प्रेम म्हटलं की रोमान्स हा प्रत्येक कपलमधील महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय तुमचा रोमान्स पूर्ण होऊच शकत नाही. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात एकमेकांसाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा जर एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही किंवा तुमच्या आयुष्यात जर काही स्पाईसच राहिला नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नसाल अथवा आठवड्याच्या आठवड्याला तुमची भेट होत असेल. तुमच्या कामाच्या गडबडीत केवळ तुमच्या आयुष्यात कामच राहीलं असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारांना मधूनमधून अशा प्रकारचे Naughty sexts पाठवत राहायला हवं. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील रोमान्स टिकून राहातो. पण तुमचा बॉयफ्रेंड अथवा तुमचा नवरादेखील त्यामध्ये इंटरेस्टेड असायला हवा असं तुम्हाला वाटत असेल तर मेसेज अधिक नॉटी आणि त्याला उत्तजित करणारे आणि प्रेमाचे असावेत. त्यामध्ये कोणतीच अश्लीलता नाही. प्रत्येक जण असे मेसेज आपल्या जवळच्या व्यक्तीला करतच असतो. तुम्ही काही कारणाने जर जवळ येऊ शकत नसाल तर किमान अशा मेसेजमुळे तरी तुमच्यामधील रोमान्स जागृत राहातो आणि तुमच्यामधील सेक्सच्या भावनेलादेखील समाधान मिळतं. शिवाय तुमचं एकमेकांवरील प्रेम अधिक वाढण्यास यामुळे मदत होते. आम्ही तुम्हाला असे काही मेसेज सांगणार आहोत ज्याने तुमचा बॉयफ्रेंड अथवा तुमचा नवरा नक्कीच स्वतःला तुमच्यापासून दूर ठेऊ शकणार नाही.
तुमच्या बॉयफ्रेंडसाठी तुम्हाला काही सेक्सी मेसेज करायचे असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि असे मेसेज करून तुमच्या आयुष्यात रोमान्स खुलवा.
तुम्ही जर घरी एकटे असाल आणि त्याला हिंट द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारचा मेसेज त्याला पाठवू शकता. त्यालाही त्यामुळे बरं वाटतं. त्याला जाणवतं की, तुम्ही एकटे असल्यानंतर तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही आणि जी गोष्ट त्याच्या मनात आहे तिच गोष्ट तुमच्याही मनात आहे. एकांतात वेळ घालवण्यासाठी तुम्हीही तितकेच आतुर आहात हे त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही असा मेसेज करू शकता.
एकत्र आंघोळ करणं हा रोमान्स आणि प्रेमाचा अविभाज्य भाग आहे. मुळात पाण्यात सेक्स करण्यातही बऱ्याच जणांना मजा येते. तुम्हालाही तुमच्या बॉयफ्रेंडची ही आवड माहीत असेल तर तुम्ही त्याला अशा प्रकारे मेसेज करून आठवण करून देऊ शकता की, कितीतरी दिवस झाले आहेत आणि तुम्ही एकत्र वेळ घालवलेला नाही. त्यालादेखील या गोष्टीची आठवण तुम्ही अशा प्रकारे वेगळ्या शब्दात करून देऊ शकता. तुम्ही असं म्हटल्यानंतर नक्कीच त्याच्या डोळ्यासमोरून तुम्ही एकत्र घालवलेले क्षण येतील आणि लवकरात लवकर तुम्ही एकत्र यावं असा प्लॅन तो नक्कीच आखेल.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा मेसेज करता तेव्हा तुम्हाला त्याने सेक्सी मेसेज करून रिप्लाय देणं मुळातच अपेक्षित असतं. त्यालाही या प्रश्नाचा रोख कळायला नक्कीच वेळ लागणार नाही. याचा अर्थ तुम्हाला एकमेकांबरोबर एकांतात कसा वेळ घालवयचा आहे हे तुम्हाला त्याच्याकडून पुन्हा जाणून घ्यायचंय. पुन्हा काहीतरी स्पाईस आणण्यासाठी त्याने आणि तुम्ही काहीतरी वेगळं करावं असं तुम्हाला अपेक्षित आहे त्यामुळे तुम्ही त्याला त्याच्या कामातून वेळ काढून स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडा.
प्रत्येक मुलाला मुलीने पुढाकार घेतलेला नक्कीच आवडतो. तुमच्या नात्यात एकदा जवळीक आली की तुम्ही एकमेकांशी कितीही फ्री बोलू शकता. तुम्ही त्याला त्याच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचारू शकता. अशा तऱ्हेने विचारल्यानंतर त्यालाही माहीत असतं की तुम्ही नक्की कशाबद्दल विचारत आहात आणि त्यानंतरच तुमच्यामध्ये पुढील naughty sexts चालू राहू शकतात. तुम्ही एकत्र येऊ शकत नसाल तर अशा तऱ्हेने त्याला तुमच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करा.
जर तुमच्या बॉयफ्रेंडला तुमच्या अधिक जवळ आणायचं असेल तर त्याला नक्की अशा तऱ्हेचे मेसेज आवडतील. कोणत्याही मुलाला आंघोळ करून आलेली त्याची गर्लफ्रेंड अथवा बायको नक्कीच अधिक आवडते. अशावेळी तो स्वतःला तुमच्यापासून जास्त काळ दूर ठेऊ शकत नाही.
यापेक्षा मोठी हिंट नक्की काय असू शकते. त्याला आपल्याजवळ आणण्यासाठी असा मेसेज करणं हा सर्वात सोपा उपाय आहे. अशा तऱ्हेचा मेसेज वाचल्यानंतर त्याचा ‘मी येऊ का’ हा रिप्लाय आला नाही तर नवलचं! तुम्ही असं म्हटल्यानंतर तो आणि तुम्ही असे क्षण इमॅजिन करू लागता आणि अगदी तुमच्यात भांडण जरी झालं असेल तर तुमच्या अशा वाक्यानंतर तो तुमच्यावरचा राग विसरणार नाही असं होणारच नाही.
असा मेसेज करून तुम्ही तुमचा बेडवर झोपलेला फोटो जर त्याला पाठवला तर नक्कीच तो अगदी आपली हातातली कामं बाजूला ठेऊन तुम्हाला वेळ देईल. त्याला तुमच्याजवळ कसं आणायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. असं म्हणून तुम्ही त्याला अधिक आपल्याकडे आकर्षित करायला हवं. तरच तुमच्यातील काही दिवसांची झालेली दूरी नक्कीच कमी होईल. त्याला जाणवेल की, आपण वेळ देणं किती आवश्यक आहे..
तुमच्यावर प्रेम करत असलेल्या व्यक्तीला जर असं तुम्ही म्हटलंत तर नक्कीच त्याला तुमच्या मनात काय आहे हे कळेल. विकेंडला घरात कोणीच नाही आणि ही संधी सोडायला नको हे तुम्हाला त्याच क्षणी जाणवयला हवं. कारण जेव्हा तुमची गर्लफ्रेंड असं सांगत असते तेव्हा तुम्ही यायला तयार व्हावं अशी तिची मनातून अपेक्षा असते. शिवाय बरेच दिवस जर तुम्ही एकमेकांबरोबर एकांतात वेळ घालवला नसेल तर अशी संधी नक्कीच हुकवायला नको.
काय वाटतं तुम्हाला? तो जर बाजूला असेल तर तुम्ही त्याला नक्कीच झोपू देणार नाही. इतक्या दिवसांची कसर भरून काढायची असेल तर झोपेला महत्त्व कोण देणार? त्याच्याजवळ राहण्याची संधी नक्कीच सोडता कामा नये. अशावेळी अशा तऱ्हेचा मेसेज करून तुम्ही त्याला जाणवून द्या की, बरेच दिवस झाले आहेत रोमान्स करून आणि आता झोपायची वेळ नाही तर रोमान्स करायची वेळ आहे.
फोन चालू असतानाच तुम्ही जर त्याला असं सांगितलं तर त्याला नक्की कळेल की, व्हिडिओ कॉल करायचा आहे. तुम्ही एकमेकांना असं बघणं हा तुमच्या लाईफमधील रोमान्सचा एक भाग आहे. तुम्ही त्याला थोडंफार तरसवणं आणि त्याला तुम्हाला बघायचंच आहे असं सांगणं यातील गंमतच वेगळी.
हे तुम्ही दोन्ही अर्थाने बोलू शकता. त्याला त्यातून अर्थ काढता आला पाहिजे. त्याला तुमचा मूड कळायला हवा हे नक्की. त्याला जर कळत नसेल तर त्यावर अधिक काहीतरी मेसेज पाठवा. पण तो जर तुम्हाला चांगलं ओळखत असेल तर त्याला याचा अर्थ नक्कीच कळेल.
असा मेसेज तुमच्या रोमान्सला नक्कीच स्पाईस अप करतो. तुम्हाला माहीत असतं की, त्याला तुम्हाला कोणत्या कपड्यांमध्ये बघायला आवडतं. पण तरीही तुम्ही त्याला विचारता तेव्हा त्याला नक्कीच उत्तेजना मिळते.
त्याच्या हातांचा स्पर्श आपल्याला नेहमीच जाणवत राहतो. त्यालाही माहीत असतं की तुम्हाला कुठे स्पर्श केला की, तुम्ही त्याच्या अधिक जवळ जाता. त्यामुळे त्याला त्याची पुन्हा जाणीव करून द्या.
त्याच्या मानेवर दिलेला लव्ह बाईट हा त्याला हवंहवंस वाटणारं फिलिंग आहे. त्यामुळे तुम्ही हे त्याला मेसेजद्वारे कळवल्यानंतर त्यालादेखील तुमची आठवण येईल.
मला तुझ्या श्वासांची ओढ लागली आहे असं म्हटल्यानंतर त्याला नक्कीच कळायला लागेल. त्यालाही तुमच्याजवळ यायची ओढ लागेल.
तुमच्यामध्ये सेक्सबद्दल चर्चा होणंही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा असा मेसेज त्याला कराल तेव्हा त्याला कळेल की, तुम्हालादेखील सेक्समध्ये इंटरेस्ट आहे. तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
कोणत्याही मुलाला तुम्ही पुढाकार घेतलेला आवडतो. त्यामुळे सेक्स्ट मेसेजमध्येदेखील तुम्ही त्याला असं विचारल्यानंतर त्याला बरं वाटतं आणि तो तुम्हाला अधिक चांगल्या तऱ्हेने रिप्लाय देतो.
हा प्रश्न तर अगदी कॉमन आहे. पण याचं उत्तर नॉटी येणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने डोळे, हात असं काही उत्तर दिलं तर तुम्ही त्याला अजून वेगवेगळे प्रश्न विचारा.
त्याची मिठी ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. हे त्यालादेखील जाणवू द्या. त्याला तुमच्याजवळ येण्यासाठी अशा तऱ्हेचे मेसेज तुम्ही करू शकता.
तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही असं सांगितलं तर त्याला ते जास्त आवडतं आणि त्यातून तुमच्या पुढच्या सेक्स्ट मेसेजला सुरुवात होते.
बॉयफ्रेंडच्या तुम्ही बऱ्याचदा जवळ असता. पण लग्न झाल्यानंतर तुमच्या नात्यातील स्पाईस थोडा कमी होतो. कुटुंबाची जबाबदारी आणि इतर गोष्टींमुळे तुमच्यातील रोमान्सदेखील कमी होऊ लागतो मग अशावेळी तुम्हाला असे मेसेजच आधार देतात.
बऱ्याच दिवसात तुम्ही एकमेकांजवळ आला नसाल तर त्याला असा मेसेज पाठवून त्याची आठवण करून द्या. तुमच्यातील स्पाईस पुन्हा जागवा
त्याला बरेच दिवस वेळ नसतो तेव्हा तुम्ही त्याला असा मेसेज करून रिलॅक्स होण्यासाठी सांगा आणि तुमच्यातील रोमान्स जागवणं हा त्यासाठी योग्य पर्याय आहे.
त्याला मध्येच काहीतरी सरप्राईज द्या. उदा. एखादी नवी लिंगरी अथवा अंडरगारमेंट ट्राय करून त्याला अधिक उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा. काय सरप्राईज आहे याची हिंट वेळोवेळी त्याला मेसेज करून देत राहा.
त्याच्यावर तुमचं असणारं प्रेम त्याला असा मेसेज करून जाणवू द्या. कामाच्या प्रेशरमध्ये असताना असा मेसेज पाहिल्यावर त्यालाही बरं वाटतं.
त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी असा मेसेजसुद्धा त्याला स्पाईप अप करायला पुरेसा ठरतो. अशी डेट तुमच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणू शकते.
तो कसा दिसत आहे हे तुम्ही त्याला सांगा आणि त्याला जवळ आणण्यासाठी त्याची स्तुती करा. तुमच्या रोमान्समध्ये नक्कीच भर पडेल.
नवऱ्याला तुम्ही पुढाकार कधीतरी घ्यावा असं वाटत असतं. असा मेसेज करून तुम्ही त्याला तुमच्या मनातील इच्छा सांगा. तो नक्कीच नकार देणार नाही.
कितीही कामात असाल तरी तुम्ही जर त्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुमच्या नवऱ्यासाठी ते सुखावह असेल. त्यामुळे त्याची जाणीव त्याला होऊ द्या.
कधीतरी त्याच्या आवडीचे कपडे घाला आणि मग बघा कसा स्पाईस येतोय तुमच्या रोमान्समध्ये. तुम्हाला असं पाहिल्यानंतर तो स्वतःवर नक्कीच नियंत्रण ठेऊ शकणार नाही.
हे गाणं सर्वांनाच माहीत आहे आणि याचा अर्थ आजही तितकाच हवाहवासा वाटणारा आहे. तुम्हाला आज काय वाटतं आहे हे तुम्ही त्याला या गाण्यामार्फत नक्कीच सांगू शकता.
या मेसेजचा अर्थ त्याला इतकी वर्ष झाल्यानंतर तर नक्कीच कळेल. असा मेसेज पाठवल्यानंतर तो आनंदी तर होईलच. पण त्याचबरोबर काय काय करायचं याचे मेसेजही तुम्हाला पाठवेल.
कितीतरी दिवसात जर एकत्र आंघोळ केली नसेल तर त्याला त्याची आठवण करून द्या. पाण्यात एकमेकांच्या जवळ असणं यापेक्षा अधिक चांगला रोमान्स काय असू शकतो.
‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स
कितीतरी दिवस झाले असतील तर तुम्हाला त्याची आठवण येत आहे हे त्याला जाणवून द्या. तो तुम्हाला आताच्या आता जवळ हवा असेल तर त्याला तसं सांगा
बऱ्याच वेळा तुम्ही सेक्स करून झालं असेल तर वेगळी पोझिशन ट्राय करायला त्याला सांगा. त्याला आधीच मेसेज पाठवून ठेवा. म्हणजे नक्की कोणती पोझिशन ट्राय करायची याचा तो विचार करून ठेवेल.
तुमचा एखादा सेक्सी फोटो पाठवून त्याला त्याबद्दल विचारा आणि लवकरच घरी येण्यासाठी त्याला उत्तेजित करा.
त्याला त्याच्या दिसण्याबद्दल तुम्ही मनापासून सांगा आणि त्यानंतर तुमच्या जवळ असताना तो अधिक सुंदर दिसतो हेदेखील सांगा. म्हणजे तो नक्कीच तुमच्या अधिक जवळ येईल.
त्याच्याबरोबर अधिक नॉटी व्हायचं असेल तर तुम्ही त्याला त्याच्या आवडीचा हा प्रश्न नक्की विचारा आणि त्यानंतर नक्कीच तुमचं सेक्स्टिंग सुरु व्हायला वेळ लागणार नाही.
तुम्ही त्याला ज्या प्रेमाच्या नावाने हाक मारता, ते नाव लिहून त्याला आजच्या रात्रीच्या प्लॅनबद्दल सांगा पण नक्की काय सरप्राईज आहे याचा विचार त्याला करू द्या.
तुमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं असेल तर तुम्ही त्याला असा मेसेज पाठवून शांत करण्याचा नक्की प्रयत्न करू शकता. त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी टेक्स्ट करा.
त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीचा मेसेज करून त्याला आपल्या जवळ आणण्याचा आणि आपल्या आयुष्यातील रोमान्स अधिक खुलवण्याचा प्रयत्न करा.