लिपस्टीक लावायला अनेकांना आवडतं. पण बरेचदा बेस्ट लिपस्टीक कोणती? या गोंधळात अनेक जण गोंधळून जातात. तुमचे कामाचे स्वरुप आणि कामाच्या वेळा या नुसार तुम्ही लिपस्टीक निवडायला हवीत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बेस्ट लिपस्टीक निवडल्या आहेत. ज्या तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवू शकता आणि त्या तुमच्या बजेटमध्येही बसतील.
सध्या न्यूड लिपस्टीक हा एक नवा ट्रेंड आहे.म्हणजे तुम्ही अगदी कधीही या न्यूड लिपस्टीक लावू शकता. न्यूड या लिपस्टीकचा अर्थ तुमचा ओठांचा रंग आणि तुमच्या लिपस्टीकचा रंग एकमेकांमध्ये मिसळून जातो. पण तरीही या लिपस्टीक लावल्याने तुमचे ओठ उठून दिसतात. पण न्यूड लिपस्टीकच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे तुम्ही निवडत असलेला रंग. कारण न्यूड रंग निवडताना जर तुम्ही चुकीचा निवडला तर तो तुम्हाला खडू सारखा दिसतो. तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार तुमचा रंग निवडा. जर तुम्ही योग्य रंग निवडला तर तो रंग तुम्हाला नक्कीच चांगला दिसेल. प्रत्येकाच्या ओठांचा रंग गुलाबी नसतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओठांचा रंग नीट पाहा आणि मग तुमचा रंग निवडा.
जर तुम्ही एखाद्या कॅज्युअल मिटींग किंवा एखाद्या डेटवर जाणार असाल तर तुमचे ओठ ज्युसी आणि ओले दिसले तर ते चांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही अशा ग्लॉसी लिपस्टीक नक्की निवडा. ग्लॉसी लिपस्टीकमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग मिळतात. ग्लिटरसोबत या रंगामध्ये तुम्हाला प्लेन कलर्सही मिळतात. यामुळ तुमचे ओठ कायम ओले वाटतात. पण ही लिपस्टीक लावल्यानंतर तुम्हाला काळजी घेणे ही आवश्यक असते. ते म्हणजे ही लिपस्टीक अगदी पटकन खाण्यात जाऊ शकते. त्यामुळे ती सतत लावावी लागते. पण जर तुमही काहीच तासासाठी जाणार असाल तर मग तुम्हाला अशी लिपस्टीक लावायला हरकत नाही.
लिपस्टीक जी सगळयात जास्त टिकेल अशा लिपस्टीकच्या शोधात खूप जण असतात. सगळ्यांना अशी लिपस्टीक हवी असते जी खूप वेळासाठी टिकेल. लाँग लास्टींग लिपस्टीकची खासियतच अशी असते की, त्या मॅट असतात आणि जास्त काळासाठी टिकतात. तुम्ही जर ऑफिसगोईंग असाल आणि तुम्हाला सतत क्लायंट मिटींग असतील. अशावेळी तुम्हाला सतत लिपस्टीक लावायला जमत नाही. शिवाय कोणासमोर लिपस्टीक लावणेही चांगले नाही. त्यामुळे तुमच्या कामाचे स्वरुप असे असेल तर मग तुम्ही अशा स्वरुपातील लिपस्टीक निवडा
एखाद्या नाईट पार्टीसाठी जर तुम्हाला परफेक्ट लिप्स हवे असतील तर मग तुम्ही मॅट लिपस्टीकची निवड करा. जर तुम्हाला सतत ऑफिशिअल पार्टीज अटेंट कराव्या लागत असतील तर मग तुम्ही असा लिपस्टिक निवडा. या लिपस्टीकमध्ये वॅक्सचे प्रमाण जास्त असते आणि ऑईलचे कमी त्यामुळे ही लिपस्टीक जास्त काळ टिकते. यामध्येही तुम्हाला हपल्ली बरेच प्रकार मिळतात.
हा प्रकारही अनेकांना आवडतो. आता या सगळ्यामध्येही तुम्हाला मॅट, ग्लॉसी, लाँग लास्टींग असे प्रकार मिळू शकतात. या लिपस्टीक लावायला तशा सोप्या असतात. तुम्हाला जर लिपस्टीक लावायला शिकायचे असेल किंवा तुम्ही शिकत असाल तर तुम्ही या लिक्ववी लिपस्चीकचा उपयोग करु शकता.
आता तुमच्या आवडीनुसार आणि कामानुसार लिपस्टीक निवडा आणि सुंदर दिसा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.