मागच्या आठवड्यात गुरूवारी टीव्ही अभिनेत्री गहना वसिष्ठ शूटिंगच्या सेटवर चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिची तब्बेत इतकी खराब आणि नाजूक होती की, तिला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तिची तब्बेत अतिशय नाजूक असून व्हेंटिलेटरवर ठेवल्याचं सांगितलं होतं. पण आता मृत्यूशी झुंज देत गहनाच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याची चांगली बातमी देण्यात आली आहे. डॉक्टरांनी तिला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याचंही सांगण्यात येत आहे. गहनाला गुरूवारी त्वरीत जेव्हा रक्षा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी प्रेस कॉन्फरन्स घेत सांगितलं होतं की, सेरेब्रल ओडेमा आणि कोमात जाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर तिची हालत होती. ज्यामुळे ती जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी होती. पण आता गहनाची रिकव्हरी होत असून तिच्यावर अधिक चांगले उपचार चालू आहेत आणि तिचं शरीर व्यवस्थित औषधांनाही साथ देत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
अभिनेत्री गहना वसिष्ठला नक्की काय झालं याचीही बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली. खरं तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गहनाची पल्स रेट कमकुवत झाली होती आणि तिचं ब्लडप्रेशरदेखील अतिशय कमी झालं होतं. तिने 48 तास काहीही खाल्लं नव्हतं. तसंच जेव्हा तिला अॅडमिट करण्यात आलं तेव्हा तिला सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) आणि एक इलेक्ट्रिक शॉकही देण्यात आला. जेव्हा तिला भरती करण्यात आलं तेव्हा ती हायपर ग्लायसेमियाने पीडित होती. ज्यामुळे ओडेमा, हायपोक्सिया आणि कार्डियाक अरेस्ट यावर जास्त परिणाम होऊन माणूस मृत्यूमुखी पडण्याची जास्त शक्यता असते. पण गहनाला वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. मात्र रूग्णालयात भरती केल्यानंतर साधारण तीन दिवसांनी गहनाच्या शरीराने उपचारांवर प्रतिक्रिया देणं सुरू केलं. अजूनही तिला भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. ज्या दिवशी तिला रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यावेळी तिची शरीरातील साखरेची पातळी ही 500 च्या जवळपास होती तर आता ती पातळी 250 पर्यंत आणण्यात आली आहे. अजूनही पूर्ण व्यवस्थित शुद्धीत येण्यासाठी तिला जवळपास अजून 5 दिवस लागतील.
टीव्ही क्षेत्रातील ग्लॅमर हे नेहमीच बऱ्याच जणांना हवंहवंस वाटतं. पण त्यामागची मेहनत. दिवसाला 16-17 तास लागणारं काम हे सर्वांनाच झेपणारं नसतं. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी बऱ्याच जणी अतिशय कडक डाएट पाळतात. पण कधी कधी कोणाचाही सल्ला न घेता स्वतःचं डाएट फॉलो करतात ज्यामुळे असं जीवावर बेतण्याची वेळ येते हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. पडद्यावर दिसणारी चमक आणि ग्लॅमच्या मागे जीवावर बेतणाऱ्याही अनेक गोष्टी असतात हे बऱ्याचदा लक्षात न घेता काम केलं जातं. हीच गोष्ट गहनाच्या बाबतीत घडली. पण आता गहनाची तब्बेत सुधारत असून ती लवकरच बरी होईल असा विश्वासही डॉक्टरांनी आता व्यक्त केला आहे. गहना मृत्यूवर मात करत सध्या रिकव्हर होत आहे. गहनाने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून ती अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते सध्या प्रार्थना करत आहेत.
काजोलच्या गाण्यावर डान्स करणारा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.