राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

सध्या आयुष्यात इतके ताणतणाव असतात की, यातून नक्की कसं बाहेर यायचं हेच कळत नाही. त्यामुळे सतत चिडचिड आणि काही ना काहीतरी प्रत्येकाचं चालूच असतं. पण आपल्या आयुष्यात अशी गोष्ट असतेच जी केल्यामुळे आपल्याला हमखास बरं वाटतं. पण प्रत्येक माणसासाठी त्याचा ताण घालवण्यासाठी काही ना काही वेगळी गोष्ट असते आणि ती गोष्ट त्याच्या राशी आणि स्वभावानुसार ठरत असते. यामध्ये तुमच्या राशीचीही मुख्य भूमिका असते. तुम्हाला माहीत आहे ना तुमचा स्वभाव हा तुमच्या राशीनुसार ठरत असतो. त्यामुळे अशा त्या  कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा ताण निघून जाईल हे आपण राशीनुसार बघूया. नक्की तुमचा Stress Buster काय आहे हे तुमच्या राशीवरून ठरतं. तुम्हालाही बघायचं आहे का तुमच्या राशीनुसार काय आहे तुमचा Stress Buster, तर मग जाणून घेऊया - 

1. मेष (Aries)

GIPHY

तुमच्यासाठी ताण काढण्याची व्याख्या जर वेगळीच आहे. बऱ्याच जणांना काहीही न बोलता आरामात बसून राहणं म्हणजे थोडा ताण कमी झाल्यासारखं वाटतं. पण मेष राशीच्या लोकांना काही ना काहीतरी करत राहिलं तर बरं वाटतं. काहीही नवं करणं अथवा adventure trip वर जाणं यासारख्या गोष्टी तुमचा ताण दूर करण्यासाठी योग्य ठरतात. कुठेही फिरायला जायचं म्हटलं की, नक्कीच या राशीच्या व्यक्ती तणावमुक्त होतात. 

2. वृषभ (Taurus)

GIPHY

या व्यक्तींसाठी तणावमुक्त होण्याची जागा म्हणजे एकच आणि ते म्हणजे यांचं घर. Hot bath, तासन तास घरातील बेडवर लोळत राहणं आणि आपल्या आवडता चित्रपट बघणं याशिवाय मोठा Stress Buster यांच्या आयुष्यात असूच शकत नाही. या व्यक्तींना बसल्या जागी आपला ताण घालवायला जास्त आवडतो. 

3. मिथुन (Gemini)

GIPHY

या व्यक्तींना relax करण्यासाठी बऱ्याचदा वातावरण बदलाची गरज असते. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर Weekend ला बाहेर जाणं आणि आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवणं या गोष्टी या राशीच्या व्यक्तींना जास्त भावतात. त्यामुळे त्यांचा ताण लगेच दूर होतो. 

4. कर्क (Cancer)

GIPHY

तसं  तर या राशीच्या व्यक्ती हा अतिशय relaxed person आहेत. घरामध्ये कोणतीही एक जागा मिळाली की या राशीच्या व्यक्तींना दुसरं काही असण्याची गरजच भासत नाही. आपल्या comfort zone मधून बाहेर येणं हे या व्यक्तींसाठी जास्त त्रासदायक असतं. तसंंच या व्यक्ती Baking, cooking, playing या सगळ्यातूनदेखील आपला ताण घालवत असतात. 

5. सिंह (Leo)

GIPHY

सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा करायला अथवा स्वतःला pamper करायला जास्त आवडतं. तसंच शॉपिंग केल्यानंतरही या व्यक्तींचा ताण कमी होतो. व्यवस्थित कपडे घालणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर night out ला जाणं या सगळ्या गोष्टींमुळेदेखील यांना जास्त तणावमुक्त वाटतं. 

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

6. कन्या (Virgo)

GIPHY

या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत perfection हवं असतं. त्यामुळे या व्यक्ती ताण कमी करण्यासाठीदेखील नेहमी perfect idea शोधत असतात. त्यामुळे या व्यक्तींना सहसा relaxation मिळतं ते meditation मधून. तसंच घराची साफसफाई करूनदेखील या व्यक्तींना बरं वाटतं. 

7. तूळ (Libra)

GIPHY

या व्यक्तींना नेहमी त्यांच्या आसपास शांतता आणि मनःशांती हवी असते. कोणत्याही art form स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करत या व्यक्ती तणावमुक्त होत असतात. तसंच गाणी ऐकणं आणि डान्स करणंदेखील या राशीच्या व्यक्तींना खूप आवडतं. या व्यक्तींसाठी ही एक relaxing therapy ठरते. 

8. वृश्चिक (Scorpio)

GIPHY

या राशीच्या व्यक्तींचं डोकं सतत काम करत राहतं आणि या राशीच्या व्यक्ती सतत काही ना काहीतरी करतच राहतात. त्यांना शांत बसणं माहीतचं नसतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना तणावमुक्त होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त मसाज करून घेणं जास्त आवडतं आणि तेच यांच्यासाठी योग्य आहे. डोकं सतत चालू असल्याने मेंदूला शीण येतो त्यामुळे हेड मसाज या व्यक्तींसाठी योग्य पर्याय आहे. 

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

9. धनु (Sagittarius)

GIPHY

या व्यक्तींना कला आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींत जास्त आनंद मिळतो. याच्या सान्निध्यात असल्यानंतर या व्यक्तींना तणावमुक्त असल्याचं जाणवतं. निसर्गात फिरायला जाणं अथवा लाँग ड्राईव्ह अशा गोष्टींमध्ये यांचं मन रमतं. तसंच अनेक कलात्मक कार्यक्रमही यांचं मन रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

10. मकर (Capricorn)

GIPHY

या व्यक्तींना आपली creative side लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. तसंच तणावमुक्त होण्यासाठी चित्रपट बघणं अथवा गाणी ऐकणं हे यांच्यासाठी उत्तम ठरतं. या व्यक्ती सहसा हेच पर्याय अवलंबतात. तसंच खाण्यासाठी बाहेर जाणंदेखील या व्यक्तींना रिलॅक्स फील करून देतं. 

11. कुंभ (Aquarius)

GIPHY

या व्यक्ती बऱ्याच broad minded असतात. तसंच या व्यक्तींना खरं ऐकायला जास्त आवडतं. खोटं आणि फसवणुकीमुळे यांना जास्त ताण येतो. त्यामुळे या व्यक्तींना झोपणं हा उत्तम पर्याय वाटतो. कोणत्याही ताणातून मुक्त होण्यासाठी सहसा झोप हा पर्याय या व्यक्ती निवडतात. यामुळे या व्यक्तींना मनःशांती मिळते. 

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

12. मीन (Pisces)

GIPHY

या व्यक्तींना स्वभाव अतिशय मनमिळावू असतो. या व्यक्तींना पाण्याच्या आसपास राहणं अत्यंत आवडतं. समुद्रकिनारा, नदी, तलाव यासारख्या ठिकाणी या व्यक्तींचंं मन रमतं. त्यामुळे या व्यक्तींना तणावमुक्त राहण्यासाठी अथवा मनाला शांती मिळवण्यासाठी अशा जागांवर जाणं जास्त आवडतं. पाण्यात तासन तास खेळत राहणंदेखील या व्यक्तींना आवडतं.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.