परफेक्ट त्वचा प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अगदी काहीही करायला महिला तयार असतात. चांगल्या प्रोडक्टच्या शोधात असताना एक नवं प्रोडक्ट आमच्या नजरेस प डलं. आज या प्रोडक्टबद्दल आपण जाणून घेणार आहोत. Hibiscus monkey असे या ब्रँडचे नाव असून त्यांचे काही प्रोडक्ट ट्राय करुन पाहिले ते आम्हाला कसे वाटले ते जाणून घ्या.
हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या
पूर्वीच्या काळी ज्यावेळी मॉश्चरायझर क्रिम नव्हते त्यावेळी त्वचा चांगली ठेवण्यासाठी तेलांचा उपयोगच केला जात होता. आता क्रिम आल्यामुळे आपण तेलाचा वापर करत नाही. तेलामुळे शरीर तेलकट वाटत राहते. शिवाय तेलांचा वेगवेगळा वास येत राहतो. पण Hibiscus monkey या प्रोडक्टचे मॉश्चरायझर तेल तुमच्या त्वचेला तजेला आणण्यासाठी फारच चांगलं आहे. तुम्ही बाहेर जातानाही हे तेल लावून जाऊ शकता. याला स्प्रे बॉटल असल्यामुळे तुम्हाला हे तेल अगदी सहज लावता येते. शिवाय तुमच्या त्वचेमध्ये हे तेल पटकन मुरते. आता हे तेल चांगले आहे म्हणून तुम्ही याचा प्रयोग चेहऱ्यावर करु नका.
प्रोडक्टचे नाव: velvet spray ( बटर कुकी)
किंमत: 980 रुपये
त्वचेतील सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे हाताचा कोपरा आणि पायाचा गुडघा. ही त्वचा काळी दिसते. अनेकदा ही त्वचा रुखरुखीत होते. अशावेळी तुम्हाला Hibiscus monkey चं cuddle क्रिम वापरायला काहीच हरकत नाही. शीआ बटर, बी वॅक्स, लेमन ऑईल अशांचा यामध्ये समावेश आहे. याचा उपयोग चांगला असला तरी यामधील लेमनचा सुगंध फार चांगला नाही. म्हणजे तुम्हाला स्ट्राँग काही आवडत नसेल तर तुम्हाला हे अजिबात आवडणार नाही. शिवाय त्याचे पॅकिंगही इतके फॅन्सी नाही.
प्रोडक्टचे नाव: HM cuddles (knee and elbow cream)
किंमत: 495 रुपये
केसांच्या वाढीसाठी जास्वंदाचे तेल हे उत्तम असते असे म्हणतात. विशेषत: तुम्हाला जर कोल्डप्रेस आणि उत्तम प्रतीचे तेल हवे असेल तर Hibiscus monkeyचे हे प्रोडक्ट तुम्हाला नक्की आवडेल. जास्वंदाच्या तेलासोबतच यामध्ये नारळाचे तेल घालण्यात आले आहे. त्यामुळे केसांसाठी तुम्हाला आवडू शकेल. किंमतीच्या तुलनेत तुम्हाला हे तेल महाग वाटू शकेल.
प्रोडक्टचे नाव: #HM love hair oil
किंमत: 695 रुपये
पिरेड्सच्या दिवसात अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास काहींना सहन होत नाही अशावेळी अनेक जण गोळ्या घेतात. पण तसे न करता जर तुम्ही हा रोल ऑन वापरला तर तुम्हाला आराम पडू शकेल. हे रोल ऑन कॅरी करायला फारच सोपे आहे. त्यामुळे तुम्ही अगदी आरामात ते कॅरी करु शकता. पण जर तुम्हाला पेपर मिंटचा वास आवडत नसेल तर हे रोल ऑन तुमच्यासाठी नाही.
प्रोडक्टचे नाव: comforter, dear period pain
किंमत: 465 रुपये
आता तुमच्यासाठी तुम्हाला काही नवीन आणि ऑरगॅनिक काहीतरी ट्राय करायचे असेल तर Hibiscus Monkeyचे प्रोडक्ट नक्की वापरुन पाहा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.