यासाठी भारतीय संस्कृतीत नारळाला आहे ‘श्रीफळाचा मान’

यासाठी भारतीय संस्कृतीत नारळाला आहे ‘श्रीफळाचा मान’

भारतीय संस्कृतीत नारळाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात कोणत्याही गोष्टीची सुरूवात करण्याआधी नारळ वाहण्याची पद्धत आहे. धार्मिक विधीत अथवा घटस्थापना करण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं.याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मानसन्मान देण्यासाठी त्याला ‘शाल आणि नारळ’ म्हणजेच ‘श्रीफळ’ दिलं जातं. नारळाला भारतात देवाचं फळ मानलं जातं. ज्यामुळे धार्मिक विधी नारळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. नारळाला श्रीफळाचा मान का दिला जातो यामागे अनेक आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारण दडलेली आहे. नारळ हे एक बहुगुणी फळ आहे. भारतात नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. कारण या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर केला जातो. नारळाचं पाणी तहान लागलेल्या व्यक्तीसाठी अमृतासमान असतं. शिवाय नारळाची पाने, खोड, मुळं अशा सर्वच गोष्टीचा वापर केला जातो. ज्यामुळे नारळाकडे समृद्धीचं एक प्रतिक म्हणून पाहीलं जातं. नारळाप्रमाणे गुणसंपन्न आणि समृद्ध व्हावं यासाठी भारतात नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं. 

instagram

नारळाचे आरोग्यदायी फायदे -

नारळ हे शक्तीवर्धक आणि थंड प्रवृत्तीचे फळ आहे. आजारी माणसाला शहाळे म्हणजेच कोवळा नारळ दिल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते. शहाळं, नारळ, सुकं खोबरं या तिन्ही प्रकारतील नारळ स्वयंपाकात वापरण्यात येतो. नारळाचा स्वयंपाकात वापर केल्यामुळे शरीरावर  अनेक चांगले फायदे होतात. कारण नारळात फायबर्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत उर्जा मिळते. गरोदर महिलांसाठी नारळ म्हणजे वरदानच आहे. बाळाचे आरोग्य सुधारण्यााठी या काळात महिलांना शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात अशक्त लोकांनी नारळपाणी प्यायल्यास त्यांना डिहाड्रेशनचा त्रास होत नाही. नारळपाण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये युरीनद्वारे बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमचा मूत्रमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. किडनी निरोगी राखण्यासाठी दिवसाची सुरूवात नारळपाण्याने करावी. नारळपाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटू लागतं. नारळपाण्यात पुरेसे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. जे हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. थोडक्यात नारळ हा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. 

हिबिस्कसच्या फुलांच्या फायद्यांविषयी देखील वाचा

shutterstock

सौंदर्यासाठी उपयुक्त

भारतात अनेक ठिकाणी नारळाच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. खरंततर खाद्यतेलामुळे शरीरात फॅट जमा होते आणि तुमचे वजन वाढण्यास मदत होते. मात्र नारळाच्या तेलात बनवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फॅट कमी असते. ज्यामुळे तुमचे वजन आपोआप नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय नारळाच्या तेलात तयार केलेल्या खाद्यपदार्थांना एक विशिष्ठ स्वाद देखील असतो. त्याचप्रमाणे नारळाचे तेल तुम्ही तुमचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरू शकता. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी, स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी, मॉश्चराईरसारखा वापर करण्यासाठी, नखांची काळजी घेण्यासाठी, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी, केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी, ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचं खोबरं, पाणी, तेल याचा वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य आणि सौंदर्य खुलवू शकता. शिवाय नारळाच्या झाडाची पाने, खोड, मुळे, नारळाच्या फळाचे कवच वापरून विविध गृहोपयोगी वस्तू केल्या जातात. थोडक्यात नारळ माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचे फळ आहे. बाहेरून कठीण आणि आतून मृदु अशी अदभूत नैसर्गिक रचना असलेल्या नारळाच्या फळाला धार्मिक विधीत श्रीफळाचं स्थान आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Navratri Special : नऊ दिवसांमध्ये देवीला दाखवण्याचे नेवैद्य

प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

या नवरात्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी ‘झेंडू’च्या फुलांचा असा करा वापर