खराब झालेल्या या वस्तू घरात अजिबात ठेवू नका, होतील विपरित परिणाम

खराब झालेल्या या वस्तू घरात अजिबात ठेवू नका, होतील विपरित परिणाम

एखादी वस्तू आपण इतक्या आवडीने घेतो की, ती बंद झाली तरी टाकण्याची इच्छा आपल्याला होत नाही. एक एक करता करता आपण अशा बऱ्याच बंद पडलेल्या वस्तू घरात ठेवतो. पण तुमच्या घरात अशा बंद गोष्टी नकारात्मक उर्जा निर्माण करत असतात. त्यामुळे तुम्ही त्या योग्यवेळी घरातून टाकलेल्या बऱ्या असतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, घरात कोणत्या खराब झालेल्या वस्तू नेमक्या ठेवू नये याविषयी.

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

घड्याळ

shutterstock

प्रत्येकाच्या घरात भिंतीवर एक तरी घड्याळ असतं. हातावर बांधण्याचे घड्याळ आणि भिंतीवरील घड्याळ अनेकदा बंद झाली तरी घरात तशीच पडून असतात. पूर्वी प्रत्येकाकडे एकच मनगटी घड्याळ असायचे त्यामुळे त्याची काळजी घेतली जायची. पण आता प्रत्येकाकडे किमान दोन तरी घड्याळ असतातच. त्यामुळे दोन्ही घड्याळाकडे लक्ष दिले जातेच असे नाही. तुमच्याकडेही भरपूर घड्याळ असतील पण ती बंद पडली असतील. त्याला दुरुस्त करणे शक्य नसेल तर तुम्ही ती आताच फेकून द्या. बंद पडलेली घड्याळ घरात ठेवल्यामुळे घरातील सकारात्मक उर्जेचा स्तर घटतो. घरात कलह वाढतात. त्यामुळे घरात बंद घड्याळ ठेवू नका.

तुटलेल्या काचेच्या वस्तू

shutterstock

काचेच्या वस्तू अगदीच नाजूक असतात. त्यांना जरा जरी धक्का बसला तरी त्या तुटतात. काही काचेला अगदी हलका तडा गेला ते वापरण्यायोग्य राहिले असेल तर अशा वस्तू घरात ठेवल्या जातात. त्यांचा वापर इतर गोष्टींसाठी केला जातो. पण तुटलेल्या काचा घरात नकारात्मक उर्जा सक्रिय करतो. त्यामुळे घरात सतत कलह होत राहतात. कुटुंबातील सदस्यांना कामाच्या ठिकाणी आणि नात्यात अनेक अडचणी निर्माण होतात, असे म्हटले जाते. 

तुटलेल्या आणि न वापरातल्या चपला

shuttersrtock

अनेकांच्या घरात तुटलेल्या आणि न वापरातल्या कित्येक चपला असतात.  जर तुम्ही एखादी चप्पल घालत नसाल किंवा ती दुरुस्तही करणार नसाल तर ती आताच्या आता तुमच्या घरातून काढून टाका. कारण या तुटलेल्या चपला दारिद्रयाचे लक्षण आहे. तुमचे घर कितीही समृद्ध असेल तरी तुटक्या चपलांमुळे तुम्हाला हवी तशी प्रगती करता येणार नाही. चांगल्या कामात उगाचच अडथळा येण्याची शक्यता आहे.

Vaastu Tips : तुमचं घर सांगतं तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल बरंच काही

तुटलेली भांडी

shutterstock

घरात स्टेनलेस स्टीलची भांडी असतील तर त्यांना हमखास तडे जातात. अशी तुटलेली भांडी घरात अजिबात ठेवू नको. कारण यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. तुटलेल्या भांड्याचा अशुभ प्रभाव कुटुंबावर पडतो. म्हणूनच शास्त्रानुसार घरात फुटलेले भांडे ठेवू नये. घरात अस्थिरता, कमालीचा असंतोष यामुळे निर्माण होतो. 

तुटलेला बेड

shutterstock

तुमच्या घरात असलेला पलंग किंवा बेड जर तुटला असेल तर तुम्ही आताच्या आता तो दुरुस्त करा किंवा काढून टाका. कारण प्रत्येकालाच लगेच बेड बदलणे शक्य नाही. जर घरातील बेडवर पती-पत्नी झोपत असतील तर मात्र त्यांच्यासाठी असा बेड अजिबात चांगला नाही. कारण अशा तुटक्या बेडमुळे भांडणं होण्याची दाट शक्यता असते. वैवाहिक जीवनात त्यामुळे कलह देखील येऊ शकतात.

जुने कपडे

shutterstock

बऱ्याच जणांकडे जुन्या वस्तूंचा नुसता खच असतो. त्यांना जुने कपडे जमवायची जणू  सवयच लागलेली असते. याला देऊ त्याला देऊ असेत म्हणत असे कपडे साठवून ठेवले जातात. पण अशापद्धतीने घरात कपडे साठवून ठेवणे म्हणजे अशुभच आहे. घरात सुबत्ता टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही असे जुने कपडे योग्यवेळी घरातून काढून टाकायला हवे. कारण तुम्ही असे कपडे घरात ठेवात तर तुमच्या घरात प्रगती होणार नाही. 


आता जर तुमच्या घरी अशा काही जुन्या वस्तू असतील तर तुम्ही आताच त्या दुरुस्त करा. अन्यथा नको असल्यास त्या फेकून द्या.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.