ADVERTISEMENT
home / Festival
Diwali Special : धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू

Diwali Special : धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू

पुराणात धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी सणाची सुरूवात मानली जाते. असं म्हणतात की, समुद्र मंथनादरम्यान अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले होते. तेव्हापासून हा दिवस धनत्रयोदशीच्या रूपाने साजरा केला जातो. लोक एकमेकांंना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. हिंदू धर्मानुसार दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे लोक जास्तकरून या दिवशी चांदी किंवा सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करतात. पण या दिवशी जसं सोन-नाणं खरेदी करणं चांगलं मानलं जातं. तसंच काही गोष्टी विकत घेणं वर्ज्यही मानलं जातं. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी आणि कोणत्या वस्तूंची करू नये.  हे जर तुम्ही नीट फॉलो केलं तर दिवाळी शुभेच्छा संदेश (marathi diwali wishes) तुम्हाला नक्कीच मिळेल.

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी असते शुभ

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने घरात नेहमी सुख आणि समृद्धी कायम राहेत. अशी मान्यता आहे की, या दिवशी खरेदी केल्याने त्या वस्तूंमध्ये तेरा टक्क्याने वाढ होते. पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते. देव धन्वंतरी या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे.

मैत्रिणीसाठी ख्रिसमस भेट देखील वाचा

  • झाडू – या दिवशी झाडू खरेदी करावा. असं म्हटलं जातं की, ज्या पद्धतीने झाडू आपल घर स्वच्छ करतो तसंच या दिवशी झाडूची खरेदी केल्याने सर्व वाईट गोष्टीची आणि दारिद्रयाची स्वच्छता होते. तसंच घरात सुखाचं आगमन होतं. 
  • बिझनेस किंवा नोकरीशी निगडीत वस्तू – वास्तू एक्स्पर्ट्स मानतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या बिझनेस किंवा नोकरीशी निगडीत वस्तूंची खरेदी केल्यास ते शुभ असतं. यामुळे प्रगतीची दारं उघडतात आणि तुम्हाला भरपूर यश मिळतं. जसं तुम्ही व्यापारी असाल तर वहीखातं खरेदी करावं आणि जर शिक्षक असाल तर पेन किंवा पुस्तक. 
  • धण्याचं बी – शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धण्याच्या बिया खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते. खरेदी केलेले धणे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये वाहावे आणि उरलेले कुंडीत लावावे. तुमच्या घरात जर धण्याचं झाडं असेल तर ते शुभ मानलं जातं. तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं. हवं असल्यास तुम्ही धणे पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता.  
  • सोने- चांदीची नाणी – सोनं आणि चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत. जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा. या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, किर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. 
  • गणेश- लक्ष्मीची मूर्ती – दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्तीही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी. अशी मान्यता आहे की, या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश-लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते. ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी. पण लक्षात ठेवा की, या मूर्तीची उंची जास्त नसावी.
  • शंख – धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी. दिवाळी पूजेच्यावेळी शंखनाद नक्की करावा. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होतं. 

धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

  • काचेचं सामान – असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचं सामान चुकूनही खरेदी करू नये. कारण काचेचा संबंध हा राहूशी असतो. त्यामुळे या दिवशी काचेची वस्तू घेणं टाळा.
  • लोखंडाची वस्तू – या दिवशीची चुकूनही लोखंडापासून बनवलेली वस्तू घेऊ नका. जर अगदीच आवश्यक असेल तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी किंवा एक दिवसनंतर खरेदी करा. बरेच जण या दिवशी गाडीची खरेदी करतात. या दिवशी गाड्यांवर बऱ्याच ऑफरही असतात. पण जर तुम्ही गाडी घेणार असाल तर त्याचं पेमेंट एक दिवस आधी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची डिलीव्हरी घ्या. 
  • धारदार वस्तू – या दिवशी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका. जसं कात्री, चाकू किंवा एखादं हत्यार. यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. 
  • काळ्या रंगाची वस्तू – असं मानलं जातं की, काळा रंग हा नकारात्मकतेचा स्त्रोत आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका.
  • एल्युमिनिअमची भांडी – असं म्हणतात की, एल्युमिनिअम धातूवर राहूचा प्रभाव जास्त असतो. ज्यामुळे इतरही शुभ ग्रह प्रभावित होतात. तसंच एल्युमिनिअमचा वापर वास्तुशास्तर, आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही वाईट मानला जातो. कारण या धातूपासून बनवलेली एकही वस्तू पूजेमध्येही वर्ज्य मानली जाते.

या शिवाय दिवाळी साजरी करण्याची पारंपरिक पद्धत देखील तुम्हाला माहीत हवी. त्यामुळे दिवाळीतील प्रत्येक दिवसाचा अर्थ तुम्हाला नेमका कळेल.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

धनत्रयोदशी साजरी करण्यामागील कथा आणि पूजा विधी

DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

ADVERTISEMENT
22 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT