ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा

आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा

सध्या आवळ्याचा सीझन सुरु आहे. बाजारात आलेले आवळे पाहून ते घेण्याचा तुमचा मोह झाला असेल तर तुम्ही आताच आवळे विकत घ्या. कारण तुमच्या सुंदर केसांपासून ते चमकदार त्वचेसाठी आवळा हा अगदी बेस्ट आहे. बाजारातून छान किलोभर आवळे घेऊन या आणि त्याचे सेवन करा. आता तुम्हाला आवळ्याचे सेवन नेमके कशाप्रकारे कळावे हे कळत नसेल तर मग आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे सेवन कसे करावे या विषयी सांगणार आहोत. मग करुया सुरुवात

केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी तयार करा ‘गव्हांकुर’

घरी आवळा आणल्यानंतर

shutterstock

ADVERTISEMENT

 साधारण एका किलोमध्ये लिंबाएवढ्या आकाराचे 35 ते 40 आवळे हमखास येतात. आवळे घेताना ते छान हिरवेगार असायला हवेत. ते जितके हिरवे असतील तितके फ्रेश असतात. आवळे स्वच्छ धुवून ते एका चाळणीत काढून घ्या. त्याचे पाणी निथळल्यानंतरच तुम्ही आवळे स्वच्छ पुसून घ्या आणि मगच त्याचा वापर करा.

केस धुताना करू नका या ‘7’ चुका

आवळा आणि मध

shutterstock

ADVERTISEMENT

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C असते त्यामुळे त्याचे  सेवन फारच महत्वाचे आहे. जर तुम्हाला आवळा नुसताच खाणे शक्य नसेल तर तुम्ही आवळा किसून त्याचा रस काढून त्यात थोडे मध घाला आणि तो रस प्या. मधामुळे आवळ्याचा रसाला एक वेगळाच गोडवा येतो. त्यामुळे ज्यांना साखर खाणे व्यर्ज आहेत ते देखील हा रस सेवन करु शकता. आता हा रस कधी प्यावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही दररोज सकाळी उपाशीपोटी हा रस घेण्यास काहीच हरकत नाही. 

आवळा कँडी

shutterstock

आता तुम्हाला आवळ्याचा रस प्यायची सवय नसेल किंवा त्याची चव आवडत नसेल तर तुम्ही आवळा कँडीही करुन खाऊ शकता. आवळा कँडी तुम्हाला इतर बाबतीतही फायदेशीर ठरते. आता आवळा कँडी तयार कशी करायची हे तुम्हाला माहीत नसेल तर आवळे एका प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन ती पिशवी घट्ट बांधून ठेवायची आहे. ती पिशवी तुम्हाला फ्रिजरमध्ये टाकून द्यायची आहे. साधारण आठवडाभर ठेवल्यानंतर आवळ्याला आपोआप कळ्या पडतात. आता हा आवळा घेऊन तुम्ही त्याला साखरेत बुडवून ठेवू शकता.  एका काचेच्या बरणीत तुम्हाला हे आवळे भरुन त्यात साखर घालून ठेवायची आहे. उन्हात ही बरणी ठेवून त्यातील साखर आवळ्याला लागेपर्यंत ठेवायचे आहे. हा आवळा तुम्ही रोज एक फोड खाल्ला तरी चालू शकेल. याचा फायदा असा की, तुमची त्वचा चांगली होतेच शिवाय आवळ्यातील घटक तुमचे जेवण पचवण्यास मदत करते. 

ADVERTISEMENT

त्यामुळे आता तुम्ही आवळे घेऊन या आणि त्याचे सेवन सुरु करा.या शिवाय आवळ्याचे प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही आवळा शॅम्पूचा उपयोग करु शकता. आवळ्याच्या असा वापरामुळे त्वचा आणि केसांसंदर्भातील तुमच्या तक्रारी कमी होतील

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

20 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT