ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
गरोदरपणातही दिसा अधिक स्टायलिश (Pregnancy Outfit Ideas In Marathi)

गरोदरपणातही दिसा अधिक स्टायलिश (Pregnancy Outfit Ideas In Marathi)

गरोदरपणाच्या काळामध्ये साधारणतः महिला आपल्या फॅशनसेन्स संदर्भात फारच द्विधा मनस्थितीमध्ये असतात. आपले जुने कपडे बघून हे कपडे सैल करून घ्यावे की, आपला वॉर्डरोब नव्या कपड्यांनी भरावा याबाबत त्यांना काहीच कल्पना नसते. गरोदरपणामध्ये या अशा अवस्थेतून प्रत्येक स्त्री जाते. मात्र नऊ महिने हा कालावधी कोणत्याही ताणतणावात घालवण्यापेक्षा अगदी हसत – खेळत तुम्ही आनंद घ्यायला हवा. तुम्ही गरोदर आहात याचा अर्थ असा अजिबात नाही की, तुम्ही स्टायलिश राहू नये. तसंच सध्याच्या ट्रेंडसह स्वतःला अपडेट करू नये असेही नाही. या काळातही तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर आपल्या फॅशनसेन्ससह अजिबात तडजोड करू नका. तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल अथवा लेटेस्ट फॅशन ट्रेंड अपडेट करत राहणाऱ्या असलात तर तुम्हाला गरोदरपणासाठी नक्की कोणते आणि कसे स्टायलिश कपडे वापरायला हवेत हे माहीत करून घ्यायला हवं. इतकंच नाही तर तुम्ही अगदी गृहिणी असलात तरीही तुम्ही बाहेर जाताना ही स्टाईल नक्कीच कॅरी करू शकता. 

गरोदर महिलांसाठी स्टाईल्स (Pregnancy Outfit Ideas In Marathi)

गरोदर महिलांसाठी वेगवेगळ्या स्टाईल आहेत. त्यातील तुम्हाला कोणती स्टाईल सूट करते हे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे स्टायलिश राहा. 

मोठ्या प्रमाणावर क्रॉप शीर्षाबद्दल जाणून घ्या

ADVERTISEMENT

1. बाहेर जाण्यासाठी कलरफुल ड्रेस (Colourful Dress for Perfect Outing)

Myntra

तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांसह कुठे बाहेर जायचं असेल अथवा गरोदरपणात तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर डेटवर जात असाल तर अशावेळी तुम्ही शिफ्ट ड्रेस घालू शकता. असा कलरफुल ड्रेस तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. याबरोबर तुम्ही side swept हेअरस्टाईल केलीत तर तुम्हाला हा ड्रेस अधिक सुंदर दिसेल. तुमच्या चेहऱ्यावर गरोदरपणात आलेला तुकतुकीतपणा यामुळे अधिक उठून दिसतो. 

POPxo Recommendation Women Colorful Dress

ADVERTISEMENT

2. पार्टी पिंक ड्रेस (Party Dress)

Amazon

कोणत्याही पार्टीमध्ये तुम्हाला जायचं असेल अथवा आपल्या नवऱ्याबरोबर लाँग ड्राईव्ह अथवा रोमँटिक डिनरसाठी जायचं असेल अथवा आपल्या मॅटरनिटीच्या या खास क्षणांना तुम्हाला मस्तपैकी जगायचं असेल तर तुम्ही मस्त पिंक ड्रेस घालून तयार व्हा. तुमच्या गरोदरपणामध्ये गुलाबी रंग एक वेगळं सौंदर्य खुलवतो. लेस फिनिशिंग असणारा ड्रेस तुम्ही अशावेळी निवडावा. 

POPxo Recommendation Light Pink Dress 

ADVERTISEMENT

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार

3. रेड कारपेट स्टाईल (Red Carpet Style)

Myntra

गरोदर आहात म्हणजे स्टाईल करायची नाही असं कुठेच म्हटलेलं नाही. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कुठेही जाताना तुम्ही मस्त स्टाईलमध्ये जाऊ शकता. आपल्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये लहानसा ब्लॅक ड्रेस हा असतोच. त्याशिवाय वॉर्डरोब पूर्ण होतच नाही. पण गरोदर असताना असा लहान ड्रेस फिट न होण्याची अनेक महिलांची तक्रार असते. पण तुम्ही ऑनलाईन थोडा सर्च केला तर तुम्हाला नक्कीच असा ड्रेस मिळेल. जो रेड कारपेट स्टाईलचा असेल. 

ADVERTISEMENT

POPxo RecommendationMaternity Black Dress

4. कफ्तान ड्रेस (Caftan Dress)

Ajio

प्रत्येक मुलीला आणि महिलेला कोणत्याही अवस्थेत नटायला खूपच आवडतं. मग गरोदर असलं तरीही. अशावेळी तुम्हाला ऑफिसला जाताना कम्फर्टेबल कपडे लागतात. मग त्यावेळी तुम्ही प्रिंटवाला कोणताही कफ्तान ड्रेस ऑफिस पार्टी अथवा घरातील गेट टुगेदरच्या वेळी घालू शकता. तुम्हाला यामध्ये श्वास घेणं अत्यंत सोयीचं होतं. तसंच तुम्ही अशा कपड्यांमध्ये स्वतःला कम्फर्टेबल ठेवू शकता. 

ADVERTISEMENT

POPxo Recommandation Caftan Dress

5. एलिगंट फॅशन (Elegant Fashion)

Myntra

गरोदरपणात तुम्ही एलिगंट फॅशन म्हणून गाऊनचा वापर करू शकता. हा पूर्वी वापरण्यात येणाऱ्या गाऊनसारखा नक्कीच नाही. नव्या जमान्याचा हा एलिगंट आणि तुमचं सौंदर्य अधिक खुलवणारा गाऊन आहे. तुमचं शरीर गरोदरपणात बदलत असतं. पण अशा गाऊनमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसता. कोणत्याही कार्यक्रमात जाण्यासाठी तुम्ही या स्टायलिश गाऊनचा उपयोग करू शकता. तसंच यावर तुम्ही चेहऱ्याला मिनिमल मेकअप करा. 

ADVERTISEMENT

POPxo Recommendation Maternity Elegant Wrap Gown

नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश

6. जीन्स सदा के लिए (Jeans)

Amazon

ADVERTISEMENT

कोणत्याही वेळी जीन्स हे अतिशय कम्फर्टेबल असतात. गरोदरपणात काही जणांच्या मते जीन्स घालू नये. पण गरोदरपणासाठीही खास जीन्स तयार करण्यात आल्या आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? Stretchable Upper अशी खास जीन्स मिळते जी तुम्हाला गरोदरपणाच्या काळातही वापरता येते. जीन्स ही रफ टफ असते. त्यामुळे तुम्ही जर जीन्समध्ये कम्फर्टेबल असेल तर तुम्ही हीच स्टाईल कायम कॅरी करू शकता. 

POPxo Recommandation Maternity Jeans

7. स्पेशल ट्रेंडी शर्ट (Maternity Special Trendy Shirt)

Limeroad

ADVERTISEMENT

गरोदरपणात नेहमी ढगळ कपडे घालावे लागतात असं सांगण्यात येतं. पण तुम्ही गरोदरपणातही स्टायलिश कपडे घालू शकता. स्पेशली ट्रेंडी शर्ट तुमच्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असतात. तुम्ही असे शर्ट घालून ऑफिसची फॉर्मल मीटिंगसुद्धा अटेंड करू शकता. तुम्हाला यामध्ये अतिशय कम्फर्टेबल फील होतं. तसंच गरोदरपणात तुम्हाला स्वतःकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. मग असं स्टायलिश राहण्यासाठी तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला हवं. 

POPxo Recommandation Trendy Shirt

8. चिक ब्लाऊज (Chik Blouse)

Shein

ADVERTISEMENT

शिफॉनच्या वेस्टर्न ब्लाऊजची आजकाल फॅशन आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की गरोदर असताना तुम्ही चिक ब्लाऊज घालू शकत नाही. तर असं अजिबात नाहीये. गरोदर महिलांसाठी स्पेशली तयार करण्यात आलेले शिफॉन शर्ट्स मिळतात. त्यामुळे तुम्हाला गरोदरपणात असे शर्ट्स अधिक स्टायलिश दिसतात. 

POPxo Recommandation Chik Blouse Shirts

वाढत्या वयात तरूण दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ फॅशन टीप्स

9. लाँग शर्ट फ्रेश कलर्स (Long shirt in fresh colours)

ADVERTISEMENT

Flipkart

आजकाल लाँग शर्ट्सदेखील फॅशनमध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लाँग शर्ट्स तुम्हाला गरोदरपणामध्ये अत्यंत कम्फर्ट लेव्हल मिळवून देतात. हे कपडे अतिशय आरामदायी असतात. फ्रेश कलर्समधील लाँग शर्ट्स हे दिसायला तर आकर्षक असतातच. पण त्यापेक्षा अधिक तुम्हाला अशा गरोदरपणाच्या अवस्थेत व्यवस्थित आत्मविश्वास मिळवून देतात. 

POPxo Recommendation Women Checkered Formal Cutaway Shirt

10. कम्फर्टेबल ट्राऊजर (Comfortable Trouser)

ADVERTISEMENT

Flipkart

तुम्हाला जर अतिशय कंटाळवाणं वाटत असेल आणि तुम्हाला बाहेरदेखील जायचं असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. तुम्हाला जास्त कपडे बदलायचे नसतील तर तुम्ही अशा प्रकारचं कम्फर्टेबल ट्राऊजर घालू शकता. Easy टू wear असं हे trouser केवळ तुमचा लुक amplify करत नाही तर तुम्हाला अत्यंत कम्फर्टेबल वाटतं. गरोदरपणात तुम्हाला अशा ट्राऊजर खूपच सुंदर दिसतात. 

POPxo Recommendation Trouse

11. करडा रंग (50 Shades Of Grey)

ADVERTISEMENT

Flipkart

हा रंग नेहमीच एव्हरग्रीन मानला जातो. याची फॅशन कधीही जात नाही आणि याचे वेगवेगळे शेड्स नेहमीच कोणत्याही स्किन टोनवर उठून दिसतात. तुम्हाला जर वेस्टर्न आऊटफिट घालणे आवडत असेल पण गरोदरपणात ते घालण्यासाठी तुम्हाला जर थोडा संकोच वाटत असेल तर नेहा धुपियाचा हा लुक तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास देईल. नेहाने राखाडी आणि पांढऱ्या ड्रेसला एका गडद राखाडी रंगाच्या श्रगबरोबर अतिशय सुंदररित्या कॅरी केले आहे. या श्रगचे डिझाईन अतिशय स्टायलिश आहे आणि हा ड्रेस फॉर्मल इव्हेंट्समध्येही घालता येऊ शकतो.

POPxo Recommendation Women Fit and Flare Blue Dress

12. जिम लुक (Gym Look)

ADVERTISEMENT

Decathlon

गरोदरपणाच्या काळामध्ये आपली स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी आईने तंदुरुस्त असणे अतिशय गरजेचे आहे. योग, मेडिटेशन आणि हलकाफुलका व्यायाम करून आपली तब्बेत नीट ठेवू शकता. तुम्ही जर जिममध्ये जात असाल किंवा प्रेगनन्सी क्लब जॉईन केला असेल तर नेहा धुपियाप्रमाणे हा जिम लुकदेखील तुम्हाला योग्य दिसेल. काळा टीशर्ट आणि ट्राऊजर्ससह काळ्या आणि लाल रंगाच्या जॅकेटसह तुम्ही तुमचा जिम लुक ठेवू शकता. तुम्हाला काळा रंग घालायचा नसल्यास, दुसऱ्या रंगाचा वापरही तुम्ही करू शकता.

POPxo Recommendation Gym Look for pregnant women

13. फुल गाऊन (Gown)

ADVERTISEMENT

Flipkart

गरोदरपणाच्या नऊ महिन्याच्या काळामध्ये घर वा ऑफिस इतकेच जग नसते. त्यामुळे तु्म्ही नक्कीच कंटाळता आणि मग हा काळ तुम्ही आनंदाने घालवू शकत नाही. आजकाल शहरामध्ये मॉमी क्लब ही संकल्पना चांगली रूळली आहे. तुमच्याजवळ असा कोणताही क्लब नसल्यास, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुमचा नवरा अथवा तुमच्या मित्रमैत्रिणींसह फिरायला जाण्याची योजना करा. तुमच्या व्यग्र असणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबरही प्लॅन करा. अशावेळी तुम्ही वेगळेपणा म्हणून फुल गाऊन वापरून पाहा. तुम्हाला यामध्ये जास्त आरामदायी वाटतं आणि तुमची स्टाईलदेखील अप्रतिम राहाते. 

POPxo Recommendation Women Maxi Blue Dress

14. साधा आणि सोबर लुक (Sober Look)

ADVERTISEMENT

Flipkart

गरोदर महिला स्वतःला अगदी सहज वाटावे असे आणि आपला बेबी बंप दिसावा अशा तऱ्हेचे कपडे गरोदरपणामध्ये घालण्यास प्राधान्य देत असतात. तुम्हालादेखील अशा लुकचा आऊटफिट हवा असेल, ज्यामध्ये तुम्ही सुंदर तर दिसालच पण अतिशय सहज वावरूही शकाल. शिवाय सध्या गाऊन फॅशनमध्येही आहे आणि यामुळे साध्या आणि सोबर लुकमध्ये छान दिसू शकता. गाऊन नको असेल तर तुम्ही वनपिसचादेखील वापर करू शकता. 

POPxo Recommendation – Women Maxi yellow sober dress

15. पारंपरिक ड्रेस (Traditional Look)

ADVERTISEMENT

Amazon

प्रत्येक वर्षी सणांमध्ये आपण उत्साहाने सहभागी होत असतो. मात्र यावर्षी स्वतःला थोडा आराम द्या. आता आराम करण्याचा वेळ मिळालाच आहे, तर त्या वेळामध्ये फेस्टिव्ह वेअर नक्की काय करायचे ? यावरही विचार करा. यावर्षी नक्की सणासुदीला काय घालायचे आहे याचा विचार जर तुम्ही करत असाल तर, टिपिकल प्लाझो, सलवार वा शरारा घालायचा नसल्यास, स्कर्टसहदेखील तुम्ही घालू शकता.

POPxo Recommendation – Traditional wear

16. गडद रंगाचे कपडे (Dark Dresses)

ADVERTISEMENT

Instagram

गरोदपरपणामध्ये प्रत्येक महिलेने सकारात्मक राहणं अत्यंत आवश्यक असतं. अशावेळी तुम्हाला गडद रंग अधिक सकारात्मकता आणून देतात. तुम्हाला जर गडद रंगाचे वावडे नसेल तर तुम्ही नेहा धुपियाप्रमाणे पिवळा आणि पांढरा असे कॉम्बिनेशन असलेला ड्रेस घालू शकता. ब्रंच असो वा दुपारचे जेवण असो, तुमच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही या ड्रेसने नक्कीच आपलेसे करू शकता. चांगली छाप पाडू शकता. यासह ब्राऊन अथवा काळ्या रंगाचे ब्रेसलेट वा दुसरी एक्सेसरीजदेखील तुमच्या लुकला एक वेगळी शोभा आणू शकतात. गरोदर महिलांनी आऊटफिटच्या रंगाबरोबर नक्कीच प्रयोग करायला हवेत. नीरस रंग घालण्याऐवजी असे गडद रंग निवडावे ज्यामुळे त्या आनंदी राहू शकतात आणि समोरच्या माणसालाही सकारात्मक भावना निर्माण होईल.

POPxo recommendationDark Dress

17. पार्टीसाठी फॅशनेबल स्टाईल (Fashion For party)

ADVERTISEMENT

Instagram

गरोदरपणात पार्टी करू नये असं कोणी सांगितलं. फक्त कोणत्याही जास्त आवाजाच्या ठिकाणी टाळा. पण तुम्ही घरच्या घरी अथवा बाहेर जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी करणार असाल तर त्यावेळी तुमचं फॅशन स्टेटमेंट नक्कीच असायला हवं. अशावेळी नक्की काय करायचं असा प्रश्न येणं साहजिक आहे. गरोदर आहात म्हणून पार्टीला जाणार नाही असे तर नक्कीच नाही. तुम्ही जर तुमच्या खाण्या-पिण्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवू शकत असाल तर कॉकटेल पार्टीला जाण्यापासून कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही. अशा नाईट पार्टीमध्ये तुम्हाला जर काही इंडो – वेस्टर्न घालायचे असेल तर हा लाल आणि काळा ड्रेस नक्कीच स्टाईल स्टेटमेंट ठरू शकतो. जर थंडी असेल आणि तुम्हाला स्लीव्हलेस घालायचे नसेल तर या ड्रेसवर शॉर्ट जॅकेट अथवा स्टोल घेऊ शकता.

POPxo Recommendation Party Dress

18. मीटिंगसाठी दिसा स्टायलिश (Outfit For Meeting)

ADVERTISEMENT

Amazon

तुम्हाला जर एखाद्या मीटिंग, कॉन्फरन्स वा सेमिनारचा भाग व्हायचं असेल आणि तुमच्या फॅशनसेन्सबद्दल तुम्हाला द्विधा मनस्थिती असेल, तर तुम्ही तुमच जुने बिझनेस सूट्स बघून नका. जर तुमचं आयुष्य आता नवे आहे तर फॅशन जुनी कशाला? तुम्ही मीटिंगसाठी थोडे गडद रंगाचे कपडे निवडा.  तसंच तुमचं पोट मोठं असलं तरीही तुम्हाला आरामदायी वाटले असेच कपडे तुम्ही निवडा. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या अशा कपड्यांमधूनच दिसून येतो हे लक्षात ठेवा. 

POPxo Recommendation – Dress for the meeting

19. ढगळ पण स्टायलिश ओढणी लुक (Dupatta Look)

ADVERTISEMENT

Instagram

गरोदरपणामध्ये घरामध्ये कोणती पूजा असेल वा अशा तऱ्हेच्या कोणत्या कार्यक्रमाला जायचे असल्यास, पारंपरिक कपडेच घालायचे असतील, तर नेहा धुपियाचा हा लुक तुमची नक्की मदत करू शकेल. तुम्हीदेखील नेहासारखा असा लाईट हिरव्या रंगाचा, पांढऱ्या आणि पीच शेडचा पंजाबी अथवा सूट घेऊ शकता. गरोदरपणानेे महिला थोडे ढगळ कपडे घालण्यासाठी प्राधान्य देतात आणि त्यांना त्यामध्ये अतिशय हलके वाटते त्यामुळे चुडीदार अथवा लेगिंगऐवजी प्लाझो, शरारा अथवा सलवार घालणेच योग्य. सलवार – सूटबरोबर फ्लॅट चप्पल घालावी आणि पारंपरिक दागिने घालून अशा पार्टीमध्ये वावरावे.  

POPxo Reccomendation – Ethnic Pregnancy Fashion

20. बेबीमूनसाठी स्टायलिश लुक (Dress for Babymoon)

ADVERTISEMENT

Instagram

आजकाल भारतात बेबीमून कल्चर खूपच हिट आहे. लग्नानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी जोडीदार आपले हनीमून प्लॅन करतात. तशाच तऱ्हेने मूल जन्माला येण्याआधी बेबीमूनला जाण्याचा सध्या ट्रेंड आहे. बेबीमूनला जाणाऱ्या जोड्या या आपल्या आई – बाप होण्यापूर्वीचा काळ आनंदाने घालवतात आणि आपली नवी जबाबदारी निभावण्यासाठी स्वतःला सहजरित्या तयार करतात. तुम्हीदेखील तुमच्या नवऱ्यासह बेबीमूनची योजना आखत असाल तर तुम्हाला आरामदायी वाटतील असे लहान पण ढगळ कपडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. 

POPxo Recommendation – Babymoon Dress

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

You Might Like This:

गणेशाची 25 युनिक नावे (Lord Ganesha Names for Baby Boy in Marathi)

डोहाळे जेवणाच्या निमित्ताने तुम्हालाही करता येईल अशी सुंदर सजावट

14 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT