ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
steam on face

सणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग (Steam For Glowing Skin)

दिवाळी सुरू झाली आहे आणि दिवाळीला रेलचेल असते ती सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन भेट द्यायची किंवा घरी पाहुणे येण्याची. अशावेळी आपल्याला सर्वात जास्त चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असतं. पण कधी कधी कामात आपल्याला आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी अथवा चमकदार बनवण्यासाठी पार्लरमध्ये जाण्यास वेळ नसतो. मग अशावेळी नक्की काय करायचं? अशावेळी घरच्या घरी तुम्ही नक्कीच तुमच्या चेहऱ्यासाठी उपाय करू शकता. तुम्ही त्यासाठी वाफेचा उपयोग करून घेऊ शकता. वाफेचा उपयोग करायचा म्हणजे नक्की काय करायचं असाही प्रश्नही आता तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देणार आहोत. घरात काळजीपूर्वक तुम्ही वाफ घेतली तर तुमचा खर्चदेखील वाचतो आणि त्वचाही चमकदार होते. वाफेचा उपयोग नक्की कसा करायचा पाहूया – 

चेहरा क्लीन आणि चमकदार बनवण्यासाठी 10 घरगुती उपाय

कशी घ्यावी वाफ ? (How To Take Steam In Marathi)

Shutterstock

ADVERTISEMENT

वाफ घेण्याची पद्धत असते. केवळ वाफ घ्यायची म्हणून घेऊ नका. त्याची पद्धत जाणून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमचा चमकदार करण्यासाठी उपयोग होईल. तसंच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या मनातील विचार हे तुमच्या चेहऱ्यावरील चमकदारपणामध्ये उतरतात. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सोप्या टिपा जाणून घ्या. त्यामुळे वाफ घेताना नेहमी तुमचं मनही स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया वाफ घेण्याची नेमकी पद्धत काय आहे – 

  • पहिल्यांदा वाफ घेण्यासाठी आपल्या उंचीनुसार टेबल घ्या
  • वाफ घेण्याआधी आपले केस व्यवस्थित बांधलेले असावेत
  • तसंच चेहरादेखील स्वच्छ धुऊन घ्यावा
  • वाफ घेताना टॉवेलची व्यवस्था करणंही आवश्यक आहे
  • एका भांड्यात 4-5 ग्लास पाणी उकळून घ्या 
  • वाफेचं  भांडं तुमच्याकडे असेल तर उत्तमच. त्यात 4-5 ग्लास पाणी उकळून घ्या 
  • गॅसवर वाफ घेण्याची चूक अजिबात करू नका
  • तुमचा चेहरा वाफ घेताना पाण्यापासून 6-7 इंचाच्या लांबीवर ठेवा आणि वाफ घेताना डोक्यावर टॉवेल ठेवा
  • तुम्हाला हवं असल्यास, वाफ घेताना तुम्ही निलगिरीचं तेल अथवा विक्सदेखील पाण्यात मिक्स करू शकता
  • अधिक वाफ यायला लागल्यावर डोकं वर करा आणि टॉवेल बाजूला घ्या आणि पुन्हा एक मिनिटाने वाफ घ्या
  • असं आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुम्हाला अप्रतिम चेहरा मिळतो

तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

वाफ घेतल्याने होतात पुढील फायदे (Benefits Of Steam For Glowing Face)

Shutterstock

ADVERTISEMENT

वाफ घेतल्याने आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. चेहरा चमकदार होण्याचा फायदा तर सर्वांना माहीत आहे पण इतरही अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया – 

1. त्वचेवरील डेड स्किन घालवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी वाफेचा उपयोग तुम्हाला करून घेता येतो. कोणतंही सौंदर्य उत्पादन न वापरता तुम्ही चमकदार त्वचा यामुळे मिळवू शकता

2. वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील ताण कमी होऊन निघून जातो. कारण वाफ घेतल्यानंतर त्वचेमधील रक्त पसरण्यास मदत मिळते आणि रक्ताचा योग्य संचार होतो. पेशींमध्ये रक्तप्रवाह वाढून चेहरा अधिक तजेलदार दिसायला मदत मिळते. यामुळे त्वचेला अधिक प्रमाणात पोषक तत्व मिळतं आणि त्वचा अधिक तरूण दिसायला लागते. 

चेहरा कायम चमकदार राहण्यासाठी करा ‘योग्य’ व्यायाम

ADVERTISEMENT

3. चेहऱ्यावर नियमित वाफ घेतल्यास, त्वचेतील टॉक्झिन्स निघून जाण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी पदार्थ वाफेवाटे बाहेर येऊन त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत होते. 

4. चेहऱ्यावर असलेल्या छिद्रांमधील घाण, बॅक्टेरिया बाहेर पडण्यास याचा चांगला उपयोग होतो. वाफेमुळे सहज ही घाण बाहेर पडून तुमचा चेहरा अधिक ताजातवाना दिसतो. 

5. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी नियमित वाफ घेणं फायदेशीर ठरतं.  तसंच तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून त्यातील ओलावा टिकवून ठेवण्याचं काम वाफ करते. त्यामुळे तुम्ही तुमचा चेहरा चमकदार ठेवण्यासाठी याचा नियमित वापर करू शकता हे लक्षात ठेवा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

19 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT