ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
केवळ दातांसाठीच नाही तर टूथपेस्टच्या वापराने होते ‘या’ गोष्टींवरही कमाल

केवळ दातांसाठीच नाही तर टूथपेस्टच्या वापराने होते ‘या’ गोष्टींवरही कमाल

टूथपेस्ट हा आपल्या प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य भाग आहे. याचा उपयोग आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नक्कीच दात घासण्यासाठी अर्थात दातांची काळजी घेण्यासाठी करावा लागतो. त्यामुळे आपल्या सर्वांना टूथपेस्टचा हा उपयोग माहीत आहेच. पण याव्यतिरिक्त टूथपेस्ट इतर गोष्टींसाठीही उपयुक्त ठरते आणि कमला दाखवते याची तुम्हाला कल्पना आहे का? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींसाठी तुम्हाला रोजच्या रोज टूथपेस्टचा वापर करता येऊ शकतो. मग तो उपयोग आपल्या त्वचेसाठी असो अथवा आपल्या दागिन्यांसाठी असो याचा वापर करता येतो. आम्ही तुम्हाला इथे काही टूथपेस्टच्या ट्रिक्स आणि काय उपयोग करता येऊ शकतो ते सांगणार आहोत. हे उपयोग तुम्हाला रोजच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील. त्यामुळे जाणून घेऊया टूथपेस्ट काय कमाल करते – 

पिंपल्सपासून मिळते सुटका

Shutterstock

हे वाचून तुम्हाला नक्कीच थोडा धक्का बसेल. कारण आपल्या पिंपल्स आणि चेहरा अत्यंत जपतो. मग अशावेळी पिंपल्ससाठी टूथपेस्टचा वापर कसा काय करू शकतो असा प्रश्नही निर्माण होईल. पण हे खरं आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या मुरूमांसाठी अर्थात पिंपल्ससाठी टूथपेस्टचा वापर करू शकता. याचा उपयोग तुमच्या त्वचेसाठी एखाद्या औषधाप्रमाणे होतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला आलेल्या पिंपल्सवर तुम्ही टूथपेस्ट लावा. रात्रभर हे असंच राहू द्या. सकाळी उठून दात घासून झाल्यावर तोंड व्यवस्थित धुवा. असं तुम्ही आठवडाभर केलंत तर तुम्हाला नक्कीच तुमच्या पिंपल्सपासून सुटका मिळेल. यामध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व असल्याने त्याचा त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही

फेसपॅक बनवण्यासाठी होतो उपयोग

Shutterstock

टूथपेस्ट तुमच्या त्वचेमध्ये उजळपणा आणण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस मिसळून फेसपॅक तयार करून घेऊ शकता. या फेसपॅकचा उपयोग तुम्ही तुमचा चेहरा उजळवण्यासाठी करू शकता. इतकंच नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळी वर्तुळं (Dark Circles) घालवण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. टूथपेस्टमध्ये असणारी अँटिबॅक्टेरियल तत्व तुमचा चेहरा उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

ADVERTISEMENT

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी फायदेशीर

Shutterstock

कपड्यांना लागलेली शाई आणि लिपस्टिकचे डाग घालण्यासाठी टूथपेस्ट अतिशय फायदेशीर आहे. टूथपेस्ट लावल्यावर हे डाग अगदी लवकर जाण्यास मदत होते. तुम्हाला केवळ डाग असणाऱ्या ठिकाणी टूथपेस्ट लावायची आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिट्ससाठी तसंच राहू द्या. त्यानंतर तुम्ही तो कपडा व्यवस्थित धुवा. लागलेला डाग नक्की निघून जाईल. 

जळजळ होत असल्यास मिळतो त्वरीत आराम

ADVERTISEMENT

Shutterstock

बऱ्याचदा कामाच्या घाईत हात भाजण्यासारख्या गोष्टी घडतात. मग अशावेळी टूथपेस्ट हा त्वरीत उपाय आहे. कारण भाजल्यानंतर होणारी जळजळ टूथपेस्टमुळे थांबते. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा हात भाजलेल्या ठिकाणी थंड पाण्याने धुऊन घ्या. ते सुकू द्या आणि मग त्यावर सफेद टूथपेस्ट लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही पुन्हा टूथपेस्ट लावा. जळजळ झाल्यास, तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे अंगावर त्याचा डाग राहणार नाही. 

 

काच चमकवण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

तुमच्या घरातील काचा जर धुरकट झाल्या असतील आणि कपड्याने पुसूनही त्याचा धुरकटपणा कमी होत नसेल तर तुम्ही थोडासा टूथपेस्टचा वापर करून कपड्याने पुसून घ्या. असं केल्याने तुमची काच चमकेल. काच अथवा टेबलवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही त्यावर पेस्ट लावून कपड्याने पुसल्यास हे डाग निघून जातील. 

स्क्रीनवरून स्क्रॅच घालवण्यासाठी

तुम्ही लॅपटॉप, मोबाईल अथवा टीव्हीच्या स्क्रिनवर जर स्क्रॅच आला असेल तर तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त काच साफ करणाऱ्या रूमालावर थोडीशी टूथपेस्ट लावून स्क्रॅच साफ करायचं आहे. त्यामुळे तुमच्या स्क्रिनवरून स्क्रॅच घालवू शकता.  

चांदीचे दागिने अथवा भांडी चमकवण्यासाठी

ADVERTISEMENT

Shutterstock

चांदीचे दागिने नेहमी काळे पडतात. अशावेळी ब्रशवर पेस्ट लावून तुम्ही ही भांडी अथवा दागिने साफ करावे. गरम पाण्यासह तुम्ही टूथब्रशला पेस्ट लावून दागिने साफ करा. हे दागिने धुताना गरम पाण्यानेच धुवा म्हणजे त्याची चमक चांगली राहाते.

पिवळे दात मोत्यासारखे शुभ्र होण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय 

नखांची चमक वाढवण्यासाठी

नेलपेंट काढून टाकल्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी टूथपेस्ट लावून 5 ते 10 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर तुम्ही मालिश करा. हे झाल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट कापसाने साफ करा. असं केल्याने तुमच्या नखांना व्यवस्थित चमक येईल. आठवड्यातून कमीत कमी 2-3 वेळा हे नक्की करा. वास्तविक टूथपेस्टमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड असतं त्यामुळे डाग काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

इस्त्रीला लागलेला डाग हटवण्यासाठी

Shutterstock

बऱ्याचदा अति हिटमुळे इस्त्री कपड्यांवर चिकटते आणि त्यामुळे कपडे जळतात. पण इस्त्रीवरील असे डाग हटवण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा उपयोग करू शकता. इस्त्री काळी झाली असेल तिथे तुम्ही टूथपेस्टने रगडा. असं केल्याने डाग लगेच निघून जातील. 

पिवळ्या दातांनी हैराण असलात तर करा 8 घरगुती उपाय

ADVERTISEMENT

भींतीवरील तडा भरण्यासाठी

भींतीवर काहीतरी लटकवण्यासाठी आपण बऱ्याचदा ड्रिलिंगचा वापर करतो. पण शो पिस काढून टाकल्यानंतर ती जागा अतिशय खराब दिसते. अशावेळी टूथपेस्टचा वापर करून ही जागा तुम्ही भरू शकता. त्यामुळे ते दिसायला वाईटही दिसत नाही आणि ती जागा योग्य भरून जाते. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

30 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT