वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण | POPxo

वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण (Benefits Of Triphala Powder)

वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण (Benefits Of Triphala Powder)

वर्षानुवर्ष आपल्या शरीराच्या कोणत्याही समस्येसाठी योग्य उपचार हे आयुर्वेदात (Ayurveda) सापडतात. ही नक्कीच अतिशयोक्ती नाही. हे खरं आहे. आपली बदलती लाईफस्टाईल (lifestyle) आणि रोजचा थकवा यामुळे अनेक आजार शरीरामध्ये आपलं घर बनवतात आणि हे तथ्य आहे. पण आपण वेळीच आपल्या शरीराची काळजी घेतली तर तुम्ही या रोजच्या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारण 2000 वर्षोंपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिफळाचा (Triphala) वापर करता येईल. आयुर्वेदातील एक अत्यंत उत्कृष्ट आणि उपयुक्त असं त्रिफळा असून याच्या फायद्याची यादी ही खूपच मोठी आहे. आवळा, बहेड़ा आणि हरड़ या तीन वेगवेगळ्या वनस्पतींनी तयार करण्यात आलेलं त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) हे बऱ्याच आजारांवर उपयुक्त असल्याचं मानलं जातं. तुम्ही तुमचा आज आणि भविष्यदेखील चांगलं करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला त्रिफळा चूर्णाच्या इतर फायद्यांविषयी जाणून घ्यायला हवं. केवळ आजारांसाठीच नाही तर वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही त्रिफळा अत्यंत उपयुक्त आहे. पण त्यापूर्वी त्रिफळा चूर्ण म्हणजे नक्की काय असतं ते जाणून घेऊया. 

Table of Contents

  त्रिफळा चूर्ण म्हणजे नेमकं काय? (What is Triphala Powder?)

  Shutterstock
  Shutterstock

  त्रिफळा एक आयुर्वेदिक हर्बल (herbal) चूर्ण आहे, ज्यामध्ये अमालकी (आवळा), बिभितकी (बहेडा) आणि हरितकी (हरड़) अशा तीन वनस्पतींचा वापर करून वाटून त्याचं चूर्ण बनवण्यात येतं. त्रिफला चूर्णच्या एका भागात हरड, दोन भाग बहेडा आणि पाव भाग आवळा असं मिश्रण असतं. याचा उपयोग वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी करण्यात येतो. या तीनही फळांमध्ये गोड, आंबट, कडू, खारट असे विविध स्वाद असतात. तीन फळांची पावडर असल्याने त्रिफळा चूर्ण हे एका अनोख्या स्वादाचं मिश्रण तर तयार होतंच शिवाय याचे पोषक गुणधर्म अनेक फायदे शरीराला मिळवून देतात. आयुर्वेदानुसार, तुम्हाला जर वात, कफ आणि पित्त यापैकी कोणतेही दोष असतील तर त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने हे दोष नीट होऊन तुमचं शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. 

  Also Read: Home Remedies To Reduce Bad Breath In Marathi

  त्रिफळा चूर्णाचे फायदे (Benefits of Triphala)

  Shutterstock
  Shutterstock

  तसे तर त्रिफळा चूर्णाचे फायदे आपल्याला माहीत आहेत. पण केवळ पचनशक्तीसाठी होणारा फायदा आपल्याला माहीत आहे. याशिवायदेखील या चूर्णाचं सेवन केल्याने फायदे होत असतात. नक्की काय फायदे आहेत ते पाहूया - 

  वजन कमी करण्यासाठी (To Lose Weight)

  Shutterstock
  Shutterstock

  • त्रिफळा चूर्ण मेटाबॉलिज्म (metabolism) व्यवस्थित राखून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 
  • तुम्हाला जर व्यायाम (exercise) अथवा डाएटिंग (dieting) करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही नियमित त्रिफला चूर्णाचं सेवन करून वजन कमी करू शकता. 
  • ज्या लोकांना पचनाची समस्या आहे त्यांना नेहमी भूक लागल्यासारखं वाटत राहातं. त्यामुळे विचार न करता अशा व्यक्ती सतत खात राहातात. त्यामुळे त्यांची वजन आणि जाडी दोन्ही वाढू लागते. 
  • शरीरातील मोठ्या आतडीसाठी त्रिफळा फायदेशीर समजण्यात येतं. त्रिफळा आतड्यांना मजबूत करून आतड्या साफ ठेवण्यासाठीही मदत करतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 
  • हे चूर्ण तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ अगदी सहज काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अतिरिक्त चरबी आणि जाडी कमी होण्यास मदत होते. 

  डोळ्यांकरिता फायदेशीर (For eyes)

  Shutterstock
  Shutterstock

  • त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने डोळ्यांचे बरेच आजार बरे होतात आणि यामुळे तुमच्या दृष्टीमध्येदेकील सुधारणा होते. 
  • हे चूर्ण डोळ्यांच्या मांसपेशींना मजबूत बनवतं आणि ग्लुकोमा (glucoma) आणि मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या आजारांवरही सुरुवातीच्या स्टेजला बरं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 
  • डोळे येणं यासारख्या समस्येवरही त्रिफळा अतिशय फायदेशीर आहे. त्रिफळा चूर्णामध्ये यष्टिमधु आणि लोहभस्माशिवाय सप्तामृत लोहदेखील आढळतं. जे तुमच्या डोळ्यांची समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतं. 
  • शुद्ध लोण्याने बनलेलं त्रिफला घृत आणि त्रिफला चूर्णानेदेखील डोळे चांगले राहतात. तसंच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

  त्वचेसाठी ठरतं उपयुक्त (For skin)

  Shutterstock
  Shutterstock

  • त्रिफळा चूर्णाने त्वचेसंबंधी अनेक समस्यांवर उपचार करता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते
  • त्वचेवरील डेड स्किन घालवून तुमच्या शरीरावरील छिद्र आणि रक्त स्वच्छ करण्यासाठी याची मदत होते
  • त्वचेवर कोणत्याही प्रकारचे रॅशेस, पिंपल्स अथवा सनबर्न (sunburn) असल्यास, त्रिफळा चूर्णाने हे निघून जाण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये रक्तासाठी  पोषक गुण आहेत. 
  • यातील आवळा कोलेजन (collagen) निर्माण करण्यासा उपयुक्त असून बहेडा स्किन पिगमेंटेशन (skin pigmentation) साठी मदद करतं. तसंच यातील विटामिन सी (Vitamin C) मुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. 
   त्वचा कोरडी असेल तर ते घालवण्यासाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय त्वचेवरील दूषित पदार्थ घालवण्यासाठीही याचा फायदा होतो. 

  बद्धकोष्ठ (Constipation)

  • बद्धकोष्ठाचा त्रास घालवण्यासाठी बरेच लोक अनेक उपाय शोधतात. पण त्यावर त्रिफळा चूर्ण हा रामबाण उपाय आहे. 
  • हे शरीराची चयापचय क्रिया योग्य करून पचनतंत्र सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचं नियमित सेवन केल्याने तुमचं पोट साफ होण्यासाठी अतिशय सोपं होतं. 
  • ज्या व्यक्तींना रोज शौचाची समस्या आहे त्यांच्यासाठीही त्रिफळा चूर्ण नियमित खाणं हे अत्यंत उपुयक्त आहे. 

  दातांसाठीही उपयुक्त (For Teeth)

  Shutterstock
  Shutterstock

  • त्रिफळामध्ये अँटी- इंफ्लेमेट्री (anti- inflammatory) आणि अँटी- बॅक्टेरियल (anti- bacterial) गुण आढळतात. 
  • त्रिफळा खाल्ल्याने दातांवर जमा झालेला मळ, कीड, हिरडीला आलेली सूज आणि हिरड्यातून रक्त येणं अशा समस्येपासून सुटका मिळते. 

  केसांसाठी होतो फायदा (For Hair)

  Shutterstock
  Shutterstock

  • रोजच्या जगण्याचा केसांंवर त्वरीत परिणाम होत असतो. कमी वयात पडणारं टक्कल, केस पांढरे होणं आणि केसगळती या समस्या मोठ्या प्रमणात असतात. त्रिफळामध्ये असणारं विटामिन सी (Vitamin C) केसांसाठी अधिक फायदेशीर ठरतं. 
  • त्रिफळामध्ये (Triphala) काही असे पोषक तत्व आहेत जे केसांच्या आत मुळापर्यंत जाऊन त्याचा विकास करतात आणि समस्या सोडवतात. 
  • केसगळती रोखण्यासाठी तुम्ही रोज 2- 3 ग्रॅम त्रिफळा घेऊन त्यात 125 मि.ग्रॅ. लोहभस्म अथवा लोह गोळी (iron) मिक्स करून त्याचं सेवन करा. 
  • त्रिफळातील आवळा हे केसांसाठी अधिक उपयुक्त ठरतं

  'दालचिनी'चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते

  लहान मुलांचे दात होतात मजबूत (For kids)

  • त्रिफळा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ब्रश (brush) करण्यासाठी हे पाणी वापरा. तसंच काही काळ पाणी तसंच तोंडात ठेवा आणि मग चूळ भरा. असं केल्याने मुलांचे दात मजबूत राहण्यासाठी उपयोग होतो
  • लहान मुलांसाठीही याचं सेवन फायदेशीर आहे. त्यांचे दात आणि हिरड्या म्हातारपणापर्यंत चांगले राहतात असं म्हटलं जातं. 

  तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी (Bad Breath)

  • तोंडाला येणारी दुर्गंधी आणि येणाऱ्या पुळ्या यातूनही त्रिफळा चूर्ण सुटका मिळवून देतं. यासाठी त्रिफळा चूर्णासारखा दुसरा रामबाण उपाय नाही असंही म्हटलं जातं
  • त्रिफळामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण तोंडातील पसरलेली दुर्गंधी मिटवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच सतत येणारा वास हा काही कालावधीनंतर नष्ट होण्यासाठीही याचा नियमित वापर केल्यास उपयोगी ठरतो. 

  केसांच्या वाढीसाठी (Hair Growth)

  Shutterstock
  Shutterstock

  • केसांची वाढ सहसा या प्रदूषणामध्ये नीट होत नाही. पण तुम्ही रोज त्रिफळा चूर्णाचं सेवन केलंत तर तुम्हाला या समस्येपासूनही सुटका मिळेल. 
  • त्रिफळा चूर्णातील विटामिन सी हे तुमच्या केसांच्या वाढीला बळकटी मिळवून देतं. योग्य प्रमाणात याचं सेवन नियमित केल्यास, तुमच्या केसांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरतं
  • तुम्ही याचा उपयोग खाऊनदेखील करू शकता अथवा चूर्ण पाण्यात भिजवून केसांना लाऊनदेखील केस वाढीसाठी याचा उपयोग होतो. यातील आवळ्यामुळे केसांना अधिक चांगलं पोषण मिळतं. 

  हार्मोन्स संतुलित राहातं (Hormones Remain Balanced )

  • गरम पाण्यासह अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घालून खाल्ल्यास, तुमचे हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या दिवसात त्रास जाणवत नाही
  • तुमची मासिक पाळीदेखील त्रिफळा चूर्णाचं सेवन केल्याने नियमित होते

  रक्तदाबावर नियंत्रण आणतं (Controls Blood Pressure)

  • सतत रक्तदाबाच्या समस्येमुळे शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात. रक्तदाबामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण त्रिफळा चूर्णामुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण राहातं
  • त्रिफळा चूर्णाचा नियमित वापर केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहातो

  जखम बरी करण्यास होते मदत (Healing Wounds)

  Shutterstock
  Shutterstock

  • जखम बरी करण्यासाठीदेखील तुम्हाला त्रिफळा चूर्णाचा वापर करता येतो. 
  • त्रिफळा चूर्णामध्ये अँटी-मायक्रोबायल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात
  • त्यामुळे जखम बरी करण्यासाठी याचा चांगला उपयोग करता येतो

  हाडांचा त्रास कमी करण्यासाठी (Reduce Bone pain)

  • हाडांचा त्रास हा एका विशिष्ट वयात सुरू होतो. पण त्रिफळा चूर्णामध्ये हाडांचा त्रास कमी करण्यासाठी लागणारी पोषक तत्व आढळतात
  • तसंच त्रिफळा चूर्ण शरीरातील विषारी अॅसिड्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात, ज्यामुळे हाडांना त्रास होत असतो
  • गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून हे मिश्रण नियमित घेतल्यास, हाडांचा त्रास होत नाही

  युरीन इन्फेक्शन (Cures Urine Infection)

  Shutterstock
  Shutterstock

  • युरीन इन्फेक्शन हे महिला अथवा पुरुष कोणालाही होऊ शकतं. बऱ्याचदा याची काळजी घेणं अत्यंत कठीण होतं. 
  • त्रिफळा चूर्णातील अँटीबायोटिक गुणांमुळे युरीन इन्फेक्शन बरं होण्यास मदत मिळते

  जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

  अल्सरपासून मिळते सुटका (Get Rid Of Ulcer)

  • अल्सरमुळे बऱ्याच जणांना त्रास होत असतो. उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींना तर अल्सर सहन करणंही कठीण होतं
  • त्रिफळा चूर्ण रोज घेतल्यास, या समस्येपासून सुटका मिळते. यातील अँटिइन्फ्लेमेटरी गुणांमुळे शरीरातील इन्फ्लेशन कमी होण्यास मदत होते
  • शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यासही मदत होते

  तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका (Oral hygiene)

  • दात साफ नसल्याने  काही जणांना तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असते. पण त्रासातून मुक्त होण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग होतो
  • यातील अँटीमॅक्रोबायल तत्व तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवून देतात
  • तोंडातील किटाणूंशी लढा देण्यासाठीही त्रिफळा चूर्णाचा उपयोग होत असतो

  प्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत (Enhance immunity)

  Shutterstock
  Shutterstock

  • त्रिफळा चूर्ण तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं
  • वनस्पतीजन्य औषध असल्यामुळे यामध्ये आजारांशी लढण्याची जास्त प्रमाणात शक्ती असते. त्यामुळे तुमची प्रतिकाशक्ती हे रोज खाल्ल्यमुळे वाढते आणि त्याशिवाय तुम्ही कमी प्रमाणात आजारी पडता

  पचनक्रिया करतं चांगली (To resolve Digestive issue)

  • त्रिफळा चूर्णामध्ये समाविष्ट असलेल्या वनस्पतींमुळे तुमची पचनक्रिया  सुधारण्यसाठी फायदा मिळतो
  • पोट फुगणं,  पोटात दुखणं, गॅस होणं यासारख्या आजारांवर याचा उपयोग करून घेता येतो. यामध्ये असणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते

  डिटॉक्झिफार म्हणून करतं काम (Act as a detoxifier)

  • शरीरामध्ये निर्माण होणारे विषारी पदार्थ अर्थात टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग करता येतो
  • याचे गुणधर्म शरीरामध्ये टॉक्झिन्स राहू देत नाहीत. गरम पाण्याबरोबर त्रिफळा चूर्ण यासाठी घेतलं तर त्याचा जास्त फायदा होतो

  मधुमेहावरही ठेवतं नियंत्रण (Managing diabetes)

  Shutterstock
  Shutterstock

  • मधुमेह असल्यास, त्याची खूपच काळजी घ्यावी लागते. पण तुम्हाला जर माहीत नसेल तर त्रिफळा चूर्ण हे त्यावरील रामबाण उपाय आहे
  • शरीरातील साखरेची पातळी कमी आणण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे याचं नियमित सेवन करावं 

  त्रिफळा चूर्ण सेवन करण्याचे काही नियम (How to consume Triphala Churna?)

  Shutterstock
  Shutterstock

  त्रिफळा चूर्ण घ्यायला हवं हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं. पण ते नक्की कशा प्रकारे सेवन करायचं याचे काही नियम आणि पद्धती आहेत. त्याच आपण जाणून घेऊया -

  1. त्रिफळा तुम्ही चहा अथवा काढा स्वरूपात पिऊ शकता. वजन कमी करायचं असेल तर त्रिफळा काढ्यामध्ये मध मिक्स करा आणि मग ते प्या. 

  2. तांब्याच्या भांड्यात अथवा मातीच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात दोन चमचे त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कपड्यांमधून गाळून घ्या आणि मग तुमचे डोळे सकाळी या पाण्याने धुवा. तुमचे डोळे निरोगी राहण्यास मदत होते

  3. एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात साधारण 10- 15 मिनिट्सपर्यंत उकळून घ्या. हा काढा व्यवस्थित गाळून त्याने डोळे धुवा

  4. रात्री झोपण्यापूर्वी 5 ग्रॅम त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) कोमट पाण्यातून वा दुधातून प्यायल्यास, बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होण्यास मदत होईल

  5. पचनतंत्राशी जोडली गेलेली समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून रोज प्या

  6. तोंडाची दुर्गंधी नष्ट करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण मधामध्ये (honey) मिक्स करा आणि चाटा

  7. हलक्या गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करा आणि त्याने चूळ भरा. यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते

  8. केसांच्या वाढीसाठी त्रिफळाच्या 2 कॅप्सूल्स (capsule) खा

  9. केसांच्या मजबूतीसाठी आणि पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही त्रिफळा पेस्ट केसांना लावा आणि अर्धा तास तसंच ठेवून मग धुवा

  10. साधारण 5 ग्रॅम त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने दाद, खाज आणि त्वचा रोग (skin disease) यापासून सुटका मिळते

  आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

  त्रिफळा चूर्णाने होणारं नुकसान (Side effects of Triphala Churna)

  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्णानेदेखील तुम्हाला काही नुकसान होऊ शकतं. नक्की काय नुकसान होतं ते जाणून घेऊया - 

  1. गर्भवती आणि स्तनपान चालू असणाऱ्या महिलांनी याचं सेवन करू नये

  2. त्रिफळा चूर्ण खाल्ल्यानंतर काही व्यक्तींना झोप येते

  3. साधारण 6 वर्षांच्या खालच्या मुलांना त्रिफळा चूर्ण देऊ नये

  4. तुम्हाा बराच काळ त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) खायचं असेल तर याचं सेवन नक्की किती प्रमाणात करायचं हे ठरवून घ्या

  5. त्रिफळा अधिक प्रमाणात घेतल्यास, तुम्हाला जंताची समस्या होऊ शकते

  6. त्रिफळा चूर्ण जास्त खाल्ल्याने डायरिया (diarrhoea) होण्याचा धोका असतो

  7. त्रिफळाचं प्रमाण अधिक झाल्यास, डिहायड्रेशन (dehydration) सारख्या समस्येलादेखील सामोरं जावं लागू शकतं

  8. ज्या लोकांना त्रिफळा खाल्ल्याने झोप येण्याची समस्या (insomnia) आहे, त्यांनी सकाळऐवजी याचं सेवन रात्री करावं

  9. त्रिफळाची मात्रा शरीरासाठी उष्ण असते. त्यामुळे अधिक खाल्ल्यास, घाबरण्यासारखं वाटू शकतं

  10. याचं अधिक सेवन केल्यास, ब्लड शुगर (blood sugar)ची समस्यादेखील वाढीला लागते

  त्रिफळा चूर्णासंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQs)

  1. त्रिफळा चूर्ण दिवसातून किती वेळा घ्यावं?

  त्रिफळा चूर्ण तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळाच घ्या. त्यापेक्षा जास्त घेतल्यास, तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

  2. त्रिफळा चूर्ण शरीरासाठी उष्ण नसतं का?

  त्रिफळा चूर्णामध्ये तीन वनस्पतींचं मिश्रण असतं आणि आवळा, हरडा हे उष्ण पदार्थचं आहेत. त्यामुळे त्रिफळा चूर्ण नक्कीच उष्ण असतं. पण प्रमाणात खाल्ल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. 

  3. त्रिफळा चूर्ण गरोदर महिला खाऊ शकतात का?

  गरोदर महिलांनी अजिबात याचा वापर करू नये. एकतर या दिवसात प्रकृतीला उष्ण पदार्थांपासून दूर ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्रिफळा चूर्ण गरोदर महिलांनी खाऊ नये.  

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

  मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.