क्ले मास्कमुळे तुमच्या त्वचेवर होतील हे आश्चर्यकारक बदल

क्ले मास्कमुळे तुमच्या त्वचेवर होतील  हे आश्चर्यकारक बदल

आपल्या त्वचेसाठी बेस्ट फेस पॅक ओळखणं हे फारच कठीण काम असू शकतं. कारण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत असायला हवा. शिवाय तुम्हाला कोणकोणत्या घटकांची अॅलर्जी आहे हे देखील माहीत असायला हवं. प्रत्येकाला याबाबत पुरेशी माहिती असेलच असं नाही. शिवाय बाजारात असंख्य उत्पादने असतात. त्यातून आपल्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट निवडणं सहाजिकच सोपं काम नाही. पण तुम्हाला क्ले मास्क वापरताना अशा प्रकारची काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण क्ले मास्क कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी फायदेशीर ठरतात. क्ले मास्क हे नैसर्गिक घटकांपासून तयार केले जातात. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेला एकप्रकारचा नैसर्गिक तजेलदारपणा येतो. शिवाय या मास्कमुळे तुमच्या त्वचेतील छिद्रे मोकळी होतात ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा योग्य पुरवठादेखील होतो. यासाठीच कोणत्याही त्वचा प्रकार असलेल्या महिलांनी क्ले मास्क वापरण्यास काहीच हरकत नाही.

क्ले मास्क लावण्याची योग्य पद्धत -

क्ले मास्क लावताना ते कसे लावावे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा चांगला परिणाम  दिसू शकतो.

shutterstock

चेहरा स्वच्छ करा -

कोणताही क्ले मास्क वापरण्यापूर्वी चेहरा आधी स्वच्छ करा. पाणी हे त्वचेसाठी सर्वात उत्तम क्लिंझर आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील धुळ आणि माती निघून जाण्यास मदत होते. यासोबतच पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील मेकअप, तेलकटपणादेखील निघून जातो. 

 

चेहऱ्यावर क्ले मास्क लावा -

तुमच्या आवडीचा एखादा क्ले मास्क निवडा. त्याचा पातळ थर तुमच्या चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर आणि मानेवर हा मास्क अगदी  अलगदपणे पसरवा. क्ले मास्क लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापरदेखील करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मास्क उत्तम पद्धतीने लावता येईल. 

थोडावेळ निवांत बसा -

जर तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर क्ले मास्क लावल्यावर पंधरा ते वीस मिनीटे निवांत बसणं गरजेचं  आहे. कितीही घाई आणि गडबड असली तरी यासाठी स्वतःचा थोडा वेळ काढा. मास्कमधील घटक यामुळे त्वचेत मुरतील आणि त्यामुळे त्याचा चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. या वेळेत तुम्ही  एखादं पुस्तक वाचू शकता अथवा सुमधूर गाणं ऐकू शकता. ज्यामुळे तुमचं मनदेखील शांत आणि निवांत होईल. काहीच करायचं नसेल तर या वेळात छान झोप काढा. झोप काढल्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल आणि क्ले मास्कचा परिणाम चेहऱ्यावर योग्य प्रकारे दिसू लागेल. 

चेहरा स्वच्छ धुवा -

मास्क चेहऱ्यावर सुकल्यामुळे तो काढणं थोडं  कठीण आणि कटकटीचं वाटू शकतं. पण जर तुम्ही मास्क योग्य पद्धतीने काढला तर ते सहज शक्य नाही. मास्क काढण्यासाठी आणि तो ओला टॉवेल, गुलाबपाण्यात भिजवलेले कॉटनपॅड्स अथवा टिश्यू याने टिपून घ्या. ज्यामुळे मास्क पुन्हा ओलसर होईल आणि व्यवस्थित निघेल. तुम्ही कोमट पाण्याने चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये बोटं फिरवतही  हा मास्क सहज काढू शकता. मास्क निघाल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

चेहऱ्यावर मॉश्चराईझर लावा -

चेहऱ्यावरील क्ले मास्क काढल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि फ्रेश दिसू लागेल. अशा वेळी त्वचा कोरडी होण्याची  शक्यता असते. यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच चेहऱ्यावर चांगल्या प्रकारचं मॉश्चराईझिंग क्रीम लावा. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहील. 

shutterstock

क्ले मास्क लावण्याचे फायदे -

क्ले मास्क वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठी  क्ले मास्क वापरण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा. 

1.तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात -

त्वचेवर क्ले मास्क लावण्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे त्वचेवरील आणि त्वचेच्या छिद्रांमधील धुळ, माती, प्रदूषण, अतिरिक्त तेल निघून जाते. त्वचेला  योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते. 

2. त्वचेमधील पीच संतुलित राहते -

अती प्रमाणात सौंदर्यप्रसाधने आणि त्यामधील केमिकल्सचा वापर केल्यामुळे त्वचेमधील पीचचा स्थर बिघडतो. यामागे ताण, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यसने अशी अनेक कारणे असू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसते.  मात्र जेव्हा तुम्ही क्ले मास्क लावता तेव्हा तुमच्या त्वचेचं पोषण आणि पीच संतुलन दोन्ही सुधारतं. 

3. डेड स्कीन निघून जाते -

डोळ्यांनी दिसत नसला तरी त्वचेवर रोड डेडस्कीनचा थर जमा होत असतो. जो वेळच्या वेळी काढून टाकला नाही तर त्वचा राठ आणि निस्तेज होते. शिवाय डेडस्कीनच्या थरामुळे त्वचेचं योग्य पोषणही होत नाही. क्ले मास्कमुळे तुमच्या  चेहऱ्यावरील डेडस्कीन सोप्या पद्धतीने निघून जाते. ज्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या होत नाहीत अथवा त्या कमी प्रमाणात होतात.

4.कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त -

आधीच सांगितल्याप्रमाणे क्ले मास्क कोणत्याही त्वचा प्रकारासाठी योग्य असतात. मग तुमची त्वचा कोरडी, तेलकट, कॉम्बिनेशन, संवेदनशील अशी कोणत्याही प्रकारची असो तुम्ही क्ले मास्क नक्कीच वापरू  शकता. त्वचेची काळजी घेण्यासाठी हा एक उत्तम प्रकार आहे. शिवाय त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत नाहीत. 

shutterstock

5. त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो -

तुम्ही थकला अथवा तुमची दगदग झाली की त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. यासाठी जर तुम्ही तुमच्या त्वचेचे काही प्रमाणात लाड पुरवले तर तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. यासाठटी आठवड्यातून एकदा अथवा दोनदा चेहऱ्यावर क्ले मास्क जरूर वापरा. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

पायांच्या टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

त्वचेच्या समस्यांपासून हवीय सुटका, मग तांदळाच्या पिठानं खुलवा सौंदर्य