'अग्गंबाई सासूबाई’ फेम सोहमचं फिटनेस प्रेम

'अग्गंबाई सासूबाई’ फेम सोहमचं फिटनेस प्रेम

मालिका आणि मालिकेतील कलाकार यांच्यावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. ज्यामुळे मालिकेतील कलाकार त्यांना त्यांच्या घरातील सदस्य वाटू लागतात. सध्या टेलिव्हिजनवर गाजत असलेल्या अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या मालिकेमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला प्रेक्षकांचा लाडका सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. संगीतकार अशोक पत्की आशुतोषचे वडील आहेत. आशुतोषला अभिनयाची आणि फिटनेसची आवड आधीपासूनच होती. अभिनय क्षेत्रात येण्याआधी आशुतोषने दिग्दर्शक केदार शिंदे याना काही काळ असिस्ट केलं आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे आपोआप आशुतोषच लक्ष फिटनेसकडे गेलं. आधी आशुतोष हा खूप बारीक होता आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात व्यायामाचं वेड आलं. आशुतोष हा नित्यनियमाने व्यायाम करू लागला. गूगलवर सर्च करून आपल्या शरीराची, विविध व्यायामाची व आहाराची अर्धवट अर्धवट माहिती ठेवण्यापेक्षा आपण फिटनेस ट्रेनरचा कोर्स करायला हवा असं आशुतोषला वाटलं आणि म्हणूनच त्याने प्रोफेशनल फिटनेस ट्रेनरचा कोर्स केला. आशुतोष हा नियमितपणे जिममध्ये व्यायाम करतो तसेच त्याच्या डाएटकडे पण त्याचं कटाक्षाने लक्ष असतं आणि म्हणूनच आशुतोष खूप फिट आहे.

टेलिव्हिजनवरी लोकप्रिय मालिका

अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या फारच गाजत आहे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणाऱ्या सुनाही असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. पण प्रत्येक घरात भांडण असतंच असं नाही. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच सतत भांडण आणि कुरघोड्या बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं पाहणं हे प्रेक्षकांना अधिक भावत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे.  त्यातही सासूला समजून घेणारी आणि समंजस सून दाखवल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनीही अप्रतिम काम केलं असून गिरीश ओकची या मालिकेत प्रमूख भूमिका आहे. मालिका तेव्हाच प्रेक्षकांच्या मनाला भिडते जेव्हा त्याची संकल्पना नवीन असते. अग्गंबाई सासूबाई ही मालिका सासूच्या पुर्नलग्नाची आहे. इतकी वर्ष मनाने एकटी झालेल्या सासूच्या आयुष्यात एक नवीन आशा घेऊन येण्याचं काम चक्क सूनबाई करत आहे. त्यामुळे या मालिकेत सासू-सुनेमधील हेवेदावे दाखवेलं नाहीत. सासूबाईंना दुसऱ्या लग्नासाठी तयार करणारी एक सूनबाई पाहताना प्रेक्षकांना नक्कीच वेगळेपण जाणवत आहे. त्यामुळे सहाजिकच या मालिकेवर आणि त्यातील पात्रांवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम आहे. 

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा-

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

स्पृहा जोशीने ‘रंगबाज’च्या युनिटसाठी केलं फक्कड जेवण

इंडिगो एअरलाईन्सवर सोनाक्षी नाराज, शेअर केला व्हिडिओ

करोड'पती' असलेल्या अभिनेत्री, जगतात ऐशोआरामात आयुष्य