'The Kapil Sharma show' मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू

'The Kapil Sharma show' मध्ये पुन्हा येणार का नवज्योत सिंह सिद्धू

कपिल शर्मा शोमधून परिक्षकाची भूमिका साकारणारे नवज्योत सिंह सिद्धू वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि त्यांना हा शो सोडावा लागला. नवज्योत सिंहच्या जागी अर्चना पूरन सिंह या शोमध्ये सहभागी झाली. पूलवामा हल्ल्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे कपिल शर्मा शोमधून नवज्योत सिंह सिद्धू या्ंना शो सोडावा लागला होता. मात्र अजूनही नवज्योत सिंह सिद्धूबाबत असलेल्या चर्चा सुरूच आहे. कारण या शोला नवज्योत यांची सवय लागली आहे. प्रेक्षकांना आजही या शोमध्ये नवज्योत सिंह परत येण्याची शक्यता वाटत आहे. कपिल शर्मा शो हा कॉमेडी शो जगभरात प्रसिद्ध आहे. नुकताच कपिल शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिलने नवज्योत सिद्धूची नक्कल करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांना नवज्योत सिद्धू परत शोमध्ये येण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

कपिल शर्मा चा कलाकारी

कपिल शर्मा हा टेलिव्हिजन माध्यमातील एक जबरदस्त स्टार आहे. कपिल एक उत्तम निवेदक आणि गायक आहेच शिवाय तो एक चांगला नक्कलाकारदेखील आहे. The Kapil sharma show' च्या माध्यमातून त्याने अनेक चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्डच्या मते 'दी कपिल शर्मा शो' जगभरात पाहिला जाणारा एक लोकप्रिय शो आहे. या शोच्या माध्यमातून विविध कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सतत हसवत ठेवणारा आणि भरपूर मनोरंजन करणारा हा शो एक नंबर वन शो आहे.आता या शोमध्ये नवज्योत सिंह सिद्धू परत येणार आणि अर्चना पूरन सिंहला शो सोडावा लागणार का हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

दी कपिल शर्मा शो एक लोकप्रिय शो

दोन वर्षांपूर्वी कपिलच्या जीवनात मोठं वादळ आलं होतं. कपिल आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. ज्यामुळे निर्मात्यांना शो बंद करावा लागला होता. हा शो परत सुरु होणार की नाही अशी अनेकांना शंका होती. पण कपिलने आता कमबॅक केलं आहे आणि सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू झालं आहे. शिवाय आता त्याने डबिंगच्या माध्यमातून हॉलीवूडमध्येही पदार्पण केलं आहे. कपिल लवकरच बाबाही होणार असल्याने त्याच्या जीवनात सध्या आनंद भरभरून वाहत आहे. अनेक चढ-उतार सहन करत कपिलने पुन्हा एकदा आपलं स्थान पटकावलं आहे. कपिल शर्मा शोला सर्वात जास्त लोकप्रियता आज मिळत आहे. मात्र कपिलच्या या यशामागे अभिनेता सलमान खानचं खूप मोठं योगदान आहे. दी कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान आहे. सलमानने वेळोवेळी कपिलला मदत केली आहे. आता सलमानने कपिलला आणखी एक सल्ला दिल्याची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलचा शो सध्या यशाच्या शिखरावर पोहचला आहे. या शोला सर्वात जास्त टीआरपी आहे. यासाठीच सलमानने कपिलला वादविवादांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याने कपिलला सल्ला दिला आहे की, “ पुन्हा असा कोणताही वाद निर्माण करू नकोस. ज्यामुळे या शोवर परिणाम होईल.”

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा

अधिक वाचा

अभिनेता आनंद इंगळे साकारणार 'सदानंद झगडे'

‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

काजोल झाली लेखिका, श्रीदेवीच्या बायोग्राफीसाठी लिहिली प्रस्तावना