#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…

#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…

प्रेम आणि खासकरून तरूण पिढीचं प्रेम अनेकांच्या डोळ्यात खुपतं. मग तरूण कपल्सना मुद्दाम त्रास देणे किंवा बोल लावणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. आजच्या #MyStory मध्येही असंच झालं एका कपलसोबत. 

रात्रीचे 9.30 वाजले होते आणि मी माझ्या boyfriend सोबत माझ्या PG च्या बाहेर उभे होते. दुसऱ्या दिवशी आमची परीक्षा होती आणि त्याला माझ्याकडची एक नोटबुक हवी होती. त्याने जाण्याआधी मला hug केलं आणि goodbye केलं, जसं आम्ही नेहमी एकमेंकाना करायचो.

मराठीमध्ये बॉयफ्रेंडसाठी रोमँटिक मेसेजेसही वाचा

मी आमच्या शेजारी राहणाऱ्या काकांना आमच्याकडे बोट दाखवताना आणि काहीतरी बोलताना पाहिलं. मी त्यांना family हा शब्द म्हणताना ऐकलं. त्यांनी मला विचारलं, तुम्ही दोघं इथे उभं राहून काय करत आहात. मी म्हटलं, नाही.. आम्ही तर काहीच करत नव्हतो. त्यांनी बोलायला सुरूवात केली की, इकडे families राहतात आणि तुमचं काय सुरू आहे इथे. माझ्या boyfriend ने मला फक्त hug केलं होतं. त्यामुळे काकांना नक्की काय वाटलं हेच मला समजत नव्हतं. याचा इतका मोठा issue करायची काय गरज होती. मलाही राग आला आणि मी त्यांना कामाशी काम ठेवा असं सांगितलं.

लोकं जमा होऊ लागली आणि आम्हाला दोघांना सुनवू लागली. मी अशी मुलगी अजिबात नव्हते जी अशाप्रकारचा abusive behavior सहन करेन. मीही त्या सगळ्यांशी argue करायला सुरूवात केली. ज्या काकांनी या सगळ्या प्रकाराला सुरूवात केली होती. त्यांनी माझ्या बाबांना कॉल करण्यास सांगितले. कारण  त्यांना हा सर्व प्रकार माझ्या बाबांना सांगायचा होता. माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल आधीच सर्व माहीत होतं त्यामुले मी त्यांना बाबांना कॉल लावून दिला. पण ही गोष्ट तेवढ्यावरच थांबली नाही. ते काका माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहिले आणि मला थोबाडीत मारण्याची धमकी देऊ लागेल. हे ऐकताच माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मीही त्यांना म्हटलं हिंमत असेल तर मारून दाखवा. मग माझा boyfriend मध्ये आला आणि मला protect करू लागला. 

तेवढ्यात त्या काकांची मुलगी तिथे आली आणि मला बोलली. माझ्या बाबांशी असं बोलू नकोस आणि आमच्यात वादावादीला सुरूवात झाली. जेव्हा मी तिला म्हटलं की, मी कसं गप्प बसेन जेव्हा तुझे बाबा मला थोबाडीत मारायची धमकी देत आहेत आणि तेही कॉलनीतील सर्व लोकांसमोर. मी त्यांच्याशी तसंच बोलत होते जसं ते माझ्याशी बोलत होते आणि तेच ते deserve करतात.

आत्तापर्यंत भरपूर लोकं त्या ठिकाणी जमा झाली होती आणि शेजारची लोकंही बाहेर येऊन ऐकत होती. मला आता हा सगळा प्रकार सहन होत नव्हता. त्यामुळे मी रडायलाच सुरूवात केली. मी माझ्या ओळखीच्या काकांना कॉल केला जे ACP होते आणि त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी मला त्या काकांना फोन देण्यास सांगितलं. पण ते तर फोन घ्यायला तयारच नव्हते. आता ते चांगलेच घाबरले होते की, पोलिसांना याबाबत कळलं आहे. तिथे उभ्या असलेल्या एका काकूंनी फोन घेतला आणि काहीच बोलल्या नाहीत. फोन कट केला. जेव्हा माझ्या काकांनी त्यांना हा सर्व प्रकार थांबवण्यास सांगितलं. पण तरीही मला आणि माझ्या कुटुंबाला त्या पुन्हा abuse करू लागल्या.

आता हे सगळं माझ्यासाठी अवघड झालं होतं. मी पुन्हा माझ्या एसीपी काकांना कॉले केला आणि परत घडलेला प्रकार सांगितला. तेही चिडले आणि पोलीसांची एक टीम तिकडे पाठवली. जेव्हा पोलीस आले तेव्हा तिकडे उभे असलेल्यांपैकी कोणाकडेच काही बोलण्यासारखे नव्हते. त्या काकूंनी तर माफी मागितली पण ते काका मात्र गायब झाले होते. ते नक्कीच त्यांच्या घरी जाऊन लपले असतील. जेव्हा त्यांनी पोलिसांच्या येण्याबद्दल ऐकलं असेल. 

Finally, सगळी गर्दी पांगली आणि माझा boyfriend ही सगळं नीट झाल्यावर घरी गेला. 

या सर्व लोकांनी एका hug वरून इतका ड्रामा केला होता. मला तर आठवत सुद्धा नाही की, यापेक्षा stupid असं काही मी पाहिलं असेल. लोकं कधी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं थांबवतील. देव जाणे.

तुमच्यासोबतही असा प्रकार कधी झाला आहे का? तुमच्याकडेही अशी एखादी मायस्टोरी असेल तर आम्हाला मेल करा. आम्ही ती स्टोरी या सदराखाली नक्की मांडू.