला आवश्यक तो आराम मिळत नाही. त्यामुळे डोळे फडफडतात. त्यामुळे दिवसभरात किमान 8 तास झोप तरी आवश्यक आहे. 

2. ताण

Shutterstock
Shutterstock

दिवसभराच्या कामाचा ताण आपल्या शरीरावर तर येतोच पण डोळ्यांवरही येतो. हे डोळे लवण्याचं मुख्य कारण आहे. सतत लॅपटॉपवर काम, मोबाईलकडे बघणं आणि टीव्ही पाहणं या सगळ्या गोष्टींंमुळेही तुमच्या डोळ्यांवर खूपच ताण येत असतो. पण वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम डोळे लवण्यामध्ये होतो. हा त्रास जास्त दिवस राहण्याची शक्यता असते. 

काजळ लावण्याची योग्य पद्धत

3. चष्मा नियमित न बदलल्यास

Shutterstock
Shutterstock

तुम्हाला जर चष्मा असेल तर त्याचा नंबर अथवा काचा नियमित बदलणंं गरजेचं आहे. पण असं न केल्यास,  तुमच्या डोळ्यांवर अधिक ताण येतो. यासाठी तुम्ही नित्यनियमाने डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही सतत काम करत असताना डोळ्यांवर त्याचा दबाव येत असतो. त्यामुळे तुमचे डोळे फडफडतात. 

डोळ्यांखाली येणारी खाज, होणारी जळजळ घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

4. डोळे कोरडे राहणं

नैसर्गिकरित्या साधारण वयाच्या पन्नाशीनंतर डोळे कोरडे व्हायला सुरुवात होते. पण हल्ली सतत लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करून बऱ्याच जणांना डोळे कोरडे होत असल्याचा अनुभव येतो. डोळे कोरडे झाल्यास सतत डोळे लवण्याचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी नियमित ड्रॉप्सचा अथवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करून आपले डोळे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. याबाबत काळजी घेतली तर डोळे फडफडण्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागत नाही.  

5. अलर्जी

Shutterstock
Shutterstock

डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यास,  डोळ्यांना खाज आणि सूज येते. तसंच डोळ्यातून पाणीही सतत वाहात राहतं. अशावेळी डोळे फडफडण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी शुभ की अशुभ याचा विचार करत बसू नये. 

सुंदर डोळे दिसण्यासाठी घरगुती उपायांनी कमी करा अंडरआय बॅग

6. कॅफेन

चहा, कॉफी, चॉकलेट अथवा सॉफ्ट ड्रिंक्स याचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करत असल्यास, याचा तुमच्या डोळ्यांवर जास्त परिणाम होतो. यामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे सहसा या गोष्टी जास्त प्रमाणात खाणं टाळा. 

 

7. आहारामधील असंतुलन

Shuttetrstock
Shuttetrstock

तुमच्या शरीरासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक असतंं. पण जर तुमच्या शरीराला पोषक आहार मिळाला नाही आणि आहारात असुंतलन राहिलं तर तुमचे डोळे लवतात. त्यामुळे तुम्ही योग्य आहार घेत आहात की नाही याकडे नीट लक्ष पुरवा. 

ही डोळे फडफडण्याची अतिशय कॉमन कारणं आहेत. पण तुम्हाला ही समस्या वरचेवर होत असेल तर तुम्ही वेळच्यावेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे.

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.