आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक रिलीज

आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक रिलीज

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana) सध्या  लागोपाठ एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देण्याचा धडाका लावला आहे. बॉक्सऑफिसवर लागोपाठ रिलीज झालेल्या त्याच्या सहा सिनेमांना रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. नुकतेच ‘बाला’सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर आयुष्मान पुन्हा एकदा बॉक्सऑफिस गाजवण्याच्या तयारीत आहे. आयुष्मानचा आगामी सिनेमा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चं (Shubh Mangal Zyada Saavdhan) मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर करत 21 फेब्रुवारी 2020 रोजी सिनेमा रिलीज होणार असल्याचं आयुष्मानानं सांगितलं आहे. 

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लूक

आयुष्मान पळत असून त्याच्या मागे लग्नाचं वऱ्हाड धावत असल्याचं या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय, ‘अब ज्यादा जल्दी रिलीज होगी आपकी और हमारी शुभ मंगल ज्यादा सावधान’ असं देखील पोस्टरवर लिहिलेलं आहे. यापूर्वी हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होणार होता. हितेश कैवल्य सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. 

(वाचा : आधी बाहुबलीचा आवाज आणि आता महाराष्ट्राचे आराध्यदैवत साकारणार शरद)

 

‘शुभ मंगल सावधान’चा सीक्वेल

दरम्यान, हा सिनेमा 2016मध्ये रिलीज झालेल्या ‘शुभ मंगल सावधान’चा दुसरा भाग आहे. ‘शुभ मंगल सावधान’मध्ये आयुष्मानसोबत भूमि पेडणेकरची मुख्य भूमिका होती. पण आता या सिनेमामध्ये ‘बधाई हो’ सिनेमातील गजराज राव आणि नीना गुप्ता यांचीही एंट्री झाली आहे. कारण या त्रिकुटास प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. यानिमित्तानं पुन्हा एकदा तिघांचा कॉमेडी तडका प्रेक्षक अनुभवणार आहेत.

(वाचा : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका)

अशी आहे सिनेमाची कहाणी

मिळालेल्या माहितीनुसार,‘गे लव्ह स्टोरी’वर सिनेमाचा विषय आहे. वाराणसीतील एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन समलैंगिक तरुणांच्या प्रेमावर सिनेमाची कहाणी आधारित आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आयुष्मान पहिल्यांदा एका ‘गे’ व्यक्तीच्या भूमिका साकारत  आहे. सिनेमामध्येे आयुष्मानसोबत वेब सीरिजमध्ये झळकणारा प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र कुमारदेखील आहे. सध्या सिनेमाचं वाराणसीमध्ये शुटिंग सुरू आहे. प्रत्येक वेळेस निरनिराळे विषय घेऊन येणाऱ्या आयुष्मानच्या या सिनेमातील ‘गे’ कहाणीला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार? हे पाहण्यासाठी फेब्रुवारी 2020पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.

(वाचा : परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण )

 

View this post on Instagram

❤️

A post shared by Jitendra kumar (@jitendrak1) on

अमिताभ बच्चननंतर आता आयुष्मान खुराना ठरतोय बॉलिवूडचा नंबर 1 हीरो

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयुष्माननं सलग हिट सिनेमे देण्याचा तडाखाच लावला आहे. दम लगा के हैशा, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, बधाई हो, ड्रिमगर्ल, अंधाधुन, आर्टिकल 15 आणि आता बाला असे त्याचे लागोपाठ सात सिनेमे सुपरहिट झाल्यामुळे त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयुष्मानपूर्वी हा विक्रम महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर होता. मात्र ‘बाला’च्या अभूतपूर्व यशामुळे आयुष्मान आता बॉलिवूडचा नंबर वन हीरो ठरला आहे. आयुष्मानच्या अभिनयाला चाहत्यांची चांगलीच दाद मिळत आहे. ‘बाला’ सिनेमात आयुष्मानने केस गळतीच्या समस्येला तोंड देणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली. आयुषमानने 2012 साली ‘विकी डोनर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं. यानंतर अवघ्या सातच वर्षांत ‘बाला’ सिनेमापर्यंत बॅक टू बॅक हिट सिनेमे दिल्यामुळे आयुष्मान बॉलिवूडचा नवा नंबर वन नायक ठरत आहे.
आयुष्मानपूर्वी अमिताभ यांच्या नावावर एका पाठोपाठ सहा सिनेमे हिट करण्याचा रॅकॉर्ड होता. मात्र आयुष्मानने हा रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे. विशेष म्हणजे आगामी सिनेमा ‘गुलाबो चिताबो’मध्ये अमिताभ आणि आयुष्मान हे दोघेही एकत्र काम करत आहे. ज्यामुळे या दोन्ही नायकांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.   

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.