अल्पावधीतच लोकप्रिय झालेला ‘युवा सिंगर एक नंबर’ हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे मराठी वाहिनीवरील या कथाबाह्य कार्यक्रमांचा प्रवास लवकरच संपणार आहे. सुरूवातीपासूनच उत्कृष्ट गायकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन झाले आहे. दर्जेदार गायक, स्पर्धकांसाठी वयाचं नसलेले बंधन, वैभव मांगले आणि सावनी शेंडे असे उत्तम परीक्षक, खुमासदार सूत्र संचालन करणारी मृण्मयी देशपांडे या सगळ्या गोष्टी ‘युवा सिंगर’च्या यशात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. उत्कृष्ट गायनकलेच्या जोरावर स्पर्धकांनी ही स्पर्धा आणखी उंचीवर नेली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांची काव्यप्रतिभा व गुणवत्ता पाहून प्रेक्षक अनेकवेळा भारावून गेले होते. आता अंतिम टप्प्यात पोचलेल्या या स्पर्धेची चुरस आता खूपच वाढली आहे. पहिल्या पाच जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धक आपले सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोणत्या पाच स्पर्धकांमध्ये रंगणार स्पर्धा
युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमातील स्पर्धकांमध्ये सगळ्यात लहान असलेला ओंकार आणि राधिका सुद्धा सर्वांनाच ‘टफ फाईट’ देत आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे स्पर्धक परीक्षक व प्रेक्षकांचे खूप लाडके आहेत. जगदीश चव्हाण व चेतन लोखंडे यांच्या गाण्यातील वैविध्य हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. आपल्या आवाजाने त्यांनी सुद्धा सर्वांची मने जिंकली आहेत. एम. एच. फोक या गटाने लोकसंगीताच्या साहाय्याने प्रेक्षकवर्गावर जादू केलेली आहे. दर्शन-दुर्वांकुर आणि पूजा-पल्लवी या जोड्या सुद्धा सगळ्यांवर छाप पाडण्यात अनेकवेळा यशस्वी झाल्या आहेत. चित्रपट सृष्टीत पार्श्वसंगीतासाठी आवश्यक असणारा आवाजाचा दर्जा असणारे अनिमेश ठाकूर आणि वैष्णवी भालेराव हेदेखील या स्पर्धेत कुठेही मागे नाहीत. सर्व स्पर्धकांमध्ये ‘कांटे की टक्कर’ सुरू आहे. अंतिम पाच जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी सर्व स्पर्धक मेहनत घेत आहेत. सहाजिकच या दमदार स्पर्धकांमधून सर्वोत्तम पाचनिवडण्यासाठी परीक्षकांना सुद्धा कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही कठीण परीक्षा पार पाडत, ‘अंतिम फेरीत कोण स्थान मिळवणार? या प्रश्नाचे उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.
स्पर्धकांना उठवला प्रेक्षकांच्या मनावर ठसा
अनिमेश ठाकुरने प्रेक्षकांच्या मनावर विशेष ठसा उमटवला आहे. अनेकवेळा परिक्षकांवर आपल्या परफॉर्मन्सने मोहिनी घालणारा अनिमेशने मागील आठवड्यात दुनियादारी चित्रपटातील, ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं त्याने सादर केलं. गाण्यातील प्रत्येक जागा उत्तमरित्या घेऊन त्याने प्रेक्षक आणि परिक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणातील जादू इतकी उत्कृष्ट होती, की परीक्षकांच्या खुर्चीवर बसलेल्या वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांना सुद्धा काही काळासाठी त्यांच्या भूमिकेचा विसर पडला होता. प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरून त्यांनी या गाण्याचा आस्वाद घेतला. तर सर्वोत्तम सादरीकरण करण्यासाठी सगळेच जण मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रतिभावान कलाकारांमध्ये ‘एम एच फोक’ हा गटदेखील आहे. वेगवेगळ्या शहरामधून ही ८ मंडळी एकत्र आली आहेत. गावं वेगळी असली तरी, लोकसंगीत हा यांना जोडणारा सामान दुवा आहे. लोकसंगीत सर्वांपर्यंत पोचवणे आणि त्याचे जतन करणे, हा ‘एम एच फोक’ या गटाचा मुख्य उद्देश आहे. ‘युवा सिंगर’च्या मंचावर गण, गवळण, सुफी संगीत, लावणी, कोळीगीत, तमाशा, पोवाडा, गोंधळ, भारूड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे लोकसंगीत या ८ जणांनी सादर केलेले आहे. नव्या ढंगात, हे लोकसंगीत तरुणांपर्यंत पोचवण्याचे काम ‘एम एच फोक’ करत आहे. तरुणांना आपल्या लोकसंगीताविषयी माहिती व्हावी व आवड निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. बॉलीवूड आणि पाश्चिमात्य संगीताचा पगडा तरुणाईवर असताना, ‘एम एच फोक’ची लोकसंगीताबद्दलची तळमळ बघून परीक्षक सुद्धा खुश आहेत. त्यांची गुणवत्ता आणि मेहनत परीक्षकांसह प्रेक्षकांना सुद्धा फार महत्त्वाची वाटते आहे. यासाठी त्यांचे नेहमीच कौतुक होत आहे.
फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
कल्की केकलाच्या प्रेग्नंसीवर चर्चा, असे दिले प्रश्न करणाऱ्यांना उत्तर
निसा देवगणला दिवाळीच्या मेकअपवरून पुन्हा एका करण्यात आलं ट्रोल